प्रणब मुखर्जी लिखित ‘द कोलिशन इयर्स १९९६-२०१२’ पुस्तक प्रसिद्ध 
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे ‘द कोलिशन इयर्स १९९६-२०१२’ शीर्षक असलेले पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

प्रणब मुखर्जी यांनी २५ जुलै २०१२ रोजी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळली होती आणि ते या पदावर २५ जुलै २०१७ पर्यंत कार्यरत होते.१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक विजेता संघ इंग्लंड
कोलकातामध्ये मध्ये खेळल्या गेलेल्या FIFA अन्डर-१७ विश्वचषक २०१७ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने स्पेनचा पराभव करत स्पर्धा जिंकली. इंग्लंड संघाने जबरदस्त खेळ करताना पिछाडीवरुन बाजी मारताना स्पेनच्या हातून विश्वचषक हिसकावून घेतला. 

दरम्यान, देशातील सहा शहरांमध्ये झालेल्या स्पर्धेतील विविध सामन्यांमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीसह स्पर्धेत नोंदवलेल्या गोलच्या बाबतीतही यजमान म्हणून भारताने विश्वविक्रम नोंदवले.

चौथ्यांदा अंतिम फेरी गाठलेल्या इंग्लंड संघाने आपल्या स्टार खेळाडूंच्या जोरावर पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक पटकावण्याची कामगिरी केली. 

तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच युरोपियन देशांमध्ये विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला.

स्पर्धेत दिले गेलेले पुरस्कार :- 
गोल्डन बूट – रियान ब्रूस्टर (इंग्लंड)
गोल्डन बॉल – फिल फोडन (इंग्लंड)
गोल्डन ग्लोव्ह – गॅब्रिएल ब्राझाओ (ब्राझील)
FIFA फेयर प्ले अवॉर्ड – ब्राझील

६ ते २८ ऑक्टोबर २०१७ दरम्यान भारतात प्रथमच FIFA अन्डर-१७ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.भारताने मलेशियाला नमवत जिंकले कांस्यपदक
विशाल अंतिल याने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने यजमान मलेशियाचा ४-० असा पराभव करताना सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत कास्यपदक जिंकले .

तमन दया हॉकी स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत भारताकडून अंतिलने १५ व्या आणि २५ व्या मिनिटाला असे दोन गोल केले. 

भारताला विवेक प्रसादने ११ व्या मिनिटाला गोल करीत आघाडी मिळवून दिली, तर शैलानंद लाकडाने २१ व्या मिनिटाला संघाकडून तिसरा गोल केला. अशा प्रकारे भारताने कास्यपदक जिंकताना या स्पर्धेचा समारोप केलाविराट कोहली $१४.५ दशलक्षच्या ब्रॅंड व्हॅल्यूसह फोर्ब्सच्या यादीत ७ व्या स्थानी
फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक ब्रॅंड व्हॅल्यू असलेल्या खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली याला $१४.५ दशलक्षच्या ब्रॅंड व्हॅल्यूसह ७ वे स्थान प्राप्त झाले आहे.

आयरिश गोल्फर रॉरी मॅकआयरॉय हा ८ व्या आणि फूटबॉलपटू लिओनेल मेसी $१३.५ दशलक्षच्या ब्रॅंड व्हॅल्यूसह ९ व्या स्थानी आहे.

या यादीत स्वीस टेनिसपटू रॉजर फेडरर हा $३७.२ दशलक्षसह प्रथम स्थानी आहे. त्यानंतर बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स ($३३.४ दशलक्ष) आणि उसेन बोल्ट ($२७ दशलक्ष) यांचा शीर्ष तीनमध्ये समावेश होतो.कोलंबोमध्ये १४ वी SAARC विधी परिषद आयोजित
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये १४ वी ‘साऊथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन (SAARC) विधी परिषद २०१७’ आयोजित करण्यात आली आहे.

कोलंबोमध्ये २७-२९ ऑक्टोबर २०१७ दरम्यान संपन्न झालेल्या SAARC देशांच्या सरन्यायाधीशांच्या ११ व्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही परिषद भरविण्यात आली.

या कार्यक्रमामधून न्यायाधीश, ज्येष्ठ वकील, कायदेतज्ञ आणि इतर शिक्षणतज्ज्ञ यांना कायदेविषयक बाबींवर आणि त्यांच्या संबंधित देशांतील नवीनतम कायदेविषयक माहितींचे आदानप्रदान करण्यासाठी एक मंच प्रदान करण्यात आला आहे.


साऊथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन (SAARC) ही एक प्रादेशिक आंतरसरकारी संस्था आहे आणि दक्षिण आशियातील देशांची भौगोलिक संघटना आहे, ज्याची अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूटान, भारत, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सदस्य राज्ये असून याची ८ डिसेंबर १९८५ रोजी ढाकामध्ये स्थापना करण्यात आली.


बुरुंडी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे सदस्यत्व सोडणारे पहिले राष्ट्र
२७ ऑक्टोबर २०१७ रोजी बुरुंडी हा आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या सदस्यत्वामधून बाहेर पडणारा पहिला देश बनला आहे.

आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय (ICC) हे जगातील एकमेव आंतरराष्ट्रीय स्थायी न्यायाधिकरण आहे, ज्यामध्ये संहार, मानवताविरोधी गुन्हे, युद्धसंबंधी गुन्हे आणि हल्ला करण्यासंबंधी गुन्हे या संदर्भात आरोपींच्या विरुद्ध कारवाई केले जाते. हे नेदरलँडमधील हेगमध्ये भरणारी एक आंतरसरकारी संघटना आणि आंतरराष्टीय न्यायाधिकरण आहे. 

जेव्हा राष्ट्रीय न्यायालय गुन्हेगारांवर खटला चालविण्यास अपात्र किंवा अक्षम ठरतात किंवा संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद किंवा वैयक्तिक देशाकडून या न्यायालयाचा उल्लेख केला जातो तेव्हा याकडे याचिका दाखल केली जाते. 

१७ जुलै १९९८ रोजी रोम करार अंगिकारल्यानंतर ICC ने १ जुलै २००२ पासून आपले कार्य सुरू केले. रोम करार हा एक बहुपक्षीय करार आहे, जे ICC चे मूलभूत व प्रशासकीय दस्तावेज आहे.

बुरुंडी या अफ्रिकेमधील देशाने या आंतरराष्ट्रीय न्यायालयावर असा आरोप केला आहे की, न्यायालय खंडाच्या बाबतीत भेदभाव दर्शवीत आहे. बुजुंबुरा ही बुरुंडी देशाची राजधानी आहे आणि देशाचे चलन बुरुंडीयन फ्रॅंक हे आहे.केनेथ जस्टर यांना अमेरिकेचे भारतामधील राजदूत म्हणून मंजूरी 
अमेरिकेच्या मंत्रिमंडळाच्या समितीने ६२ वर्षीय केन जस्‍टर यांची भारतामध्ये अमेरिकेचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यास त्यांची मंजूरी दिली आहे.

रिचर्ड वर्मा यांच्या राजीनाम्यानंतर भारतामधील अमेरिकेचे राजदूत पद २० जानेवारी २०१७ पासून रिक्त आहे.कॅटालोनियावर स्पेनचा ताबा
स्वतंत्र कॅटालोनियावर स्पेन सरकारने आज थेट ताबा मिळवला असून, स्थानिक सरकार बडतर्फे केले आहे. कॅटालोनियाच्या प्रांतिक संसदेने स्पेनपासून स्वतंत्र होण्याची घोषणा केल्यानंतर स्पेन सरकारने तातडीने ही पावले उचलली असल्याचे सांगण्यात आले. 

स्थानिक सरकार बडतर्फे करून स्पेनने कॅटालोनियावर थेट नियंत्रण प्रस्थापित केले आहे. कॅटालोनिया प्रांताच्या पोलिस दलाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला स्पेन सरकारने निलंबित केले आहे. 

२१ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या सार्वमताच्या अधारे कॅटालोनियाच्या प्रांतिक संसदेने स्पेनपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे संपूर्ण युरोपात खळबळ उडाली आहे. 

स्वातंत्र्याची घोषणा झाल्यानंतर स्पेन सरकारने तातडीने कॅटालोनियाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व मंत्र्यांची कालच हाकालपट्टी केली होती. तसेच प्रांतिक संसद ही बरखास्त केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी स्पेनने पोलिसप्रमुखांना निलंबित करत कॅटालोनियाचा थेट ताबा घेतला आहे.

स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आल्यानंतर कॅटालोनियातील अनेक शहरांमध्ये हजारो नागरिकांनी रस्त्यांवर उतरत आनंद साजरा केला होता; मात्र ही स्वातंत्र्याची घोषण बेकायदा असल्याचे स्पेनच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार कॅटालोनियाला नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे