भारताने चाबहार बंदरावरून अफगाणिस्तानकडे गव्हाची पहिली खेप पाठवली
भारताने २९ ऑक्टोबर २०१७ रोजी अफगानिस्तानकडे गव्हाची पहिली खेप रवाना केली. विशेष म्हणजे ही खेप भारताकडून विकसित केलेल्या इराणमधील चाबहार बंदराच्या माध्यमातून पाठवण्यात येत आहे.


भारत आणि अफगानिस्तान संबंध वाढविण्याच्या दृष्टीने अफगानिस्तानला ११ लाख टन गहूचा पुरवठा करण्यात येत आहे, त्याची ही पहिली खेप आहे. उर्वरित सहा खेपा पुढील काही महिन्यात पाठविण्यात येणार आहे.बॅडमिंटनपटू श्रीकांथने फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले 
भारतीय बॅडमिंटनपटू किडांबी श्रीकांथने पॅरिसमध्ये खेळल्या गेलेल्या ‘फ्रेंच ओपन सुपर सीरीज २०१७’ स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीकांथने जापानच्या केंता निशिमोतो याचा पराभव केला. 

हा चालू हंगामातील श्रीकांथचा चौथा किताब आहे.

फ्रेंच ओपन ही एक वार्षिक बॅडमिंटन स्पर्धा असून ती १९०९ सालापासून फ्रान्स बॅडमिंटन फेडरेशनकडून आयोजित केली जात आहे.भारत-न्यूझीलँड क्रिकेट मालिकेत भारतीय संघाचा विजय 
कानपूरच्या ग्रीनपार्क क्रीडामैदानावर खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या भारत-न्यूझीलँड क्रिकेट मालिकेत भारतीय संघ विजयी ठरले. संघाने ही मालिका २-१ ने जिंकले.

मालिकेत कर्णधार विराट कोहली हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट (ODI) मध्ये सर्वात कमी (१९४) खेळींमध्ये ९००० धावा पूर्ण करणारा फलंदाज/खेळाडू बनला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या एबी डि’विलियर्सचा (२०५ खेळी) चा विक्रम मोडला. 

याशिवाय कोहली हा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

पाकिस्तानमध्ये ‘एशियाई क्रिकेट कौन्सिल एमर्जिंग नेशन्स कप २०१८’ चे आयोजन
पाकिस्तानमध्ये २०१८ च्या एप्रिल महिन्यात ‘एशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) एमर्जिंग नेशन्स कप २०१८’ चे आयोजन केले जाणार आहे.

ACC एमर्जिंग नेशन्स कप २०१८ स्पर्धेसाठी पाकिस्तानला आयोजकत्व देण्याचा निर्णय लाहोरमध्ये झालेल्या ACC च्या बैठकीत घेण्यात आला. या स्पर्धेत पाच पूर्ण सदस्य सहित सहा ACC संघ खेळतील.आइसलँडच्या पंतप्रधानांनी आकस्मिक निवडणूक जिंकली 
आइसलँडचे वर्तमान पंतप्रधान बर्जनी बेनेडिक्सन यांच्या इंडिपेंडेंट पक्षाने देशात झालेल्या आकस्मिक निवडणूकीत पुन्हा एकदा विजय प्राप्त केला आहे.

इंडिपेंडेंट पक्षाने संसदेच्या ६३ जागांपैकी १६ जागांवर विजय मिळवला. मात्र नवीन सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना युतीच्या माध्यमातून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

एकूण आठ पक्षांनी संसदेत जागा जिंकलेल्या आहेत, त्यात लेफ्ट-ग्रीन मूव्हमेंट (११), सोशल डेमोक्रेटिक अलायन्स (७), पायरेट्स (६) या पक्षांचा समावेश आहे.

आइसलँड हे एक नॉर्डिक बेट राष्ट्र आहे. या देशाची राजधानी रिक्जेविक शहर आणि चलन आइसलँडिक क्रोना हे आहे.दुबईत भारत-UAE भागीदारी शिखर परिषदेचा शुभारंभ
३० ऑक्टोबर २०१७ रोजी संयुक्त अरब अमीराती (UAE) ची राजधानी दुबईमध्ये दोन दिवसीय भारत-UAE भागीदारी शिखर परिषदेचा शुभारंभ करण्यात आला.

भारत आणि संयुक्त अरब अमीराती यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी ही परिषद आयोजित केली जाते.

दोन्ही देशांतील सुमारे ८०० उद्योजक, मंत्री, अधिकारी, गुंतवणूकदार आणि शैक्षणिक संस्था या UAE कडून भारतामध्ये गुंतवणूकीत लक्षणीय वाढ करण्याच्या हेतूने परिषदेत भाग घेत आहेत.

 परिषदेत धोरणात्मक भागीदारी, गुंतवणूकीची अंमलबजावणी आणि प्रवास व पर्यटन क्षेत्रासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चेसाठी भर दिला जात आहे.