हैदराबादमध्ये २० वा भारतीय आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव आयोजित
या वर्षी हैदराबादमध्ये २० वा भारतीय आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत हा महोत्सव चालणार आहे.


महोत्सवाचे उद्घाटन हैदराबादच्या शिल्प कला वेदिका या ठिकाणी सिनेमॅटोग्राफी मंत्री तलासनी श्रीनिवास यादव यांच्या हस्ते झाले. 
या कार्यक्रमाचे आयोजन चिल्ड्रेन फिल्म सोसायटी इंडिया (CFSI), तेलंगणा राज्य शासन आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय यांनी संयुक्तपणे केले.

महोत्सवाचे उद्घाटन ‘स्कूल चलेगा’ या बालपटाने करण्यात आले आणि या महोत्सवात तेलंगणा आणि हैदराबाद मधील ४० चित्रपटगृहांमध्ये विक्रमी ३१७ चित्रपटांचे प्रदर्शन केले जाणार आहे.


भारतीय आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव (International Children’s Film Festival of India) हा भारतामधील युवा प्रेक्षकांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बालपटांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने दर दोन वर्षांनी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी इंडियाकडून आयोजित होणारा कार्यक्रम आहे. हा महोत्सव ‘द गोल्डन एलिफंट’ या नावाने प्रसिद्ध आहे. 

११ मे १९५५ रोजी स्थापित चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी इंडिया ही भारत सरकारची एक प्रमुख संस्था आहे, जी विविध भारतीय भाषांमध्ये बालपटांची निर्मिती आणि विविध दूरदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करते.ग्रेटर नोएडा येथे ‘ऑर्गनिक वर्ल्ड कॉंग्रेस-२०१७’ आयोजित
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंह यांच्या हस्ते ग्रेटर नोएडा येथे ९ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०१७ या काळात ‘ऑर्गनिक वर्ल्ड कॉंग्रेस-२०१७’ परिषद भरविण्यात आली आहे.

याचे आयोजन इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गनिक फार्मिंग मूव्हमेंट्स (IFOFM) आणि OFI या संघटनांनी केले. या कार्यक्रमात जगभरातील ११० देशांमधून १४०० प्रतिनिधी आणि २००० भारतीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

‘ऑर्गनिक वर्ल्ड कॉंग्रेस’ या कृषी परिषदेचे आयोजन दर तीन वर्षात एकदा निवडक देशात केले जाते. याचे आयोजन इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गनिक फार्मिंग मूव्हमेंट्स (IFOFM) संघटना करते.राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला विजेतेपद
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने नागपूरमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत सायनाने पी.व्ही. सिंधूवर मात करत आपल्या कारकिर्दीतले तिसरे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. 

पुरुषांच्या अंतिम सामन्यात एच.एस. प्रणॉयने किदम्बी श्रीकांतवर मात करुन धक्कादायक निकालाची नोंद केली होती.आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमला सुवर्णपदक
जागतिक स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मेरी कोमने (Boxer Mary Kom) आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची (Gold Medal) कमाई केली. 

अंतिम सामन्यात मेरी कोमने उत्तर कोरियाच्या किम ह्योंगला पराभूत केले. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत ४८ किलो वजनी गटातील तिचे पहिले सुवर्ण आहे. 

यापूर्वी मेरी कोम ५१ किलो वजनी गटातून सहावेळा या स्पर्धेत उतरली होती. यात २००३, २००५, २०१० आणि २०१३ असे चार वेळा तिने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तर २००८ मध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. 

यावेळी ती पहिल्यांदाच ४८ किलो गटात या स्पर्धेत सहभागी झाली होती. उपांत्य फेरीत जपानच्या सुबोसाविरुद्ध आक्रमक खेळ दाखवत तिने अंतिम फेरी गाठली होती.भारत बांगलादेश दरम्यान नव्या रेल्वेला हिरवा झेंडा
भारतातील कोलकत्यापासून बांगलादेशातील खुलना यादरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याच्या निर्णयाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्री शेख हसीना यांच्यात गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हा निर्णय घेण्यात आला. 


OHEPEE प्रकल्पासाठी भारत व जागतिक बॅंक यांच्यात $119 दशलक्षचा कर्ज करार झाला
ओडिशा राज्यामधील निवडक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविण्यात सुलभता यावी म्हणून भारत सरकारने जागतिक बँकेसोबत $119 दशलक्षचा कर्ज करार केला आहे.

जागतिक बँक गटाच्या इंटरनॅशनल बँक फॉर रीकंस्ट्रक्शन अँड डेवलपमेंट कडून हे कर्ज ‘ओडिशा उच्च शिक्षण उत्कृष्ट व समानता कार्यक्रम (Odisha Higher Education Programme for Excellence & Equity -OHEPEE)’ प्रकल्पासाठी दिले जाणार आहे.

शिक्षणात गुणवत्ता आणणे आणि सर्व विद्यार्थ्यांना निवडलेल्या संस्थांमध्ये न्याय्य प्रवेश मिळवणे आणि ओडिशातील उच्च शिक्षण प्रणालीचे सुशासन विस्तारीत करणे, हे OHEPEE प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. सीरिया पॅरिस हवामान बदल करारावर स्वाक्षरी करणार
सीरियाने हवामान बदलावरील पॅरिस करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयासोबतच पॅरिस करारामध्ये सहभागी नसणारा आता अमेरिका हा एकमेव देश उरलेला आहे, जो या करारामध्ये सामील झालेला नाही. 
अमेरिकाने जून २०१७ मध्ये पॅरिस करारामधून आपले पाऊल मागे घेतले.

पॅरिस करार हा २०२० साली सुरू होणार्‍या हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, परिस्थितीशी जूळवून घेण्यासाठी आणि आर्थिक बाबी हाताळण्यासाठी युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) च्या चौकटीतील एक (पहिलाच) करार आहे. 

आराखडीत कराराच्या भाषेवरच्या करारामध्ये पॅरिस मध्ये UNFCCC च्या २१ व्या पक्षीय परिषदेत १९५ देशांमधील प्रतिनिधींद्वारा १२ डिसेंबर २०१५ ला एकमताने अंगिकारले गेले. 

पूर्व-औद्योगिक पातळीच्या वर 2°C च्या खाली जागतिक सरासरी तापमान वाढ नियंत्रित करणे आणि पूर्व-औद्योगिक पातळीच्या वर 1.5 °C पर्यंत तापमान वाढ मर्यादित करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच अनेक कारकांच्या हेतूने हा करार आहे.चेन्नईचा ‘UNESCO रचनात्मक शहरांचे नेटवर्क’ यादीत समावेश
‘UNESCO रचनात्मक शहरांचे नेटवर्क’ या यादीत तामिळनाडूची राजधानी चेन्नई या शहराचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नईला शहरामधील संगीताच्या समृद्ध परंपरेमधील योगदानासाठी हा सन्मान मिळाला. यापूर्वी भारताच्या जयपूर आणि वाराणशी शहरांचा समावेश या यादीत करण्यात आलेला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ वैज्ञानिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ने ३१ ऑक्टोबरला ४४ देशांच्या ६४ शहरांची ही यादी ‘UNESCO क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क’ अंतर्गत प्रसिद्ध केली. 

यासोबतच, सादरीकरण, संगीत, हस्तकला आणि लोककला, माध्यम कला, संरचना, चित्रपट आणि साहित्य या सात क्षेत्रांसंबंधी या नेटवर्कमध्ये एकूण ७२ देशांच्या १८० शहरांचा समावेश आहे.

याशिवाय, नेटवर्कमध्ये काहिरा (इजिप्तची राजधानी), केपटाउन व डरबन (दक्षिण आफ्रिका), ब्राझीलिया (ब्राझील), कंसास (अमेरिका) आणि मिलान (इटली) या शहरांचा देखील समावेश आहे. 

शाश्वत विकास आणि नवीन शहरी उद्दिष्टांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०३० सालच्या ध्येयाच्या क्रियान्वयनला अनुसरून हे नेटवर्क शहरांना आपले सातत्य राखण्यास समृद्ध संस्कतीची भूमिका प्रदर्शित करण्यास मंच मिळणार.

UNESCO क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) हा UNESCO चा २००४ साली सुरू करण्यात आलेला एक प्रकल्प आहे, ज्यामधून त्यांच्या शहरी विकासात एक प्रमुख घटक म्हणून रचनात्मक बाब ओळखलेल्या शहरांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन दिले जात आहे.ब्रिटनच्या मंत्रिमंडळातून प्रीती पटेल यांचा राजीनामा
मूळ भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या मंत्री प्रीती पटेल यांनी त्यांच्या वादग्रस्त इस्रायल दौर्‍यानंतर ब्रिटनच्या थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.

आफ्रिका दौर्‍यावर असलेल्या प्रीती पटेल यांना पंतप्रधान थेरेसा मे यांनी परत बोलावले होते. प्रीती पटेल यांनी त्यांच्या वादग्रस्त इस्रायल दौर्‍यात पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्यासह नियमात न बसणार्‍या सुचना न देता अनेक अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या होत्या.