5 वे बालकुमार साहित्य संमेलन अकोल्यात
विदर्भ साहित्य संघाचे 5 वे बालकुमार साहित्य संमेलन दि. 1 व 2 डिसेंबर रोजी साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशीम रोड, अकोला येथे संपन्न होत आहे.

महाराष्ट्राच्या लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार 
दिव्यांग या विषयावरील राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्ट्राच्या तीन लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

पुण्यातील दंतवैद्यक व दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे यांच्या कर्णबधीर मुलावर आधारित ‘अजान’ या लघुपटाला 4 लाख रुपये आणि प्रशस्त‌‌पित्राने गौरविण्यात आले. 

मुंबईच्या ज्योत्स्ना पुथरा दिग्दर्शित ‘झेब्रा क्रॉसिंग’ या टीव्ही स्पॉटला अव्वल पुरस्कारासह 5 लाख रुपये आणि प्रशस्त‌पित्राने तर मुंबईच्याच सीमा आरोळकर दिग्दर्शित ‘धीस इज मी’ या टीव्ही स्पॉटला व्दितीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण आणि चित्रपट महोत्सव विभागाच्या वतीने सिरीफोर्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘दिव्यांग सक्षमीकरण लघुचित्रपट स्पर्धा-2017’ चे सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते 9 नोव्हेंबर रोजी पुरस्कार वितरण करण्यात आले.गबार्ड – जागतिक हिंदू काँग्रेस 2018 च्या अध्यक्षा
तुलसी गबार्ड यांना वर्ष 2018 मध्ये शिकागो (अमेरिका) च्या इलिनोइस येथे होणार्‍या दुसरी ‘जागतिक हिंदू कांग्रेस (WHC)’ च्या अध्यक्षा म्हणून निवडण्यात आले आहे. ही परिषद 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2017 या काळात आयोजित आहे.

जागतिक हिंदू कांग्रेस या परिषदेचे आयोजन वर्ल्ड हिंदू फाउंडेशनतर्फे केले जाते. दर चार वर्षानंतर आयोजित केले जाणारे WHC हे एक वैश्विक मंच आहे, जेथे हिंदू समुदायाचे व्यक्ती एकमेकांशी त्यांच्या विचारांचे आदानप्रदान करतात. 

पहिली जागतिक हिंदू कांग्रेस वर्ष 2014 मध्ये नवी दिल्लीत आयोजित केली गेली होती.

अमेरिकेच्या परिषदेमधील पहिली हिंदू मंत्री तुलसी गबार्ड (36 वर्षीय) या हवाईमधून तीनदा अमेरिकेच्या संसदेत डेमोक्रेटिक सदस्यच्या रूपात निवडून आल्या. सध्या त्या हाऊस कांग्रेशनल कॉकसच्या सह-अध्यक्ष आहेत.GST परिषदेने 177 वस्तूंवरील GST मध्ये कपात करत केवळ 50 वस्तूंना 28% श्रेणीत ठेवले
GST परिषदेने 177 वस्तूंवरील GST कमी करून त्यांवरील 28% GST आता 18% इतका केला आहे. यापुढे केवळ चैनीच्या आणि अनावश्यक अशा 50 वस्तूंवरच 28% GST आकारला जाणार आहे.

स्वस्त होणार्‍या वस्तूंमध्ये चॉकलेट, खाद्यपदार्थ, मार्बल, प्लायवूड, ग्रॅनाईट, सॅनेटरी नॅपकिन, लेखन साहित्य, घड्याळे, खेळणी आदी. वस्तूंचा समावेश आहे. 
रंग, सिमेंट, वॉशिंग मशीन, फ्रिज, तंबाखू, सिगारेट आदीसह चैनीच्या वस्तू स्वस्त होणार नाहीत.

मासिक कर भरणा करणार्‍या सर्व करदात्यांसाठी तिमाही रिटर्न दाखल करण्यास परिषदेची परवानगी मिळू शकते. याव्यतिरिक्त, कराचे सपाट दर आणि अनुपालनात सुलभता प्रदान करणारी ‘संयोजन योजना (composition scheme) पुढे सुलभ केली जाऊ शकते. 

उत्पादक आणि उपहारगृहांसाठी सध्याच्या अनुक्रमे 2% आणि 5% च्या चालू दरांपेक्षा सपाट 1% दर गृहीत धरला जाईल.

वस्तू व सेवा कर (Goods and Services Tax -GST) हा एक अप्रत्यक्ष कर आहे, जो 1 जुलै 2017 पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आला, ज्याने केंद्र व राज्य शासनांनी आकारलेल्या विविध करांचा त्याग केला. 

संविधान (101 वी दुरूस्ती) कायदा 2017 म्हणून GST सादर करण्यात आले. GST हे GST परिषदेद्वारे संचालित केले जाते आणि त्याचे अध्यक्ष भारताचे वित्तमंत्री आहेत. GST अंतर्गत 0%, 5%, 12%, 18% आणि 28% या दरांनी कर लागू आहेत. फ्रान्स हा GST ची अंमलबजावणी करणारा पहिला देश आहे.


भारत UNESCO च्या कार्यकारी मंडळाचा सदस्य म्हणून पुन्हा निवडून आले
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) च्या कार्यकारी मंडळामध्ये सदस्यच्या रूपात भारताला पुन्हा एकदा निवडण्यात आले.

30 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2017 या काळात फ्रान्सच्या पॅरिसमध्ये दर दोन वर्षांनी होणार्‍या UNESCO च्या महासभेच्या 39 व्या सत्रात यासंबंधी निवडणूक झाली. UNESCO चे कार्यकारी मंडळ ही प्रमुख निर्णय घेणारी संस्था आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरात स्थित संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रात कार्य करणारी एक विशेष संस्था आहे. 

या संघटनेची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन, ब्रिटन मध्ये करण्यात आली. UNESCO ची 195 सदस्य राज्ये आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत. 10 नोव्हेंबरला शांती व विकासासाठी ‘जागतिक विज्ञान दिवस’ साजरा 
दरसाल 10 नोव्हेंबरला सयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात जागतिक विज्ञान दिवस साजरा केला जातो. या दिवशी विज्ञान कश्याप्रकारे जागतिक शांती आणि प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकते, या विषयावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

यावर्षी हा दिवस “सायन्स फॉर ग्लोबल अन्डरस्टँडिंग” म्हणजेच ‘वैश्विक समज करिता विज्ञान’ या विषयाखाली साजरा केला गेला.

भारतात ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून हा दिवस दरवर्षी 28 फेब्रुवारीला प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रमन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. डॉ. रमन यांनी 1928 साली आपल्या वैज्ञानिक शोधांना जगापुढे मांडले. या दिवशी विविध देशांमध्ये विज्ञान विभाग, संस्था आणि विद्यापीठांकडून विज्ञानासंबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

जगातल्या प्रत्येक नागरिकांना सर्व वैज्ञानिक शोधांचे महत्त्व आणि त्यांचा उपयोग याविषयी जागरूकता फैलावण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारा हा दिवस साजरा केला जातो.

10 नोव्हेंबर ही तारीख जागतिक विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा 2001 साली सुरू करण्यात आली. या दिनाला प्रथम आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या रूपात 1999 साली हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात साजरा केला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा दिवस साजरा केला जातो.