नवी दिल्लीत २१ व्या ‘जागतिक मानसिक आरोग्य परिषद’ चा शुभारंभ
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते २ नोव्हेंबर २०१७ रोजी नवी दिल्लीत २१ व्या ‘जागतिक मानसिक आरोग्य परिषद’ चा शुभारंभ करण्यात आला आहे.


केयरिंग फाउंडेशन व अन्य संस्थांच्या सहकार्याने वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ या संघटनेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
भारतात पहिल्यांदाच जागतिक मानसिक आरोग्य परिषद भरविण्यात आली आहे. 

याशिवाय राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमामधून भारतात २२ उत्कृष्टता केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे.

वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ (WFMH) ही एक आंतरराष्ट्रीय, बहु-व्यावसायिक गैर-सरकारी संस्था आहे, ज्यामध्ये नागरी स्वयंसेवक आणि माजी रुग्णांचा समावेश आहे. १९४८ साली या संघटनेची स्थापना करण्यात आली. फोर्ब्सच्या १०० सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत पाच भारतीय महिलांचा समावेश
फोर्ब्स नियतकालिकेने प्रसिद्ध केलेल्या जगातील १०० सर्वात सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत यावेळी पाच भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

ICICI बॅंकेच्या अध्यक्ष चंदा कोचर (३२), HCL कॉर्पोरेशनच्या CEO रोशनी नादर मल्होत्रा (५७), बायोकॉनच्या संस्थापक आणि अध्यक्ष किरण मजूमदार-शॉ (७१), अभिनेत्री प्रियांका चोप्रा (९७), HT मीडियाच्या अध्यक्षा शोभना भारतिया (९८) या पाच भारतीय महिलांचा यादीत समावेश आहे. 

भारतीय वंशाच्या परदेशी महिलांमध्ये पेप्सीकोच्या CEO इंदिरा नूयी (११) आणि निक्की हॅले (४३) यांचा समावेश आहे.

यादीत जर्मनीच्या चॅन्सलर एंजेला मर्केल यांनी प्रथम स्थान प्राप्त केले आहे. एंजेला मर्केल या फोर्ब्सच्या यादीत शीर्ष स्थानी सलग सातव्यांदा आणि एकूणच १२ वेळा राहिलेल्या आहेत.मोहम्मद अली जीना यांच्या कन्या दिना वाडिया कालवश
कायद-ए-आझम आणि पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांच्या एकुलत्या एक कन्या दिना वाडिया यांचे २ नोव्हेंबर रोजी न्युयॉर्क येथे निधन झाले, त्या ९८ वर्षांच्या होत्या. 

दिना यांचा जन्म १४ ऑगस्ट १९१९ रोजी मध्यरात्री झाला होता. दिना या १७व्या वर्षी पारशी व्यावसायिक नेविल वाडिया यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर दिना मुंबईत राहिल्या त्यांना दोन मुले झाली त्यानंतर ते वाडियांपासून विभक्त झाले. 

त्यानंतर त्या युकेमध्ये स्थायिक झाल्या. जीना यांच्या मृत्यूनंतर त्यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. त्यानंतर पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल मुशर्रफ यांच्या कार्यकाळात २००४ मध्ये त्यांनी पाकिस्तानला शेवटची भेट दिली. 


अजय बिसारिया – पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांची पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नेमण्यात आले आहे.ही नेमणूक गौतम बंबावले यांच्या जागी करण्यात आली. या नियुक्तीपूर्वी बिसारिया पोलंडमध्ये भारतीय उच्चायुक्त पदावर होते.

गौतम बंबावले यांना नियुक्ती चीनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त केले गेले.

बिसारीया १९८७ सालचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. त्यांनी वर्ष १९९९-२००४ दरम्यान पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे खाजगी सचिव म्हणून कार्य केलेले आहे.भारत-कझाकस्तान यांच्या ‘प्रबल दोस्तक २०१७’ लष्करी सरावाला सुरुवात
भारत आणि कझाकस्तान यांच्या लष्करांनी हिमाचल प्रदेश राज्याच्या बाकलो येथे २ नोव्हेंबर २०१७ पासून १४ दिवसांच्या ‘प्रबल दोस्तक २०१७’ या संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाला सुरुवात केली आहे.

दोनही देशांच्या लष्करी संबंधांना प्रोत्साहन देणे आणि त्यांची आंतरिक क्षमता बळकट करण्याचा या सरावाचा उद्देश्य आहे. भारतीय तुकडीत ११ व्या गोरखा राइफल्स दलाचे सैनिक या सरावात सहभागी आहेत.सर्वाधिक कुपोषित बालके भारतात 
कुपोषित बालकांच्या संख्येत भारत संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर आहे असल्याचे ASSOCHEM आणि EY यांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. जगभरातील एकूण कुपोषित बालकांपैकी५०% तर भारतातच आहे, असे अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

१-५ वर्षे वयोगटातील कमी वजन असलेल्या बालकांच्या सर्वाधिक प्रमाणात झारखंड (४२%) प्रथम स्थानी आणि त्यानंतर बिहार (३७%), मध्यप्रदेश (३६%) आणि उत्तरप्रदेश (३४.१%) या राज्यांचा क्रमांक लागतो. तर सर्वाधिक कमी प्रमाण मणिपूर (१४.१%) राज्यात होते.


वयोमानाने कमी उंचीच्या बालकांच्या सर्वाधिक प्रमाणात उत्तरप्रदेश (५०.४%) प्रथम स्थानी तर सर्वाधिक कमी प्रमाण केरळ (१९.४%) राज्यात आहे. 

उंचीप्रमाणे कमी वजन असणार्‍या बालकांच्या सर्वाधिक प्रमाणात अरुणाचल प्रदेश (१९%) प्रथम स्थानी तर सर्वाधिक कमी प्रमाण सिक्कीम (५%) राज्यात आहे.WEF ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०१७ मध्ये भारताची २१ स्थानांनी घसरण 
जागतिक आर्थिक मंच (WEF) ने प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०१७’ मध्ये भारताची २१ स्थानांनी घसरण झालेली आहे आणि आता भारत यादीत १०८ व्या स्थानी आहे.

आरोग्य, शिक्षण, काम करण्याची जागा आणि राजकीय प्रतिनिधित्व या चार प्रमुख घटकांवर यावर्षीचा अहवाल तयार करण्यात आला आहे.

यादीत स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत आईसलँड (समानतेचे प्रमाण८८%) अव्वल स्थानी आहे. त्यानंतर नॉर्वे आणि फिनलँड या देशांचा शीर्ष तीन देशांमध्ये क्रमांक लागतो. 
शीर्ष १० देशांमध्ये रवांडा, स्वीडन, निकारागुआ, स्लोवेनिया, आयरलँड, न्यूजीलँड, आणि फिलीपीन्स या अन्य देशांचा समावेश आहे.

२००६ सालापासून WEF स्त्री-पुरुष समानतेमधील अंतराविषयी अभ्यास करीत आहे. यात असे आढळून आले आहे की, या दशकात हे अंतर धीमे पण स्थिरपणे प्रगतीपथावर होते, परंतू ही प्रगती वर्ष २०१७ मध्ये थांबली आणि प्रथमच स्त्री-पुरुष समानतेमधील अंतर वाढले.

दक्षिण आशियात, चीन (१००) आणि बांग्लादेश (४७) हे देश आघाडीवर आहेत.