पंडित कशाळकर यांना तानसेन पुरस्कार जाहीर 
संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


कशाळकर हे हिंदुस्‍थानी शास्त्रीय संगीत गायक असून ते ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत असणारे गवई आहेत. त्यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेले आपले वडील नागेश दत्तात्रेय कशाळकर यांच्याकडे घेतले.

नागपूर विद्यापीठातून त्यांनी संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. नंतर त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांच्याकडे संगीताभ्यास केला.

जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.

तसेच त्यांनी आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात १९८३ ते १९९० दरम्यान काम केले. यापूर्वी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीत आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू 
गेल्या पंचवीस वर्षांपासून रेंगाळलेले आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजधानीतील पहिलेवहिले स्मारक म्हणून ओळखले जात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र ७  डिसेंबर पासून सुरू होत आहे.

२० एप्रिल २०१५ रोजी मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते.  
‘१५, जनपथ’ असा तिचा पत्ता असून प्रसिद्ध ‘ल मेरिडियन’ या पंचतारांकित हॉटेलला खेटून ही वास्तू आहे. 

तसेच या केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची शक्यता असून दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा सरकारचा विचार आहे. सामाजिक विषयांसाठी हे केंद्र सरकारसाठी ‘थिंक टँक’ असू शकते. स्वदेशी ‘आकाश’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या स्‍वदेशी बनावटीच्या ‘आकाश’ क्षेपणास्त्राची ITR रेंज चांदीपुर येथून यशस्वी चाचणी घेतली गेली आहे.
या क्षेपणास्त्राला भारतीय लष्करात जमिनीवरून हवेत कमी पल्ल्याची मारक क्षमता असणारे क्षेपणास्त्र (SRSTM) म्हणून सामील करण्यात आलेले आहे. 

हे पहिले SAM आहे, ज्यामध्ये रेडियो तरंगांच्या आधारावर आपल्या लक्ष्यला भेदण्यास स्वदेशी तंत्रज्ञान युक्त प्रणालीचा वापर केला गेला आहे. ८ राज्यांमध्ये हिंदू समुदायाला अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना
८ राज्यांमध्ये हिंदू समुदायाला अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी अल्पसंख्याक आयोगाने तीन सदस्यीय अभ्यास समितीची स्थापना केली आहे.

समितीत जॉर्ज कुरियन (अध्यक्ष), सुलेखा कुंभारे आणि मनजीत सिंह राई यांचा समावेश आहे. समिती आपला अहवाल तीन महिन्यात सोपवणार आहे.

समिती जम्मू-काश्मीर, पंजाब, अरुणाचल प्रदेश, मणिपुर, मेघालय, मिजोरम, नागालँड आणि लक्षद्वीप या राज्य/केंद्रशासित प्रदेशांमधील हिंदू समुदायाची लोकसंख्या, स्थिती आणि त्यासंबंधित अन्य मुद्द्यांचा अभ्यास करणार सशस्त्र सेना ध्वज दिवस ७ डिसेंबर
७ डिसेंबर २०१७ रोजी भारतीय सशस्त्र दलांकडून ‘सशस्त्र सेना ध्वज दिवस’ (Armed Forces Flag Day) साजरा करण्यात आला आहे.
दरवर्षी ७ डिसेंबरला ‘सशस्त्र सेना ध्वज दिवस’ हा भारतीय सशस्त्र दलांच्या कर्मचार्‍यांच्या कल्याणाहेतू भारतीयांकडून निधी संकलित करण्यासाठी समर्पित असा एक दिवस आहे. 

हा दिवस ७ डिसेंबर १९४९ पासून भारतात दरवर्षी साजरा केला जात आहे. देशाच्या सुरक्षेत शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाहेतू हा दिवस साजरा करण्यात येतो. भारताने प्रथमच दक्षिण आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद जिंकले
गुवाहाटी (आसाम) मध्ये खेळल्या गेलेल्या ‘दक्षिण आशियाई बॅडमिंटन स्पर्धा २०१७’ च्या भारतीय संघाने सांघिक विजेतेपद मिळविले आहे.
यासोबतच भारताने नेपाळचा पराभव करत आपले पहिले दक्षिण आशियाई क्षेत्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद जिंकले आहे.

त्यात आर्यमान टंडन (मुलांचा एकल गट), अश्मिता चालीहा (मुलींचा एकल गट), अर्निताप दासगुप्ता व कृष्ण प्रसाद जी. (मुलांचा दुहेरी गट) यांनी स्पर्धेच्या तीनही गटात विजेतेपद जिंकले. 


ताजमहाल जागतिक वारसा स्थळांमध्ये दुसर्‍या स्थानी
भारताची ओळख असलेला संगमरवरी मकबरा ‘ताजमहाल’ हे युनेस्कोचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट जागतिक वारसा स्थळ (वर्ल्ड हेरिटेज साइट) असल्याचे एका ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलने म्हटले आहे.

मोगल सम्राट शाहजहान याने त्याची पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ बांधलेला आणि दरवर्षी ८० लाखांहून अधिक पर्यटक भेट देत असलेला ताजमहाल याचे स्थान कंबोडियाच्या अंकोर वॅट मंदिरानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

देशी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची मते आणि त्यांनी दिलेली क्रमवारी यांच्या आधारे ‘ट्रिप अ‍ॅडव्हायझर’ने जगभरातून युनेस्कोच्या सवरेत्कृष्ट सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांची यादी प्रसिद्ध केली आहे.

तसेच या यादीतील सर्वात लोकप्रिय वारसा स्थळांमध्ये चीनच्या उत्तरेकडील क्वी राजघराण्याच्या झु डा याने ख्रिस्तपूर्व १३६८ साली बांधलेल्या चीनच्या महाकाय भिंतीचा समावेश आहे. 

दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशातील माचु पिचुने यादीत चौथा क्रमांक मिळवला आहे. याशिवाय ब्राझीलमधील इगुआझु राष्ट्रीय उद्यान, इटलीतील ‘सासी ऑप मटेरा’, पोलंडमधील ऐतिहासिक क्रकॉओ, इस्रायलमधील जेरुसलेम हे पुरातन शहर आणि तुर्कस्तानमधील इस्तंबुलची ऐतिहासिक ठिकाणे यांचाही यादीत समावेश आहे. ‘द सायलन्स ब्रेकर्स’ ‘मी टू’ मोहिमेला पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 
अमेरिकेच्या प्रतिष्ठित ‘टाइम’ नियतकालिकाने ‘२०१७ पर्सन ऑफ द इयर’ म्हणून ‘द सायलन्स ब्रेकर्स’ या हॉलीवुडमधील लैंगिक शोषण आणि अत्याचार विरुद्ध आवाज उठवणार्‍या सर्व महिलांच्या सन्मानार्थ हा सन्मान आहे. 

‘टाइम’ नियतकालिकाने ‘मी टू’ (#MeToo) अभियानात भाग घेणार्‍या ‘सायलन्स ब्रेकर्स’ (म्हणजेच आपले मौन तोडणार्‍या) महिलांना समर्पित केला आहे. 

‘मी टू’ या ऑनलाईन हॅशटॅग अभियानातून लैंगिक अत्याचाराचा सामना कराव्या लागलेल्या अनेकांनी जाहीरपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या अभियानाला जगभरातून मोठा प्रतिसाद लाभला होता.

हॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक हार्वे वाईनस्टिन यांचे लैंगिक अत्याचार प्रकरण उजेडात आल्यावर ‘मी टू’ या ऑनलाईन मोहिमेला सुरुवात झाली होती.

या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दुसरे आणि चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांना तिसरे स्थान प्राप्त झाले आहे भारत आणि क्युबा यांच्यात आरोग्य क्षेत्रातील सहकार्य करार
भारत आणि क्यूबा यांच्यात आरोग्य क्षेत्रात परस्पर सहकार्याला वाढीव प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. 

या सामंजस्य कराराचा उद्देश्य म्हणजे तांत्रिक, वैज्ञानिक, आर्थिक आणि मनुष्यबळाला आरोग्य क्षेत्रात आणून दोन्ही देशांमधील व्यापक आंतर-मंत्रीस्तरीय आणि आंतर-संस्थात्मक सहकार्य प्रस्थापित करणे, ज्यामधून दोन्ही देशांतील आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन यांमधील पायाभूत सोयी-सुविधा, मनुष्य आणि सामुग्री यांची गुणवत्ता आणि पोहोच सुधारण्याचे अंतिम लक्ष्य साधण्यास प्रयत्न केले जातील. 

क्यूबा हा कॅरेबियन समुद्रामध्ये स्थित एक प्रजासत्ताक बेटराष्ट्र आहे. हवाना ही क्यूबाची राजधानी आहे. क्यूबन पेसो हे देशाचे चलन आहे.