चालू घडामोडी १९ व २० डिसेंबर २०१७

नागपूरमध्ये 'जागतिक संत्रा महोत्सव' संपन्न 
महाराष्ट्र राज्यातल्या नागपूर शहरात १६ ते १८ डिसेंबर २०१७ या कालावधीत प्रथम 'जागतिक संत्रा महोत्सव' साजरा केला गेला आहे.

भारतात ९८९००० हेक्टर क्षेत्रात दरवर्षी जवळपास ९६.३९ लाख टन निंबू वर्गीय फळांचे उत्पादन घेतले जाते. वर्ष २०१५-१६ दरम्यान एकूण ६३ लाख हेक्टर क्षेत्रात ९ कोटी मेट्रिक टनहून अधिक फळांचे उत्पादन घेतले गेले. मेघालय सामाजिक लेखापरिक्षण कायदा करणारे भारतातले पहिले राज्य
मेघालय राज्य हे सामाजिक लेखापरिक्षण कायदा करणारे भारतातले पहिले राज्य ठरले आहे. 'मेघालय समुदाय सहभाग व जनसेवा सामाजिक लेखापरिक्षण कायदा-२०१७' राज्यात लागू करण्यात आला आहे.

या कायद्यान्वये राज्य शासनाचा एक भाग म्हणून शासकीय कार्यक्रमांचे व योजनांचे सामाजिक लेखापरिक्षण केले जाणार. हा कायदा राज्य शासनाच्या ११ विभाग आणि २१ योजनांना लागू आहे.

मेघलयात या कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या 'कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि मूल्यांकन' विभागाचे प्रधान सचिव के. एन. कुमार आहेत. सामान्य नागरिकांशी थेट संपर्क साधून लेखापरिक्षण करण्याकरिता 'सोशल ऑडिट फॅसिलिटेटर' नियुक्त केले जाईल. भारतीय जनता पक्षाने गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक जिंकली
हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप/BJP) बहुमत प्राप्त केले आहे.

हिमाचल प्रदेशामध्ये एकूण ६८ जागांपैकी भाजपने ४४ जागा, तर काँग्रेस पक्षाने २१ आणि उर्वरित जागा अन्य पक्षांनी जिंकल्या.

गुजरातमध्ये एकूण १८२ जागांपैकी भाजपने ९९ जागा, तर काँग्रेस पक्षाने ७७ आणि उर्वरित जागा अन्य पक्षांनी जिंकल्या.डोंगराळ भागात गंगेपासून 50 मीटरच्या क्षेत्रात बांधकामास मनाई असावी
राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) ने डोंगराळ भागात गंगा नदीच्या आसपास ५० मीटर क्षेत्राच्या आत कोणत्याही बांधकामावर बंदी घालण्यात येईल कारण आता ते क्षेत्र 'बिन-विकास क्षेत्र' म्हणून मानले जाईल, असा निर्णय दिला आहे.

'बिन-विकास क्षेत्र' म्हणजे असे क्षेत्र जेथे वाणिज्यिक किंवा निवासी इमारतींसोबतच कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ शकत नाही.


नदीच्या किनाऱ्यापासून ५० ते १०० मीटर यामध्ये येणारे क्षेत्र "नियामक" क्षेत्र म्हणून मानले जाईल आणि राज्य जोपर्यंत विशिष्ट धोरणे तयार करत नाही तोपर्यंत या क्षेत्रात बांधकामाच्या क्रियाकलापांवर बंदी असणार आहे.

राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) हे राष्ट्रीय हरित प्राधिकरण अधिनियम-२०१० अंतर्गत स्थापन करण्यात आले आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन या संबंधित कोणत्याही कायदेशीर अधिकाराच्या अंमलबजावणीसह इतर नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षणाशी संबंधित प्रकरणांची प्रभावीपणे आणि वेगाने विल्हेवाट लावण्यासाह पर्यावरणविषयक वाद हाताळण्यासाठी आवश्यक कौशल्य असलेले हे एक विशेष मंडळ आहे.
लद्दाखमध्ये 'लोसर' महोत्सवाला सुरुवात
तिबेटच्या लद्दाखमध्ये १५ दिवस चालणारा 'लोसर' महोत्सव साजरा केला जात आहे. 

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी लद्दाखमध्ये 'लोसर' महोत्सव साजरा केला जातो. या सांस्कृतिक उत्सवादरम्यान बौद्ध भिक्षुकांकडून प्रार्थना, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्राचीन रीती आणि पारंपारिक प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते.राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुशील कुमारने सुवर्णपदक पटकावले
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या 'राष्ट्रकुल कुस्ती' स्पर्धेत भारताच्या सुशील कुमारने सुवर्णपदक जिंकले.

स्पर्धेच्या ७४ किलो फ्रीस्टाईल गटात झालेल्या अंतिम लढतीत सुशील कुमारने न्यूझीलंडच्या आकाश खुल्लरचा पराभव केला. याच गटातले कांस्यपदक भारताच्या परविन राणाने जिंकले.

'राष्ट्रकुल कुस्ती' अजिंक्यपद ही राष्ट्रकुल समूहातील देशांमधील शीर्ष कुस्तीपटूंसाठी सुरू केलेली स्पर्धा आहे. ही स्पर्धा राष्ट्रकुल खेळाशी संलग्न नाही आणि कोणत्याही देशाच्या कोणत्याही क्रीडा संस्थेकडून अधिकृतता नाही. स्कॉटलंडच्या ग्लास्गो येथे १९८५ साली पहिल्यांदा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.सेबॅस्टियन पिनरा चिलीचे नवे राष्ट्रपती
सेबॅस्टियन पिनरा यांनी चिलीमध्ये नुकतीच झालेली राष्ट्रपती पदाची निवडणुक जिंकलेली आहे.

चिलीमधील अब्जाधीश आणि नेता पिनरा यांनी त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या एलेखान्दो गीलर यांचा पराभव केला. पिनेरा यांनी ५४% मते मिळवलीत.

चिली हा दक्षिण अमेरिकेमधील एंडिज पर्वत आणि प्रशांत महासागर यामध्ये स्थित देश आहे. सॅंटियागो शहर देशाची राजधानी असून देशाचे चलन चिली पेसो हे आहे.जुआन ऑरलँडो हर्नांडेझ होंडुरास देशाचे नवे राष्ट्रपती
जुआन ऑरलँडो हर्नांडेझ यांनी होंडुरास देशाच्या राष्ट्रपती पदासाठी झालेली निवडणूक जिंकलेली आहे.

होंडुरास हा मध्य अमेरिकामधील एक देश आहे, ज्याला कॅरिबियन सागरी किनारपट्टी आणि उत्तरेस पॅसिफिक महासागर लाभलेले आहे. टेगुसिगल्पा ही देशाची राजधानी आहे आणि होंडुरियन लंपिरा हे देशाचे चलन आहे.