एसटीआय पूर्व २०१५ उत्तरे (१९ जून २०१६)

०१. परमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती?
—–> जातिसंस्था नष्ट करणे, स्त्री शिक्षणाला उत्तेजना देणे, पुनर्विवाहास प्रेरित करणे

०२. २०१६ चे एडगर एलन पो पारितोषिक मिळविणाऱ्या भारतीय अमेरिकन पत्रकार नीला बॅनर्जी या ———— नावाच्या वृत्त संस्थेसाठी काम करतात

—–> इनसाइड क्लायमेट न्युज

०३. फ्रेंच सरकारचा लिजेंड ऑफ ऑनर हा पुरस्कार प्राप्त झाला?
—–> पंडीत रवीशंकर, सत्यजीत रॉंय

* प्रश्न बाद होण्याची शक्यता आहे

०४. खालील विधाने विचारात घ्या?
अ. भारताने २०१५ मध्ये जगात सर्वाधिक भात निर्यात करण्याच्या बाबतीत थायलंडवर मात केली आहे.
ब. भारताने २०१५ मध्ये १०.२३ दशलक्ष टनांची निर्यात केली आहे.
क. व्हिएतनाम हा भात निर्यात करणारा तिसरा मोठा देश आहे.
ड. चीन हा भात आयात करणारा प्रथम क्रमांकाचा देश आहे.
—–> सर्व विधाने सत्य आहेत
०५. २०१६- १७रेल्वे अंदाजपत्रक सादर करतेवेळी घोषित केल्या गेलेल्या नवीन रेल्वे गाड्याबाबत जोड्या लावा
—–>
तेजस:- अतिवेगवान गाडी (१३० की.मी प्रती तास)
हमसफर:- पूर्णतः वातानुकुलीत
अंत्योदय:- पूर्णतः अनारक्षित सेवा
उदय:- डबल डेकर वातानुकुलीत
०६. मेक इन इंडिया सप्ताहबाबत कोणते विधान बरोबर नाही?
अ. त्याचे आयोजन मुंबईमध्ये १३ ते १८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान केले गेले.
ब. स्वीडन आणि फिनलँड देशाचे पंतप्रधान उदघाटन सोहळ्याला उपस्थित होते.
—–> एकही नाही
* दोन्ही विधाने बरोबर आहेत.
* Answer Key मध्ये उत्तर केवळ बी असे देण्यात आले आहे.
०७. युनेस्कोच्या मते शैशव म्हणजे जन्मापासून ________ वर्षापर्यंतच्या काळ, ज्या काळात मेंदूची लक्षणीय वाढ होते आणि भविष्यातील शिकण्याचा आणि विकासाचा पाया रचला जातो.
—–> आठ
०८. डिसेंबर २०१५मध्ये सौदी अरेबिया मध्ये झालेल्या ———–निवडणूकामध्ये प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्रियांना मतदान करु देण्यात आले
—–> नगरपालीका
०९. ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?
—–> सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट:- दम लगा के हैशा

१०. शरद जोशी यांनी पुढीलपैकी कोणती ग्रंथ लिहीलेली आहेत?
—–> Answering before God , Down to Earth, The womens Question

११. शेतकऱ्यांना समर्पित असलेली भारतातील प्रथम दूरदर्शन वाहिनी कोणती?
—–> वरीलपैकी एकही नाही.
* खरे उत्तर डी.डी. किसान हे आहे.

१२. खालील विधाने विचारात घ्या?
—–> बरोबर विधाने पुढील आहेत
अ. जागतिक अर्थ परीषदेणे जाहीर केलेल्या जगातील राहण्यायोग्य ६०सर्वोत्तम देशांच्या यादीमध्ये भारताचा २२वा क्रमांक आहे

ब. सदरहू यादी ही स्थिरता, सांस्कृतिक प्रभाव,आर्थिक प्रभाव आणी जीवनशैली यावर आधारीत तयार करणात येते

१३. अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाने अनुसुचीत जाती आणि जमातींना देण्यात येणारे सरकारी नोकऱ्यामध्ये बढतीमधील आरक्षण रद्द केले?
—–> भोपाळ

१४. वरुणा नाविक अभ्यास हा कोणता दोन देशातील आहे?
—–> भारत आणि फ्रांस
१५. खालील पैकी कोणते विधान सत्य आहे.
१. बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता.
२. केशवानंद भरती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता.
३. सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे दोन वेळा बदल करण्यात आले.
४. वरील एकही नाही
—–> ४. वरील एकही नाही
१६. भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलीत झाले?
—–> राष्ट्राची अखंडता
१७. पुढील विधाने वाचून त्यात कोणत्या संघटनेचे वर्णन केले आहे ते ओळखा?
—–> सत्यशोधक समाज
१८. परकीय आक्रमणाच्या कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा झाल्यास खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार निलंबित होऊ शकतात?
—–> भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्य, मुक्त व संचार स्वातंत्र्य
१९. योग्य कथन ओळखा
अ. अनुच्छेद ४७ प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या १४ वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे.
ब. ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे ६ ते १४ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आले.
—–> कथन अ चुकीचे, ब बरोबर
२०. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळच्या राज्यघटनेत समाविष्ट नव्हती परंतु ज्याचा समावेश नंतर ४२ व्या राज्यघटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला?
—–> कामगारांना व्यवस्थापनात सहभाग मिळावा यासाठी पावले उचलणे, सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक साहाय्य देणे, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीव सृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे.
२१. खालील विधाने विचारात घ्या
अ. सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन जोडली जाणारे महाराष्ट्र हे देशातील पाहिले राज्य आहे.
ब. सी.सी.टी.व्ही. निगराणीखाली असलेले पुणे हे देशातील पहिले शहर ठरले आहे.
—–> दोन्ही विधाने चुकीची आहेत

२२. विभाजनानंतरच्या आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती ———— सारखी बनविली जाणार आहे?
—–> सिंगापूर

२३. श्रीपाद अमृत डांगे, शौकत उस्मानी, मुझफ्फर अहमद व नलिनी गुप्ता यांना ज्या खटल्यात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली तो खटला कसा ओळखला जातो?
—–> कानपूर कट
२४. मद्रासमध्ये बी.ए. करता अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती. लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत. तिला रस्त्यात छळत. १९११ मध्ये तिने बी.ए. पूर्ण केले. ती जरी ख्रिश्चन झाली नाही तरी तिला आस्थेने ‘सिस्टर’ म्हणत. ती कोण?
—–> सुब्बालक्ष्मी

२५. जातीयवादाची सुरुवात _______ या ब्रिटिश इतिहास काराने, ज्याने भारतीय इतिहासाच्या प्राचीन काळाला हिंदू काळ व मध्ययुगीन काळाला मुसलीम काळ असे संबोधले होते, त्यांनी केली असे म्हणावे लागेल.
—–> जेम्स मिल

२६. ‘भेटेन नऊ महिन्यांनी’ ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरी-चौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली?
—–> कुंजविहारी
२७. ________ मुख्य उणीव म्हणजे यात मुसलमानांचा, विशेष करून मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळविता आला नाही.
—–> स्वदेशी चळवळीची
२८. अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा _____ होत्या.
—–> महाराणी चिमाबाईसाहेब गायकवाड
२९. खालील जोड्या लावा
—–> बरोबर जोड्या
अ. आय.टी. हार्डवेअर पार्क — द्रोणागिरी
ब. सिपझ — मुंबई
क. मेल्ट्रॉन सेमीकंडक्टर्स ली. — नाशिक
ड. मायक्रो प्रोसेसर आधारित प्रणाली प्रकल्प — कुडाळ
३०. पुढील वाक्यांवरून व्यक्ती ओळखा. त्यांचा जन्म मोरवी येथील टंकारा येथे ७ मार्च १८२४ ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अंबाशंकर होते. आंबाशंकर अतिशय सनातनी होते.
—–> दयानंद सरस्वती
३१. १८५५ मध्ये मुंबई सरकारने २ कोटी रुपयांचे कर्ज रस्ते, कालवे इत्यादी बांधण्यासाठी उभारले. परंतु हा पैसा ______ साठी वापरण्यात आला.
—–> बर्मा युद्ध
३२. भारतात सागरी मत्स्य उत्पादनात खालीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे?
—–>
३३. खालील विधाने पहा.
अ. मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी ९०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला
ब. मावळ प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते
क. दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त असते.
—–>
३४. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो?
—–> NH१७
३५. २०११ च्या जनगणनेनुसार खालील विधाने पहा.
—–> बरोबर विधान
अरुणाचल प्रदेश, मिझोराम व सिक्कीम या राज्यांची घनता १०० पेक्षा कमी आहे.
३६. सोलापूर-धुळे महामार्गावर पडणारी शहरे कोणती?
—–> तुळजापूर, बीड, उस्मानाबाद, चाळीसगाव
३७. जसजशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे. तसतसा शेतीचा स्थूल देशांतर्गत उत्पन्नातील वाटा कमी कमी होत आहे. आज तो केवळ १४.१ टक्क्यांवर आला आहे. असे असले तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती महत्वाची आहे. कारण
—–> शेतीक्षेत्र ५०% हून अधिक लोकांना थेट रोजगार देत आहे.
३८. जोड्या जुळवा
—–> बरोबर जोड्या
सार्वजनिक क्षेत्रातील बँका — २६
खाजगी क्षेत्रातील बँका — २१
भारतातील विदेशी बँका — ४३
प्रादेशिक ग्रामीण बँका — ६४
३९. २६ ऑगस्ट २०१० रोजी खालीलपैकी कोणती बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन करण्यात आली.
—–> स्टेट बँक ऑफ इंदोर
४०. खालील विधाने विचारात घ्या.
प्रधानमंत्री जनधन योजना
—–> वरील सर्व विधाने बरोबर आहेत
४१. सर्वसाधारण मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा किती असतो?
—–> २५ से.मी.
४२. वीज बिलातील एक युनिटचे kWh ऊर्जा मूल्य किती?
—–> ३६X १००००० ज्यूल्स
४३. खगोलशास्त्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा ______ होय.
—–> ऍस्ट्रोसट
४४. वनस्पतीवाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य कोणते?
—–> नत्र
४५. सॅलॅमँडर ह्या प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात?
—–> उभयचर प्राणीवर्ग
४६. बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात.

—–> गॅमा

४७. गार म्हणजे
—–> सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम

४८. पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून “फूल्स गोल्ड” असे ओळखले जाते.
—–> पायराइट

४९. ________ जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.
—–> k

५०. २०० पासून ४०० पर्यंत ४ हा अंक फक्त एकदाच येणाऱ्या संख्या किती?
—–> ३७
५१. “राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो”
—–> योग्य निष्कर्ष
अ. जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असेल तरच विधान सत्य ठरेल
५२. अमोलला एक किलोमीटर अंतर धावायला ४.५ मिनिटे लागतात तर बिट्टू तेच अंतर धावायला ५ मिनिटे घेतो. जर त्यांना एक किलोमीटर अंतरावरील ठिकाणी एकाच वेळेत पोहोचण्याची अपेक्षा असेल तर एकाने दुसऱ्याला किती मीटरची आघाडी घ्यायला हवी?
—–> १०० मीटर
५३. खालील माहितीचा अभ्यास करून त्यावरील प्रश्नांचे उत्तर लिहा

—–> A=C@B

५४. वेन आकृतींची सामान जोडी ओळखा
—–> ३. C, D

५५. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ते शोधा?
—–> ४८

५६. ‘अ’ चे वय ‘ब’ च्या वयापेक्षा तिप्पट आहे. चार वर्षांपूर्वी ‘क’ चे वय ‘अ’ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. चार वर्षानंतर ‘अ’चे वय ३१ वर्षे असेल तर ‘ब’ चे व ‘क’चे आजचे वय किती?
—–> ९,५०

५७. जर सांकेतिक भाषेत ‘Super’ हा शब्द ‘HFKVI’ असा लिहितात. तर ‘MArket’ हा शब्द कसा लिहाल?
—–> NZIPVG

५८. शहराने वाहतुकीचा दर्जा वाढविण्याची गरज आहे.  ……………
—–> एकही नाही

५९. दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात अशा प्रसंगाची संख्या दर्शविणारा पर्याय निवडा
—–> २२

६०. पुढील सामग्री वापरून ‘ran’चे विसंकेतन करा?
—–> विसंकेतनासाठी माहिती a व b पुरेशी नाही.