चालू घडामोडी ६ जानेवारी २०१८

राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांचे निधन
ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे मुंबईमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
ठाणे जिल्ह्यातील नेते डावखरे १९९२ सालापासून सलग चारवेळा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडले गेले. १९९८ साली विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर सलग १८ वर्षे ते उपसभापती होते.६ जानेवारीपासून दिल्लीत 'जागतिक पुस्तक मेळावा २०१८' सुरू
नवी दिल्लीत ६ जानेवारी ते १४ जानेवारी २०१८ या काळात २६ व्या 'जागतिक पुस्तक मेळावा' चे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त (NBT) तर्फे आयोजित हा कार्यक्रम यावर्षी 'पर्यावरण व हवामान बदल' या विषयावर आधारित आहे. यामध्ये जवळपास ४० देशांमधील प्रकाशकांचा सहभाग दिसून येणार आहे. भारतातून ८०० हून अधिक प्रकाशक यामध्ये भाग घेणार आहेत.

'जागतिक पुस्तक मेळावा' हा कोलकाता पुस्तक मेळाव्यानंतर भारताचा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात जुना आणि मोठा पुस्तक मेळावा आहे. पहिल्यांदा १८ मार्च ते ४ एप्रिल १९७२ या काळात नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. 

२०१३ सालापासून राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त (NBT) तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहेकेंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या १ फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर करणार आहे. तसेच आर्थिक वर्ष २०१८-१९ चे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी ते ६ एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात घेतले जाणार आहे. 

अतिरिक्त खर्चाच्या माध्यमातून आर्थिक वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने १ फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी रोजी सुरू होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त अधिवेशनाला मार्गदर्शन करतील. 

तसेच ३१ जानेवारी रोजी आर्थिक पाहणी (इकॉनॉमिक सर्व्हे) सादर केला जाण्याची शक्यता आहे. यंदाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान तर दुसरा टप्पा ५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.

दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जात होता आणि त्यानंतर रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला असतो. मात्र नवे आर्थिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू होते. तेव्हापासूनच प्रस्ताव राबवता यावेत, यासाठी अर्थसंकल्प महिनाभर आधीच सादर जाणार आहे. 

शिवाय स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्याची ५० वर्षांपासूनची परंपराही रद्द करण्यात आली आहे. आता रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर न केला जाता केंद्रीय अर्थसंकल्पात सादर करण्यात येतो.
समान वेतन धोरण कायदा करणारा आइसलँड पहिला देश
आइसलँडमध्ये स्त्री-पुरुष यांना समान वेतन द्यावा असा सक्तीचा कायदा करण्यात आला आहे. हा कायदा लागू करणारे हे जगातील पहिले राष्ट्र ठरले आहे. 

या नवीन कायद्यानुसार, एकाच नोकरीसाठी पुरुषापेक्षा स्त्रीला कमी वेतन देणे हे बेकायदेशीर ठरणार आहे. कंपनी वा संस्थेतील किमान २५ लोकांना समान वेतन धोरणातंर्गत सरकारद्वारे प्रमाणित केलेले वेतन देण्यात यावे. असे करण्यास कंपनी वा संस्थेने असमर्थता दाखवल्यास त्यांना दंड आकारला जाईल. रेल्वेला 'फ्लेक्‍सी फेअर' मधून ६७१ कोटींचे अतिरिक्त उत्पन्न
राजधानी, शताब्दी आणि दुरांतो यांसारख्या रेल्वेगाड्यांमध्ये 'फ्लेक्‍सी फेअर'पद्धती सुरू केल्यापासून रेल्वेला ६७१ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. 

'फ्लेक्‍सी फेअर' पद्धतीनुसार, रेल्वेतील दर दहा टक्के आसनांची तिकीट विक्री झाल्यानंतर तिकीटदर १० ते ५० टक्के वाढतात. रेल्वेमध्ये फ्लेक्‍सी फेअर पद्धती सप्टेंबर २०१६ मध्ये लागू करण्यात आली. 

रेल्वे आणि प्रवाशांचे हित लक्षात घेऊन 'फ्लेक्‍सी फेअर' पद्धतीबाबत अभ्यास करण्यासाठी रेल्वेने नुकतीच एक समिती स्थापन केली आहे. ही समिती लवकरच याबाबतचा अहवाल सादर करणार आहे. समिती रेल्वेला या भाडेपद्धतीबाबतचे अनेक पर्यायही सुचविणार आहे. त्यानंतर रेल्वेमध्ये सगळीकडे ही भाडेपद्धती वापरण्याचा विचार करण्यात येईल. अमेरिकाने पाकिस्तानला दिली जाणारी $1.15 अब्जची मदत बंद केली
अमेरिकाने दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत पाकिस्तानला देण्यात येणारी $१.१५ अब्जची सुरक्षा मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच पाकिस्तानला दिली जाणारी सर्वप्रकारची सैन्य मदत थांबविण्यात आली आहे आणि अमेरिकाने पाकिस्तानला धार्मिक स्वतंत्रतेच्या गंभीर उल्लंघनासंदर्भात विशेष देखरेख यादीमध्ये नोंदवले. 

पाकिस्तान या यादीत समाविष्ट होणारा पहिला देश आहे. या श्रेणीला २०१६ सालच्या एका विशेष कायद्याद्वारा तयार करण्यात आले आहे. तब्बल १५० वर्षानंतर ३१ जानेवारीला आकाशात 'निळा चंद्र' दिसणार
१५० वर्षांत एकदाच असा योग येतो जेव्हा आकाशात निळा चंद्र दिसतो. ३१ जानेवारीला दुसऱ्या पूर्णिमेला एक दुर्मिळ चंद्रग्रहण आढळून येणार आहे, ज्याला 'निळा चंद्र (Blue Moon)' देखील म्हणतात.

हे वर्ष २०१८ चे पहिले ग्रहण आहे. भारतासह आशियातील काही भागांमध्ये उगवताच ग्रहण दिसणार. मध्य आणि पूर्व आशिया, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात हे दृश्य उत्तम आढळून येणार. यापूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी पूर्ण चंद्रग्रहण दिसले होते.