‘अॅशेस’ मध्ये इंग्लंडचा दारुण पराभव, ऑस्ट्रेलियाची ४-० ने बाजी
अॅशेसमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत मालिकेत ४-० ने बाजी मारली आहे. पाचव्या आणि अंतिम कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा एक डाव आणि १२३ धावांनी पराभव केला आहे.


कसोटीत एकूण ८ विकेट घेणारा पॅट कमिन्स सामनावीर तर मालिकेत ६८७ धावांची बरसात करणारा कर्णधार स्टीव्हन स्मिथ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

इंग्लंडसाठी अॅशेसमधील हा पराभव लाजीरवाणा ठरला आहे. २०१५ मध्ये झालेल्या मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ३-२ ने पराभव करत अॅशेसवर नाव कोरले. मात्र ती मालिका इंग्लंडमध्ये झाली होती. 

ऑस्ट्रेलियात २०१०-११ मध्ये झालेल्या मालिकेत इंग्लंडने शेवटचा विजय मिळवला होता. त्यानंतर अद्याप एकदाही इंग्लंडला ऑस्ट्रेलियात विजय मिळवता आलेला नाही. 

आता ऑस्ट्रेलियातील विजयासाठी इंग्लंडला २०२१ पर्यंत वाट पाहावी लागेल. २०१९ मधील अॅशेस मालिका इंग्लंडमध्ये होणार आहे.


‘खेलो इंडिया’ च्या बोधचिन्हाचे अनावरण
केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्रालयाकडून आकर्षक ‘खेलो इंडिया’ च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. तीन-स्ट्रोक ‘खेलो इंडिया’ लोगो बोधचिन्ह ओगिलवी इंडियाद्वारा तयार केले गेले.

३१ जानेवारी २०१८ पासून ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ चे उद्घाटन नियोजित आहे. या खेळांचे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्सद्वारा केले जाणार आहे.

एप्रिल २०१६ मध्ये भारत सरकारने देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली होती. 

समाजाच्या अगदी तळ पातळीवर बदल करून राष्ट्रव्यापी क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नियोजित ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ याच्या प्रथम संस्करणात जवळपास ६००० खेळाडू आणि अधिकारी भाग घेतील. 

स्पर्धांमधून निवडण्यात येणार्‍या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत खेळाडूंना आठ वर्षापर्यंत दरवर्षी प्रत्येकी पाच लक्ष रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार, जी १००० उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित करण्यात आलेली आहे. 

वर्षागणीक खेळाडूंना ‘खेलो इंडिया’ अंतर्गत जोडण्यात येणार. क्रीडा स्पर्धा आणि शिक्षण अश्या दोन्ही प्रकारे खेळाडूंना सहभाग घेता येईल अश्या देशभरातल्या २० विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रीडा केंद्र म्हणून प्रोत्साहन देणार. 



जपानच्या टोयोटा कंपनीचे माजी अध्यक्ष तत्सुर्सो टोयडा यांचे निधन
मूळ जपानची वाहन निर्माता कंपनी टोयोटा याचे माजी अध्यक्ष तत्सुरो टोयोडा यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.

तत्सुरो टोयोडा यांनी १९५३ साली किचिरो टोयोडायांच्यासमवेत कंपनी उभारली आणि १९८४ साली ते टोयोटा आणि जनरल मोटर्सचे पहिले अध्यक्ष (१९९२-१९९५) होते. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने उत्तर अमेरिकेत आपले पाय रोवले आणि जम बसवला.



अमेरिकेकडून देशाच्या सीमारेषेवर भिंत उभारण्यासाठी आणखी $18 अब्ज मंजूर
अमेरिका सीमारेषेवर भिंत उभारण्याचे काम चालू आहे. हे काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या प्रशासनाने येत्या दहा वर्षांसाठी आणखी $18 अब्जचा खर्च करण्याची शिफारस केली आहे.

मेक्सिको-अमेरिका सीमारेषावर जवळपास अर्धी सीमा म्हणजेच १५५२ किलोमीटर भिंतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२७ पर्यंत ५०५ किलोमीटर अतिरिक्त अडथळ्यांची आवश्यकता भासत आहे.