चालू घडामोडी १५ जानेवारी २०१८

जागतिक उत्पादन निर्देशांकात भारत तिसाव्या क्रमांकावर 
जागतिक उत्पादन निर्देशांकात जागतिक आर्थिक मंचाने भारताला तिसावे स्थान दिले आहे. 

चीन पाचव्या क्रमांकावर आहे. ब्राझील, रशिया व दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्स देश तुलनेने खाली आहेत. 

जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रथमच उत्पादन सज्जता अहवाल जाहीर केला असून त्यात जपानचा पहिला क्रमांक आहे. दक्षिण कोरिया, जर्मनी, स्वित्र्झलड, चीन, झेक प्रजासत्ताक, अमेरिका, स्वीडन, ऑस्ट्रिया, आर्यलड हे देश पहिल्या दहात आहेत. 

ब्रिक्स देशांमध्ये रशिया ३५, ब्राझील ४१, दक्षिण आफ्रिका ४५ व्या क्रमांकावर आहे. तर भारताचा तिसावा क्रमांक लागला आहे.कर्नाटकात राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचा शुभारंभ
भारत सरकारचे संस्कृती मंत्रालयाच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त १४ जानेवारी २०१८ पासून कर्नाटकमध्ये 'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमांतर्गत ७ व्या 'राष्ट्रीय संस्कृती महोत्सव' याला सुरुवात झाली आहे.

हा महोत्सव कर्नाटकात बंगरुळू (१४-१६ जानेवारी), हुबळी-धारवाड (१७-१८ जानेवारी), मंगरुळू (१९-२० जानेवारी) या ठिकाणी आयोजित करण्याचे नियोजित आहे.

'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रम ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरू करण्यात आलेला भारत सरकारचा एक उपक्रम आहे. हा उपक्रम विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील लोकांमध्ये संपर्क वाढविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. अशोक सेठ GJEPC च्या उत्तर विभागाचे अध्यक्ष
रत्न व दागिने निर्यात जाहिरात मंडळाकडून (GJEPC) अशोक सेठ यांची अध्यक्ष (उत्तर विभाग) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

उत्तर विभागात दिल्ली-राष्ट्रीय राजधानी प्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. 

रत्न व दागिने निर्यात जाहिरात मंडळ (GJEPC) १९६६ साली वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून स्थापन करण्यात आले. देशाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमधील वाद सोडविण्यासाठी BCI ची ७ सदस्यीय समिती
भारतीय बार मंडळाकडून ७ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ४ न्यायाधीश आणि सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यामधील वादात समेट घडवण्याचे काम ही समिती करणार आहे.

सर्वोच्च न्यायालयातल्या चार जेष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी भारतीय बार मंडळाने हा पुढाकार घेतला.

समितीचे सदस्य जे. चेलमेश्वर, रंजन गोगोई, एम. बी. लोकूर आणि कुरियन जोसेफ या चारही न्यायाधीशांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतील. 

यांनी १२ जानेवारीला एका पत्रकार परिषदेत सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. या प्रकारची घटना न्यायपालिकेच्या इतिहासात प्रथमच घडून आलेली आहे.

भारतीय घटनेच्या परिच्छेद १२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयांच्या स्थापनेसंबंधी तरतूद आहे. वर्तमानात न्यायालयात एक भारतीय सरन्यायाधीश (CJI) आणि कमाल ३०अन्य न्यायाधीश पदांची तरतूद आहे. याचे मुख्यपीठ नवी दिल्लीत आहे. भारतीय सरन्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपतींकडून (परीच्छेद १२४) केली जाते.इस्त्रायलच्या पंतप्रधानांचे भारतात आगमन
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. १४ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दिल्ली विमानतळावर ते पोहोचले. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांची गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी आणि नेतन्याहू विमानतळाहून तीन मूर्ती मार्गावरून पुढे रवाना झाले.

या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कृषी, पाणी संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच अंतराळ सुरक्षेसह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे. 

भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. काठमांडूत चीनने सीमापार ऑप्टिकल फायबर लिंक उपलब्ध करून दिली
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये नागरिकांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चीनने हिमालय पर्वतापर ऑप्टिकल फायबर लिंक उभारून त्याचे अनावरण केले आहे.

रसुवागढी सीमेच्या माध्यमातून चीन इंटरनेटची प्रारंभिक स्पीड १.५ GBps असेल, जेव्हा की भारताकडून बीरतनगर, भैरहवा आणि बीरगंज क्षेत्राच्या माध्यमातून नेपाळला ३४ GBps स्पीड उपलब्ध करून दिली गेली आहे. 

पूर्वीपासूनच नेपाळमध्ये इंटरनेट सेवा भारताकडून पुरवली जात आहे.