भारतीय महिला फायटर पायलट ‘अवनी चतुर्वेदी’
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदी यांनी ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ हे फायटर विमान उडवून नवा इतिहास रचला. 19 फेब्रुवारी रोजी गुजराथच्या जामनगर एअरबेस वरुन त्यांनी मिग-21 हे विमान उडविले.


मिग-21 विमान हवेत उडवण्याचे प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतरच्या टप्प्यात चंद्रप्रकाशात आणि गडद काळोखातही विमान चालवण्याचे प्रशिक्षण वैमानिकांना देण्यात येते. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असते. अवनी जून 2016 पासून हे प्रशिक्षण घेतले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारे फाटर विमान उडविण्यासाठी एका वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी जवळपास 15 कोटी खर्च येतो. इतिहासात पहिल्यांदाच महिलेने मिग-21 हे विमान उडविले. या प्रशिक्षणादरम्यान महिला आहेत म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचे झुकते माप देण्यात आले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.



‘ईशान्येसाठी नीती मंच’ च्या स्थापनेचा आदेशकेंद्र शासनाने ‘ईशान्येसाठी नीती मंच (NITI Forum for Northeast)’ याची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष (राजीव कुमार) आणि ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) (डॉ. जितेंद्र सिंह) हे या मंचाचे सह-अध्यक्ष असतील. मंचाचे सचिवालय ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयात असणार. मंचाच्या सदस्यांमध्ये विकासासंबंधी मंत्रालयांचे सचिव, संबंधित राज्यांचे मुख्य सचिव आणि अन्य संबंधित विशेषज्ञांचा समावेश असणार.

हा मंच ईशान्येकडील क्षेत्रातल्या विकास कार्यांमध्ये येणार्‍या अडचनींना ओळखणार आणि ईशान्येकडील क्षेत्रात वेगाने व निरंतर विकासासाठी आवश्यक पावले उचलण्यासंबंधी शिफारसी करणार.



‘सारस’ विमानाचे दुसरे चाचणी उड्डाण यशस्वीभारताचे स्वदेशी बनावटीचे हलके विमान ‘सारस’ या परिवहन विमानाचे दुसरे चाचणी उड्डाण यशस्वी ठरले आहे.

‘सारस PT1N’ ची 20 चाचणी उड्डाणे घेण्यात येणार असून त्यापैकी हे दुसरे उड्डाण होते. 24 जानेवारी 2018 ला पहिले चाचणी उड्डाण यशस्वी झाले होते.

CSIR-नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी (CSIR-NAL) ने या विमानाची रचना आणि विकास केला आहे. ‘सारस Mk-2’ आवृत्ती प्रथम सैन्यदलासाठी आणि नंतर नागरी आवृत्तीचा CSIR-NAL चा प्रस्ताव आहे. याच श्रेणीतल्या आयात विमानापेक्षा ‘सारस’ 20-25% किफायतशीर आहे. सुधारित आवृत्तीतले विमान 14 आसनांऐवजी 19 आसनांचे राहणार आहे



मिजोरममध्ये ईशान्य क्षेत्रातले पहिले क्षेत्रीय कृषी केंद्र सुरू होणारइस्रायलच्या सहकार्याने उभारलेल्या भारताच्या ईशान्य क्षेत्रात पहिल्या ‘क्षेत्रीय कृषी केंद्रा’चे उद्घाटन मिजोरममध्ये 7 मार्चला केले जाणार.
8 ते 10 कोटी रुपये खर्चाचे हे केंद्र विशेष रूपाने आंबट फळांच्या औद्योगिक प्रक्रियेसाठी असणार. 

हा प्रकल्प कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, मिजोरम राज्य शासन आणि इस्रायली सरकार यांच्या सहकार्याने चालवले जाणार. इस्रायल विशेषज्ञता आणि व्यावसायिक पाठबळ प्रदान करणार.

भारतात सध्या 22 क्षेत्रीय कृषी केंद्र कार्यरत आहेत, ज्यामध्ये हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि पंजाब यांचा समावेश आहे. पहिले केंद्र 2008 साली हरियाणामध्ये स्थापित केले गेले

मालदीवमध्ये आणखी 30 दिवसांची आणीबाणी घोषितमालदीवच्या संसदेने राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या शिफारसीवर देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणी काळाला आणखी 30 दिवसांसाठी वाढविण्यास मंजूरी दिली आहे. देशामध्ये आता आणीबाणी 22 मार्च 2018 रोजी समाप्त होणार.

मालदीव हा देश राजकीय संकटात सापडला असून राष्ट्रपतींनी देशात आणीबाणी लागू केली आहे. मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांच्या 9 नेत्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रपती यामीन यांच्या सरकारने हा आदेश मानला नाही. 

त्यानंतर राष्ट्रपतींनी देशात आणीबाणीची घोषणा केली. सोबतच, देशात गेल्या 15 दिवसांसाठी लागू केलेल्या आणीबाणीमध्येच मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल गयूम यांना अटक करण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अब्दुल्ला सईद आणि आणखी एक न्यायाधीश अली हमीद यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सरकारच्या दबावामुळे सर्वोच्च न्यायालयाला आपला निर्णय बदलावा लागला.



नॉर्वेची मॅरिट बोजरगेन – सर्वात यशस्वी हिवाळी ऑलंपिक खेळाडू9-25 फेब्रुवारी या काळात IOC च्या वतीने दक्षिण कोरियात प्योंगचांग येथे सुरू असलेल्या हिवाळी ऑलंपिक 2018 मध्ये नॉर्वेच्या मॅरिट बोजरगेन ही सर्वात यशस्वी हिवाळी ऑलंपिक खेळाडू ठरत इतिहास रचला आहे. तिने ऑलंपिक इतिहासात सर्वाधिक 14 पदक जिंकून हा विक्रम केला.

शिवाय, अमेरिकेच्या महिला क्रॉस-कंट्री संघाने त्याचे पहिले पदक आणि तेही सुवर्णपदक जिंकले. 

आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) हे जागतिक ऑलंपिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे. स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे याचे मुख्यालय आहे. IOC ची निर्मिती पिअरे डी कौर्बर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी केली आणि डेमेट्रीओस विकेलस यांची प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. याचे 105 सक्रिय सदस्य, 32 मानद सदस्य, 2 प्रतिष्ठित सदस्य (सेनेगल आणि अमेरिका) आहेत.