राष्‍ट्रीय वित्‍तीय सूचना प्राधिकरण (NFRA) च्या स्‍थापनेस मंत्रिमंडळाची मंजूरी 
राष्‍ट्रीय वित्‍तीय सूचना प्राधिकरण (National Financial Reporting Authority -NFRA) याची स्‍थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. 


NFRA साठी एक अध्‍यक्ष, तीन पूर्णकालिन सदस्‍य आणि एक सचिव याप्रमाणे पदांच्या निर्मितीसंदर्भात असलेल्या प्रस्तावास देखील मंजूरी मिळाली. 

कायद्याच्या कलम १३२ अन्वये सनदी लेखा अधिकारी आणि त्यांच्या कंपनीच्या तपासासाठी NFRA चे कार्यक्षेत्र सूचीबद्ध कंपन्या व मोठ्या बिगर-सूचीबद्ध कंपन्यांच्या कार्यक्षेत्रात आणण्याच्या उद्देशाए याची स्थापना करण्यात येत आहे. केंद्र शासन अश्या अन्‍य संयंत्राच्या तपासासाठी आदेश देऊ शकते, जेव्हा त्यात सार्वजनिक हित सामावलेले असणार. 



रूपपुर अणुऊर्जा प्रकल्पासाठी भारत, बांग्लादेश आणि रशिया यांच्यात करार झाला 
तिसर्‍या देशात अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भारत-रशिया यांच्या दरम्यान झालेल्या करारांतर्गत, प्रथमच बांग्लादेश सोबत ‘रूपपुर अणुऊर्जा प्रकल्प’ उभारण्यासाठी करार करण्यात आला आहे. 

करारामधून भारतीय कंपन्या अणुऊर्जा संयंत्रासाठी ‘नॉन-क्रिटिकल’ श्रेणीत निर्मिती आणि स्थापना कार्यात भाग घेऊ शकतील. यावेळी प्रथमच भारत कोन्या दुसर्‍या देशात अणुऊर्जा प्रकल्पामध्ये भाग घेणार. 

भारत आण्विक पुरवठादार समूह (NSG) च्या सभासद नसल्याकारणाने थेट स्वरुपात कोणत्याही अणुऊर्जा संयंत्राच्या निर्मितीमध्ये सामील होऊ शकत नाही. 



भारत-व्हिएतनाम दरम्यान तीन करार 
भारत व व्हिएतनाम यांच्यात अणुसहकार्य, इंम्डो-पॅसिफिक, खुली व्यवस्था यासह तीन मुद्दय़ांवर करार झाले आहे. यांच्यादरम्यान स्वाक्षरी झालेल्या करारांचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि व्हिएतनामचे औद्योगिक व देवाणघेवाणमंत्री त्रान तुआन अन्ह यांनी हस्तांतरित केले आहे.

पंतप्रधान मोदी व व्हिएतनामचे अध्यक्ष त्रान दाय क्वांग यांनी अनेक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य करण्याचे ठरवले असून त्यात संरक्षण, तेल व वायू तसेच कृषी या क्षेत्रांचा समावेश आहे.

तसेच दोन्ही देश द्विपक्षीय सागरी सहकार्यावर भर देणार असून खुली, कार्यक्षम व नियमाधिष्ठित प्रादेशिक व्यवस्थाआवश्यक आहे. भारत व व्हिएतनाम यांनी व्यापार व गुंतवणूक संबंध हे तेल व वायू शोधन, शाश्वत ऊर्जा, कृषी व कापड उद्योगात वाढवण्याचे ठरवले आहे.



आशियाई कुस्ती स्पर्धेत नवज्योत कौर हिला सुवर्णपदक बिश्केक (किर्गिस्तान) येथे खेळल्या गेलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत भारतीय नवज्योत कौर हिने महिलांच्या ६५ किलोग्राम फ्री स्टाइल गटात सुवर्णपदक पटकावले आहे. 

नवज्योत कौर हिने जापानच्या मिया इमाई हिचा अंतिम लढतीत पराभव केला. या विजयासह, नवज्योत कौर ही वरिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहली महिला कुस्तीपटू बनली. 

आशियाई कुस्ती अजिंक्यपद या स्पर्धेचे आयोजन एशियन असोसिएटेड व्रेसलिंग कमिटीच्या वतीने केली जाणारी वार्षिक स्पर्धा आहे. पुरुषांसाठी ही स्पर्धा पहिल्यांदा १९७९ साली तर महिलांसाठी १९९६ साली आयोजित करण्यात आली होती. 


२०२० टोकियो ऑलंपिक आणि पॅरालंपिकसाठी ‘शुभंकर’ जाहीर 
वर्ष २०२० मध्ये टोकियोमध्ये खेळल्या जाणार्‍या ऑलंपिक आणि पॅरालंपिकसाठी ‘शुभंकर’ जाहीर करण्यात आले आहे. 

जपानमध्ये सुपरहीरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या कॉमिक पात्रांची खेळांचे शुभंकर म्हणून निवड करण्यात आली आहे. यांची निवड करण्यासाठी जपानमध्ये एक शालेय स्पर्धा आयोजित केली होती. 

२०२० टोकियो ऑलंपिक २४ जुलै – ९ ऑगस्ट २०२० या काळात खेळले जाणार आहे. टोकियो हे आशियातले पहिले शहर आहे, जे दुसर्‍यांदा (सन १९६४ नंतर) ऑलंपिकचे आयोजन करीत आहे 



इजिप्तमध्ये ‘इंडिया बाय द नाइल’ महोत्सव 
इजिप्तमध्ये ६ मार्चपासून ‘इंडिया बाय द नाइल’ महोत्सवाला सुरुवात होणार आहे. 

१२ दिवस चालणार्‍या या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात भारतीय संस्कृती आणि तिच्या विविधतेचे प्रदर्शन घडविले जाणार आहे. हा कार्यक्रम इजिप्तमधला सर्वात मोठा परकीय महोत्सव आहे. 

कार्यक्रमांचे आयोजन कैरो, आलेक्स्जांड्रिया आणि अशा अनेक शहरांमध्ये केले जाईल. 

इजिप्त हा उत्तर-पूर्व आफ्रिका आणि मध्य-पूर्व प्रदेशाला जोडणारा देश आहे. कैरो हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि इजिप्तीयन पाउंड हे चलन आहे. 



जगातील पहिले आण्विक ऊर्जेवरील विमान 
आण्विक ऊर्जेवर चालणारे हे जगातील पहिले मॅग्नावेम विमान आहे. या विमानाचे डिझायनर ऑस्कर विनाल्स यांनी याची कन्सेप्ट डिझाइन तयार केली आहे. या विमानाची किमान गती सुमारे १८५० किमी प्रतितास राहील. 

म्हणजे लंडन ते न्यूयॉर्क पोहोचण्यासाठी केवळ तीन तास लागतील.
विशेष म्हणजे या विमानातून कार्बन उत्सर्जित होणार नसल्याने पर्यावरणाला नुकसान होणार नाही. 

विमानात लावण्यात आलेल्या कॉम्पॅक्ट फ्यूजन रिअॅक्टरमधून त्याला ऊर्जा मिळेल. लॅटिन भाषेतील ‘मॅग्ना एवम’ या शब्दातून या विमानाला नाव देण्यात आले आहे. याचा अर्थ मोठा पक्षी असा होतो.

विमानात “प्लाझ्मा अॅक्युटेटर्स” आहेत, जे विमानाला तसेच पंखांवरील हवेला नियंत्रित करतील. त्यामुळे आकाशात हे विमान चांगले प्रदर्शन करू शकणार आहे.