नव्या दिल्ली-मुंबई महामार्गाची घोषणा 
रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी दिल्ली आणि मुंबई दरम्यान महामार्ग तयार करण्याची घोषणा केली आहे.


नवा सहा पदरी द्रुतगती मार्ग या दोन्ही शहरांमधील 106 किलोमीटरचे अंतर कमी करणार. मार्गाच्या बांधणीसाठी 1 लक्ष कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय, योजनेनुसार चंबळ महामार्ग दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाशी जोडला जाईल, ज्याचा मध्यप्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांना लाभ मिळणार.



भारतीय बियाणे उद्योगांनी नवी संघटना तयार केली 

कृषी बियाणे क्षेत्रातील भारतीय तसेच बहूराष्ट्रीय उद्योगांनी या क्षेत्रासंबंधी मुद्दे आणि कृषी तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी ‘अलायंस फॉर अॅग्री इनोव्हेशन (AAI)’ नावाची नवी संघटना तयार केली आहे.

मोन्सेन्टों, सिजेन्टा, रासी सीड्स, बायर बायोसाइन्स, डॉव अॅग्रो सायन्सेस, डयपॉन्ट पायनियर, महिको, मेटाहल्स आणि श्रीराम बायोसीड्स यासारख्या उद्योगांचा यामध्ये समावेश आहे.



लेफ्ट. जनरल पी. पी. मल्होत्रा: NCC चे महासंचालक 

लेफ्ट. जनरल पी. पी. मल्होत्रा यांनी 11 एप्रिल 2018 रोजी राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) संघटनेच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला.

राष्ट्रीय विद्यार्थी सेना (National Cadet Corps -NCC) ही देशातल्या तरुणांना शिस्तबद्ध व राष्ट्रीय नागरिकत्व क्षेत्रात प्रोत्साहन देणारी लष्कर, नौदल आणि हवाई दल यांची एक तिहेरी सेवा संघटना आहे. NCC ची 1948 साली स्थापना करण्यात आली व याचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे.



20 एप्रिलपासून 6 राज्यांमध्ये ई-वे बिल यंत्रणा कार्यान्वित होणार 

भारत सरकारने नव्या ई-वे बिल यंत्रणेचा आणखी सहा राज्यांमध्ये विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्णयानुसार, बिहार, झारखंड, हरियाणा, म
ध्यप्रदेश, त्रिपुरा आणि उत्तराखंड या 6 राज्यांमध्ये आंतरराज्य ई-वे बिल यंत्रणा 20 एप्रिल 2018 पासून कार्यान्वित केली जाणार. सध्या ही व्यवस्था कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तेलंगणा आणि उत्‍तरप्रदेश या राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे.

वस्तू व सेवा कर (GST) प्रणाली अंतर्गत मोटर मालवाहकांसाठी आंतर-राज्य मालवाहतुकीसाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक वे बिल (e-way bill) यंत्रणेचा वापर 1 एप्रिल 2018 पासून देशभरात सुरू करण्यात आला आहे. 

ई-वे बिल यंत्रणेमधून 50,000 रुपयांहून अधिक किंमतीचा माल एका राज्यातून दूसर्‍या राज्यात पाठविण्याआधी त्याची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. ई-वे बिल व्यवस्थेमुळे आता तपास नाक्याची व्यवस्था देखील समाप्त करण्यात आली आहे. 


प्रथम ‘भारत-नॉर्डिक शिखर परिषद’ स्वीडनमध्ये सुरू 
स्‍वीडनची राजधानी स्‍टॉकहोम येथे 17 एप्रिल 2018 पासून प्रथम ‘भारत-नॉर्डिक शिखर परिषद’चा शुभारंभ करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत उपस्थित आहेत.

स्वीडन, नॉर्वे, फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड या देशांना सामूहिक रूपात नॉर्डिक देश म्हणून ओळखले जाते. यापूर्वी एकदाच माजी राष्‍ट्रपती बराक ओबामा यांच्या काळात नॉर्डिक देशांच्या प्रमुखांसोबत ‘अमेरिका-नॉर्डिक शिखर परिषद’ आयोजित केली गेली होती. याप्रकारची ही दुसरीच बैठक आहे, जी भारतासह होत आहे.



जागतिक वारसा दिन: 18 एप्रिल 

UNECSOच्या नेतृत्वात 18 एप्रिल 2018 रोजी जागतिक वारसा दिन पाळण्यात आला.

1982 साली आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे परिषद (ICOMOS) या संघटनेनी “जागतिक वारसा दिन” घोषित केला, ज्याला 1983 साली UNESCOच्या आमसभेने मनुष्यजातीच्या सांस्कृतिक वारसाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने मंजुरी दिली. 

जागतिक वारसा दिन या वार्षिक कार्यक्रमात आपला वारसा जतन करण्याच्या हेतूने आणि या क्षेत्रातील सर्व संबंधित संस्थांच्या प्रयत्नांविषयी जागृती निर्माण केली जाते.

वर्तमानात UNESCO च्या वारसा यादीत 53 वारसा स्थळांसह इटली अग्रस्थानी आहे. त्यानंतर चीन (52) आहे. भारतामध्ये जागतिक वारसा म्हणून घोषित 36 स्थळे आहेत.



कोरियाच्या BTS (पॉप संगीत गट) ला टाइम्स ‘पर्सन ऑफ द इयर 2018’ किताब 

दक्षिण कोरियाच्या पॉप संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या BTS गटाला ‘टाइम्स पर्सन ऑफ द इयर 2018’ हा किताब मिळाला आहे. BTS हा RM, जीन, शुगा, जे-होप, जिमिन, व्ही आणि जंगकुक या प्रसिद्ध गीतकारांचा गट आहे.

BTS (बियॉन्ड द सीन) ला टाइम (TIME) या नियतकालिकेच्या ऑनलाइन वाचकांनी सर्वाधिक 15% मते मिळालीत. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे हे 5% मतांसह दुसर्‍या स्थानी तर बराक ओबामा 3% मतांसह तिसर्‍या स्थानी आहेत.



जागतिक हीमोफिलिया दिन: 17 एप्रिल 

हीमोफिलिया आणि इतर अनुवांशीक रक्तस्त्रावासंबंधी विकारांविषयी जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी 17 एप्रिलला जगभरात ‘जागतिक हीमोफिलिया दिन’ पाळला जातो.

या वर्षी “शेयरींग नॉलेज मेक्स अस स्ट्रॉं
गर” या विषयाखाली जागतिक हीमोफिलिया महासंघ (WFH) याच्या नेतृत्वात हा दिन पाळला गेला.

1989 साली जागतिक हीमोफिलिया दिनाची स्थापना जागतिक हीमोफिलिया महासंघ (WFH) कडून करण्यात आली. WFH चे स्थापक फ्रॅंक शेनबेल यांच्या जयंतीनिमित्त 17 एप्रिलला हा दिन पाळतात.