चालू घडामोडी २९ एप्रिल २०१८

डॉ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु 
रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी 27 एप्रिल रोजी डॉ. पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले.

डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 24 ऑक्टोबर रोजी डॉ. संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरुन कार्यमुक्त केल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते.

तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के.कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली होती.भारत व चीनच्या शक्तीने जगाला समृद्ध करणार 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी हुवेई येथील मर्किस संग्रहालय घेतली. 

यावेळी मोदी म्हणाले, 'भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या शक्तीने जगाला समृद्ध करणार आहे. उभय नेत्यांच्या या शिखर परिषदेमुळे दोन्ही देशांमधील विश्वास वाढला आहे'.

हुवेई येथील मर्किस संग्रहालयात या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीनंतर मोदी म्हणाले, भारत आणि चीन दोन्ही देश मिळून संपूर्ण जगाला समृद्ध करेल.

दोन्ही देशातील नेत्यांच्या या शिखर परिषदेमुळे दोन्ही देशांमधील विश्वास वाढला आहे. येत्या काळात भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावे यासाठी प्रयत्न करणार आहोत.

भारतीय वंश असलेल्या व्यक्तींसाठी भारत सरकारची दीन दयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती 
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून भारतीय वंश असलेल्या व्यक्तींसाठी दीन दयाळ उपाध्याय शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे.

यामधून पत्रकारिता क्षेत्राच्या विकासामध्ये उल्लेखनीय कार्य करून दाखविणार्‍या व्यक्तीला 25000 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल.

केंद्रीय प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी नवी दिल्लीतील भारतीय मास कम्युनिकेशन संस्था (IIMC)च्या परिसरात राष्ट्रीय मिडिया फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन केले.उत्तर आणि दक्षिण कोरिया यांची ऐतिहासिक शिखर बैठक यशस्वी 
उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग-ऊन यांनी दक्षिण कोरियाचा दौरा केला आणि ते तब्बल 65 वर्षांमध्ये दक्षिण कोरियाचा दौरा करणारे पहिले उत्तर कोरियाचे राष्ट्रपती ठरले आहेत.

दोन्ही देशांच्या नेत्यांची ऐतिहासिक शिखर बैठक यशस्वीपणे पार पडली. या बैठकीत त्यांनी प्रदेशात स्थायी शांती आणण्याच्या तसेच अण्वस्त्रांपासून संपूर्ण मुक्तता यांच्या दिशेने मार्गक्रम करण्याची वचनबद्धता प्रदर्शित केली.क्रिस्टीन बर्गनर: म्यानमारमधील संयुक्त राष्ट्रसंघाचा नवा विशेष राजदूत 
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी स्वित्झर्लंडच्या क्रिस्टीन बर्गनर यांची म्यानमारमधील त्यांचा नवा विशेष राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना करण्यात आली. दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी या संघटनेची स्थापना करण्यात आली. सध्या या संघटनेचे 193 सदस्य देश आहेत. UN चे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.