जागतिक बँक – World Bank

स्थापना – १९४५,

मुख्यालय – वॉशिंग्टन,
कार्य सुरु – जुन १९४६
संयुक्त राष्ट्राची संलग्न संस्था म्हणून तिचे कार्य चालते.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा (IMF) सदस्य झाल्याशिवाय जागतिक बँकेचे सदस्यत्व मिळत नाही.
भारत हा जागतिक बँकेचा संस्थापक सदस्य आहे.
स्वातंत्र्यत्तर काळात भारतीय अर्थकरणात जागतिक बँकेचा सहभाग अतिशय महत्वाचा ठरला आहे.
सदस्य देश – १८५

उद्दिष्ट्ये

सभासद राष्ट्रांना आर्थिक पुर्नबांधणी व विकासाच्या कार्यात दिर्घकालीन भांडवल पुरवठा करुन मदत करणे. उदा. युध्दानंतरचे पुर्नवसन.
अल्प विकसीत देशात संसाधने व उत्पादन क्षमता विकासासाठी मदत करणे.
विकसनशील राष्ट्रांत करण्यात येणा-या परकीय भांडवल गुंतवणूकीला चालना देणे.
सभासद राष्ट्रांना उत्पादनवाढीसाठी गुंतवणूक करण्यास भांडवल उपलब्ध करुन देणे आणि आणि त्या योगे उत्पादन वाढीला आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देवून लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास सहाय्य करणे.
विकसनशील राष्ट्रांना उत्पादन वाढीच्या उद्दिष्टांसाठी खाजगी भांडवल उपलब्ध होत नसल्यास त्यांना अल्प व्याजाने दिर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणे.
जागतिक बँक, सभासद राष्ट्राच्या सरकारला, विशिष्ट प्रकल्प संस्थांना, खाजगी संस्थांना कर्ज देते.

जागतिक बँकेचे कार्य

१. बँक सदस्य राष्ट्रांना ५ ते २० वर्ष दिर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणे.
२. बँक सदस्य राष्ट्रास त्या देशाच्या जागतिक बँकेच्या भाग भांडवलातील हिस्स्याच्या २०% पर्यंत कर्ज देऊ शकते.
३. जागतिक बँकेने आपला एकूण कर्ज पुरवठ्यापैकी सुमारे ७५% कर्ज आफ्रिका, आशिया लॅटीन अमेरीकेतील विकसनशील देशांना दिले आहे.
४. भारताला विशेष आर्थिक मदत करण्यासाठी जागतिक बँकेने इंडीया एड क्लबची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. या क्लबचे नाव आता इंडिया डेव्हलपमेंट फोरम असे केले आहे.
५. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन (IDA) या जागतिक बँकेच्या सहयोगी संस्थेला जागतिक बँकेची सॉफ्ट लोन विन्डो म्हणून ओळखतात. (IDA) ची स्थापना २४ सप्टेंबर १९६० मध्ये झाली असून ती सदस्य गरीब देशांना सुलभ अटींवर व्याज विरहीत कर्ज पुरवठा करते.