बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवीन पंतप्रधान

  • ब्रेक्झिटनंतर थेरेसा मे यांनी ७ जून रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला
  • त्यानंतर पंतप्रधान निवडणूकीत बोरिस जॉन्सन यांनी जेरेमी हंट यांचा पराभव केला
  • ५५ वर्षीय जॉन्सन यांच्या समोर ब्रेक्झिट तिढा सोडविण्याचे आव्हान
 

अजय कुमार भल्ला भारताचे नवे केंद्रसचिव

  • २ वर्षांसाठी नियुक्ती
  • पूर्वी वीज मंत्रालय सचिव
  • १९८४ आसाम कॅडर IAS
 

ICC कडून PCB च्या लाहोर बायोमेकॅनिक्स लॅबला मान्यता 

  • संशयास्पद वाटणारी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी तपास केंद्र
  • प्रयोगशाळा ‘Lahore University of Management Science’ येथे उभारण्यात आली आहे
  • ICC ने मान्यता दिलेली ५ वी बायोमेकॅनिक्स लॅब
 

ब्रिटन मंत्रीमंडळात तीन भारतीय

  • ब्रिटनचे ‘सर्वात वैविध्यपूर्ण मंत्रिमंडळ’ असे याचे वर्णन
  • प्रीती पटेल : गृहमंत्री
  • आलोक शर्मा : आंतरराष्ट्रीय विकास मंत्री
  • ऋषी सुनाक : वित्त विभागाचे प्रमुख मंत्री
  • भारतीय वंशासोबतच पाकिस्तानी वंशाच्या साजिद जाविद यांची वित्तमंत्री पदी निवड

     

येडीयुरप्पा ४ थ्या वेळेस कर्नाटकचे मुख्यमंत्री

  • २६ जुलै २०१९ रोजी येडीयुरप्पा यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ
  • ३१ जुलैपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार
 

मोहम्मद अमीरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

  • २६ जुलै ०१९ रोजी पाकिस्तानचा डावखुरा जलद गोलंदाज मोहम्मद अमीरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली
  • स्पॉट फिक्सिंग प्रकरणात झालेली ५ वर्षाची शिक्षा त्याने २०१५ मध्ये पूर्ण केली.
 

लोकलेखा समितीची नियुक्ती

  • लोकलेखा समिती : अधीर रंजन चौधरी
  • केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्याचे काम लोकलेखा समिती अप्रत्यक्षपणे करत असते
  • लोकसभा विरोधी पक्षनेत्याकडे याचे अध्यक्षपद असते
 

महालक्ष्मी एक्स्प्रेसची पुरातून सुटका

  • मुंबई ते कोल्हापूर अशी ही रेल्वे धावते
  • कल्याणजवळ पुरात अडकली होती. त्यातील १०५० प्रवाशांची सुखरूप मुक्तता करण्यात आली
 

थायलंड ओपन मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला ८ पदके

  • बँकॉक येथे स्पर्धा 
  • आशिष कुमारला ७५ किलो गटात सुवर्ण
  • निखत जरीन, दीपक, मोहम्मद हसमुद्दीन, ब्रजेश यादव यांना रौप्य
  • मंजू राणी, आशिष, भाग्यवती कचरी यांना कांस्य