aaak
कलम
वैशिष्ट्य

कलम १
भारत आणि राज्यांचा संघ 

कलम २
नवीन राज्यांचा समावेश आणि नवीन राज्यनिर्मिती

कलम ३
नवीन राज्यांची स्थापना, राज्यांच्या सीमा, क्षेत्रफळ व नावात बदल करण्यासंबंधी तरतुदी

कलम ४
घटनेत कलम २ व ३ नुसार करण्यात आलेली दुरुस्ती घटनादुरुस्ती कायदा समजण्यात येणार नाही. 

कलम ५
घटनेचा अंमल सुरु होण्यापूर्वीचे नागरिकत्व

कलम ६
पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या हक्कसंबंधी तरतूद. 

कलम ७
मार्च १९४७ नंतर जे व्यक्ती भारतामधून पाकिस्तानात स्थलांतरित झाले त्यांना भारताचा नागरिक समजण्यात येणार नाही. 

कलम ८
भारताबाहेर राहणाऱ्या एखाद्या भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा हक्क. 

कलम ९
एखाद्या व्यक्तीने स्वच्छेने जर दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर त्यानंतर त्याला भारताचा नागरिक समजण्यात येणार नाही. 

कलम १०
कोणताही भारतीय नागरिकसंसदेच्या कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील. 

कलम ११
संसदेला नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती याशिवाय नागरिकत्वासंबंधी अन्य सर्व बाबींसाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. 

कलम १२
मुलभूत हक्कसंबंधी राज्यसंस्थेची व्याख्या

कलम १३
मुलभूत हक्कांशी विसंगत असणारे कायदे

कलम १४
कायद्यासमोर समानता

कलम १५
धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई

कलम १६
सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी

कलम १७
अस्पृश्यता नष्ट करणे

कलम १८
किताब नष्ट करणे 

कलम १९
भाषण स्वातंत्र्य संबंधी हक्कांचे संरक्षण

कलम २०
अपराधांच्या दोषसिद्धीसंबंधी संरक्षण

कलम २१
जीविताचे आणि व्यक्तीस्वातंत्र्याचे संरक्षण

कलम २१ (अ)
शिक्षणाचा हक्क

कलम २२
अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण

कलम २३
माणसांचा व्यापार आणि वेठबिगारी यांना प्रतिबंध

कलम २४
कारखाने व इतर घटक ठिकाणी बालकामगार कामाला ठेवण्यास प्रतिबंध

कलम २५
विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचे आचरण, प्रकटीकरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. 

कलम २६
धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य

कलम २७
एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धन व प्रसारासाठी कर देण्याबाबत स्वातंत्र्य

कलम २८
शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. 

कलम २९
अल्पसंख्यांक वर्गाच्या हितसंबंधांचे रक्षण

कलम ३०
अल्पसंख्यांकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा हक्क. 

कलम ३२
भाग ३ ने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरिता केलेले उपाय

कलम ३३
भाग ३ मध्ये वर्णन केलेले संबंधी सेनेच्या मुलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा संसदेला असणारा हक्क. 

कलम ३४
लष्करी कायदा (मार्शल लो) अमलात असताना मुलभूत हक्कांवर निर्बंध

कलम ३५
मुलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरता असणारे कायदे. 

कलम ३६
‘राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे’ या संबंधी राज्यसंस्थेची व्याख्या. 

कलम ३७
या भागात असलेली तत्वे लागू करणे. 

कलम ३८
राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. 

कलम ३९
राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विशिष्ट तत्वे. 

कलम ३९ (अ)
समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य

कलम ४०
ग्रामपंचायतींचे संघटन

कलम ४१
कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा हक्क

कलम ४२
कामाची न्याय्य व मानवीय स्थिती, प्रसूती सहाय्य यांसाठी तरतूद. 

कलम ४३
कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी संबंधी तरतुदी

कलम ४३ (अ)
उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग

कलम ४३ (ब)
सहकारी सोसायट्याना प्रोत्साहन

कलम ४४
नागरिकांसाठी समान नागरी कायदा

कलम ४५
सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. 

कलम ४६
अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती तसेच इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन

कलम ४७
नागरिकांचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य

कलम ४८
कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन

कलम ४८ (अ)
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन, वने व वन्यजीवांचे रक्षण करणे. 

कलम ४९
राष्ट्रीय महत्वाची स्मारके, स्थाने, वस्तू यांचे संरक्षण करणे.

कलम ५०
न्यायमंडळ कार्यकारी मंडळापासून वेगळे ठेवणे. 

कलम ५१
आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. 

कलम ५१ (अ)
मुलभूत कर्तव्ये 

कलम ५२
भारताचा राष्ट्रपती

कलम ५३
केंद्राचे कार्यकारी अधिकार

कलम ५४
राष्ट्रपतींची निवडणूक (निर्वाचक गण, मतदार, इ.)

कलम ५५
राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पध्दत

कलम ५६
राष्ट्रपती पदाचा कालावधी

कलम ५७
राष्ट्र्पती पुनर्निवडणुकीसाठीची अर्हता

कलम ५८
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पात्रता

कलम ५९
राष्ट्रपती पदाच्या शर्ती. 

कलम ६०
राष्ट्रपतींनी घ्यावयाची शपथ किंवा प्रतिज्ञा

कलम ६१
राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत

कलम ६२
राष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर रिक्त पद भरण्यासाठी घेतलेला कार्यकाल, किंवा काळजीवाहू राष्ट्रपतींचा कार्यकाल याबाबत तरतुदी. 

कलम ६३
भारताचे उपराष्ट्रपती

कलम ६४
भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिध्द सभापती असतील. 

कलम ६५
भारताचे राष्ट्रपती अनुपस्थित असतील किंवा काही अनपेक्षित कारणामुळे राष्ट्र्पतीचे पद रिक्त झाले असेल तर भारताचे उपराष्ट्रपती

कलम ६६
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, सेवा, शर्ती व पात्रता या बाबत तरतूद. 

कलम ६७
उपराष्ट्रपती पदाचा कालावधी. 

कलम ६८
उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर रिक्त पद भरण्यासाठी घेतलेला कार्यकाल, किंवा काळजीवाहू उपराष्ट्रपतींचा कार्यकाल याबाबत तरतुदी. 

कलम ६९
पद धारण करण्यासाठी उपराष्ट्रपतींना घ्यावयाची शपथ. 

कलम ७०
इतर आकस्मिक कारणाने अध्यक्षांची कार्यापासून मुक्तता. 

कलम ७१
राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या विवादाबद्दल तरतुदी. 

कलम ७२
राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार

कलम ७३
केंद्राच्या कार्यकारी अधिकारांवर मर्यादा

कलम ७४
राष्ट्रपतींना त्यांच्या कामात सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळाची तरतूद. 

कलम ७५
मंत्र्यांसाठी इतर तरतुदी. 

कलम ७६
भारताचा महान्यायवादी. 

कलम ७७
भारत सरकारची व्यापार चालवण्याची पध्दत. 

कलम ७८
राष्ट्रपतींना माहिती सादर करण्याबाबत पंतप्रधानांचे कर्तव्ये. 

कलम ७९
संसद 

कलम ८०
राज्यसभेची रचना. 

कलम ८१
लोकसभेची रचना

कलम ८२
प्रत्येक जनगणनेनंतर यात पुनर्रचना

कलम ८३
संसदेच्या सदनांचा कालावधी

कलम ८४
संसद सदस्यांची पात्रता. 

कलम ८५
संसदेचे सत्र, संसद साधनांची स्थापना किंवा भंग करण्याची तरतूद. 

कलम ८६
संसदेच्या सदनाना संबोधित करणे व सदनाना निरोप पाठविण्याबाबत राष्ट्रपतींचे अधिकार.  

कलम ८७
राष्ट्रपतींचे विशेष संबोधन. 

कलम ८८
संसद सदनाबाबत मंत्री व महान्यायवादी यांचे अधिकार. 

कलम ८९
राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती. 

कलम ९०
राज्यसभा उपसभापतींचा राजीनामा, सुट्ट्या, बडतर्फी याबाबत तरतुदी. 

कलम ९१
राज्यसभा सभापतींच्या अनुपस्थितीत त्यांचे अधिकार व कर्तव्ये निभावण्याबाबत उपसभापती किंवा इतर सदस्यांचे अधिकार. 

कलम ९२
राज्यसभा सभापती किंवा उपसभापती त्यावेळी सदनाचे सभापतीपद भूषवणार नाहीत जेव्हा त्यांच्या बडतर्फीचा ठराव सदनासमोर विचाराधीन असेल.  

कलम ९३
लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष. 

कलम ९४
लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा राजीनामा, सुट्ट्या, बडतर्फी याबाबत तरतुदी.

कलम ९५
लोकसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्यांचे अधिकार व कर्तव्ये निभावण्याबाबत उपाध्यक्ष किंवा इतर सदस्यांचे अधिकार. 

कलम ९६
लोकसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष त्यावेळी सदनाचे अध्यक्षपद भूषवणार नाहीत जेव्हा त्यांच्या बडतर्फीचा ठराव सदनासमोर विचाराधीन असेल. 

कलम ९७
लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच राज्यसभा सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते. 

कलम ९८
संसदेचे सचिवालय. 

कलम ९९
संसद सदस्यांनी घ्यावयाची शपथ.