०१. मुंबईचा शेरीफ हे अराजकीय नामधारी अधिकारपद आहे. ते एका वर्षासाठी मुंबईच्या कोणत्याही प्रख्यात नागरिकास बहाल केले जाते. एच.आर. कॉलेज मुंबईच्या प्राचार्य डॉ. इंदू साहनी या मुंबईच्या नियुक्त केलेल्या शेवटच्या शेरीफ आहेत. (२००८ साली)


०२. शेरीफ हा उच्च न्यायालयाचा अधिकारी असतो. शेरीफला स्वतःचे कार्यालय व कर्मचारी वर्ग असतो. परंतु त्याला कार्यकारी अधिकार नसतात. शेरीफचे कार्यालय उच्च न्यायालयाच्या इमारतीत असते. 


०३. उच्च न्यायालयाचे समन्स बजावणे, तसेच मालमत्ता जप्त व सील करणे आणि आवश्यकतेनुसार तिचा लिलाव करणे या संबंधी कार्याबाबत तो नामधारी प्रमुख असतो. 


०४. शेरीफची महत्वाची कार्ये म्हणजे शहराच्या वतीने परदेशी सन्माननीय अतिथींचे विमानतळावर स्वागत करणे आणि शहरातील मान्यवरांच्या मृत्युनंतर शोकसभा आयोजित करणे. 


०५. शेरीफ अनेक समारंभांचे, परिषदांचे अध्यक्षपद भूषवतात. या पदावरील व्यक्तीला मुख्यमंत्री व शहराचे महानगरपालिका आयुक्त यांच्याशी जवळून संबंध ठेवता येतो. 


०६. शेरीफचा मान ‘ऑर्डर ऑफ प्रिसेदेन्स’ नुसार महापौरांच्या खालोखाल असतो. भारतात केवळ मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे अद्यापही हे पद अस्तित्वात आहे. 


०७. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली श्री. महादेव लक्ष्मण डहाणूकर हे मुंबईचे पहिले शेरीफ होते. 

आतापर्यंतचे मुंबईचे महत्वाचे शेरीफ
१८६९ – भाऊ दाजी लाड
१८७१ – भाऊ दाजी लाड
१८९८ – आदमजी पीरभोय
१९४८ – महादेव लक्ष्मण डहाणूकर
१९४९ – जॉचिम अल्वा
१९५२ – आनंदीलाल पोदार
१९५३ – ख्वाजा अब्दुल हमीद
१९६२ – फ्रेंक मोरेस
१९६७ – एच.एच. इस्माईल
१९६९ – शांताराम महादेव डहाणूकर
१९७५ – लीला मुळगावकर
१९७६ – लीला मुळगावकर
१९८० – युसुफ खान उर्फ दिलीप कुमार
१९८१ – डॉ. बी.के. गोयल
१९८२ – सुनील दत्त
१९८७ – सद्रुद्दिन दाया
१९८८ – डॉ. त्रिंबक कृष्ण टोपे
१९८९ – नाना चुडासमा
१९९० – नाना चुडासमा 
१९९१ – होमी सेठना
१९९३ – फखरुद्दिन टी. खोरकीवाला
१९९४ – आय. एम. कादरी
१९९५ – सुनील गावस्कर
१९९६ – सुबीर कुमार चौधरी 
१९९७ – उषा किरण
१९९८ – कुलवंत सिंग कोहली 
१९९९ – चंद्रकांत बक्षी 
२००० – ऑगस्टीन पिंटो
२००२ – किरण शांताराम
२००३ – किरण शांताराम
२००४ – जगन्नाथराव हेगडे 
२००६ – विजयपथ सिंघानिया
२००८ – डॉ. इंदू साहनी