१९०७ सुरत अधिवेशन    
०१. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी जहाल गटाकडून लाला लजपत राय यांचे नाव होते. मुळात हे अधिवेशन नागपूर येथे भरणार होते. पण नागपुरातील जहालांच्या प्रभावामुळे हे अधिवेशन मवाळांनी सुरत येथे भरविले. अधिवेशनाच्या कार्यक्रमपत्रिकेतून मवाळांनी चतुःसूत्रीपैकी राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार हे दोन शब्द वगळले.


०२. या कारणामुळे येथेच जहाल व मवाळ यांच्यात फुट पडली. त्यामुळेच याला कॉंग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन म्हणतात. 
१९१० अलाहाबाद अधिवेशन 

०१. विल्यम वेडर्नबर्न हे अधिवेशनाचे दोनदा अध्यक्ष बनणारे एकमेव ब्रिटीश व्यक्ती ठरले. या अधिवेशनात कॉंग्रेस नेत्यांनी भारतात ग्रामपंचायतींची स्थापना करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली.

१९११ कलकत्ता अधिवेशन 
०१. येथे रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदाच जन-गण-मन हे गीत गायले. १९१६ लखनौ अधिवेशन 
०१. येथे लोकमान्य टिळकांनी एनी बेझंट यांच्या सहाय्याने जहाल व मवाळ यांना एकत्र आणले. येथेच टिळकांनी बैरिस्टर जीनांच्या सहाय्याने कॉंग्रेस व मुस्लीम लीगला एकत्र आणले. म्हणून या अधिवेशनाला लखनौ एक्स करार असे म्हणतात. 

०२. या अधिवेशनात बिहारमधील चंपारण्य परिसरातील नीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या अन्यायासंबंधी राजीव शुक्ला नावाच्या शेतकऱ्याने गांधींना खबर दिली होती.१९१७ कलकत्ता अधिवेशन   
०१. डॉ. एनी बेझंट कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. या अधिवेशनाला पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्यांदाच उपस्थित होते. येथेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यतेचा विरोधात ठराव मांडला. या ठरावावर टिळक वगळता सर्वांनी सह्या केल्या. १९२० नागपूर अधिवेशन 
०१. या अधिवेशनात असहकार चळवळीचा ठराव मंजूर करण्यात आला. यथेच कॉंग्रेसने घटनेत बदल केले आणि भाषिक आधारावर प्रांतिक समित्या नेमल्या. या कारणामुळे १९२० साली बैरिस्टर जीना, डॉ. एनी बेझंट व बिपिनचंद्र पाल यांनी कॉंग्रेस सोडली. 

०२. येथेच लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली AITUC “ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस’चे अधिवेशन भरले होते. 

०३. हे अधिवेशन संपल्यानंतर १९२० सालीच कलकत्ता येथे एक विशेष अधिवेशन लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले. जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यामुळे हे अधिवेशन भरविण्यात आले होते. १९२२ गया अधिवेशन  
०१. या अधिवेशनात देशबंधूंनी पंचसूत्री योजना मांडली. त्यात भारताच्या पुनर्निर्मितीसाठी पंचायतराजचे आवश्यकता आहे असे मत मांडण्यात आले. १९२३ दिल्ली अधिवेशन 
०१. वयाच्या ३४व्या वर्षी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारे सर्वात लहान वयाचे अध्यक्ष मौलाना आझाद ठरले. या अधिवेशनात स्वराज्य पक्षास निवडणुका लढविण्यास कॉंग्रेसने मान्यता दिली.१९२४ बेळगाव अधिवेशन 
०१. महात्मा गांधी अध्यक्ष बनलेले एकमेव अधिवेशन म्हणून बेळगाव अधिवेशन प्रसिद्ध आहे. १९२५ कानपूर अधिवेशन 
०१. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या प्रथम भारतीय महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू बनल्या. याच अधिवेशनात गणेश शंकर विद्यार्थी यांनी ‘झेंडा उंचा रहे
हमारा’ हे गीत गायले. १९२८ कलकत्ता अधिवेशन 
०१. या अधिवेशनात ‘नेहरू अहवाल’ सादर करण्यात आला. नेहरू अहवाल मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने तयार केला होता. त्या समितीचे सचिव पंडित जवाहरलाल नेहरू होते.१९२९ लाहोर अधिवेशन 
०१. संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे कॉंग्रेसचे हे पहिले अधिवेशन होते. यावेळी व्यासपिठावर नेताजी सुभाषचंद्र बोस होते. 

०२. या अधिवेशनात २६ जानेवारी हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. २६ जानेवारी १९३० रोजी रावी नदीच्या तीरावर पंडित नेहरूंच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
१९३१ कराची अधिवेशन 
०१. या अधिवेशनात मुलभूत हक्कांचा ठराव मांडण्यात आला. याच अधिवेशनात कॉंग्रेसच्या आर्थिक धोरणांच्या कार्यक्रमाचा ठराव पास करण्यात आला. याच अधिवेशनात गांधी-आयर्विन करारास मान्यता देण्यात आली. याच अधिवेशनात दुसऱ्या गोलमेज परिषदेत जाण्यासाठी गांधीजींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.१९३३ कलकत्ता अधिवेशन  
०१. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या महिला अध्यक्ष बनायचा मान निली सेनगुप्ता यांना मिळाला.१९३७ फैजपूर अधिवेशन 

०१. महराष्ट्रातील जळगाव जिल्यातील, यावल तालुक्यातील, फैजपूर येथे हे अधिवेशन भरले होते. कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील हे पहिलेच अधिवेशन होते. या अधिवेशनात शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.


राष्ट्रीय सभेची अधिवेशने – भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

इंडियन नैशनल कॉंग्रेस – भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

इंडियन नैशनल कॉंग्रेस – भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा 


इंडियन नैशनल कॉंग्रेस – भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा