फिरोजशाह मेहता

जन्म : ४ ऑगस्ट १८४५
जन्मस्थळ : मुंबई

ओळख

मुंबईचा सिंह
भारतातील सर्वोत्तम वादपटू
मुंबईचा चारवेळा महापौर

१८६९ साली मुंबईत ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची एक शाखा स्थापन करण्यात आली होती. त्या शाखेचे ते सचिव होते.

१८६९ ते १८७६ या सालापर्यंत त्यांनी मुंबई हायकोर्टात वकिली केली.१८८२ ते १८८३ या काळात त्यांनी इल्बर्ट बिलाविरुद्ध मोठे आंदोलन केले.

१८८४ ते १८८५ या काळात त्यांची मुंबई महानगरपालिकेवर निवड झाली.१९०४ साली त्यांनी लॉर्ड कर्झनच्या विद्यापीठ कायद्यावर तीव्र टीका केली.

१९०९ साली काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. १८९० साली सुद्धा ते कोलकाता येथेच भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

१९१३ साली त्यांनी ‘बॉम्बे क्रोनिकल” हे वृत्तपत्र सुरु केले.१९१५ साली ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू बनले

५ नोव्हेंबर १९१५ रोजी त्यांचे निधन झाले.