डॉ. एनी बेझंट

डॉ. एनी बेझंट या मुळच्या आयरलैंडच्या विदुशी होत्या.१८९१ साली त्या भारतात विवेकानंद यांच्या निमंत्रणावरून आल्या.

वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेऊन हिंदू धर्माचा स्वीकार केला.१८९३ साली भारतात आलेल्या थिऑसॉफिकल सोसायटीत रुजू होणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या.

मंडालेच्या तुरुंगातून टिळक सुटल्यानंतर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनीच केला. १९१६ च्या लखनौ अधिवेशनात टिळक परत काँग्रेसमध्ये आले.

डॉ.एनी बेझंट यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे १९१७ च्या कोलकाता अधिवेशनाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या.

पहिल्या महायुद्धात इंग्रजांची अडचण हीच भारतासाठी सुवर्णसंधी आहे असा कानमंत्र त्यांनी भारतीयांना दिला.

भारतासाठी व भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन प्रचार सुरु केला.

त्यावेळी त्यांचे प्रसिद्ध वाक्य पुढील होते, “इंग्रजांकडे आम्ही आमचा हक्क मागतोय भीक नव्हे”

१९२२ साली त्यांनी बॅनर्स येथे हिंदू विद्यालयाची स्थापना केली.भारतात त्यांनीच प्रथम बालवीर चळवळ सुरु केली.

संबंध भारतात त्यांनीच प्रथम होमरूल लीग स्थापना केली.