पद्म पुरस्कार २०१६

पद्म पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. पद्म पुरस्कारांची सुरुवात १९५४ सालापासून करण्यात आली. पण १९७८ ते १९७९ आणि १९९३ ते १९९६ या कालखंडात यामध्ये खंड पडला. या सहा वर्षात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले नाहीत.

* पद्म पुरस्कार कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक जीवन, विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग व व्यापार, वैद्यकीय सेवा, साहित्य व शिक्षण, नागरी सेवा, क्रीडा या प्रमुख ९ व इतर काही क्षेत्रातून निवडक लोकांना प्रदान केले जातात.

* प्रत्येक राज्यातील सरकार, केंद्रीय मंत्री, पूर्वी भारतरत्न व पद्म पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्ती, राज्यांचे मुख्यमत्री व राज्यपाल इत्यादी व्यक्ती पद्म पुरस्कारासाठी समितीकडे कोणत्याही व्यक्तीची शिफारस करू शकतात. पद्म पुरस्कार समिती दरवर्षी पंतप्रधानाकडून ठरविली जाते.

* प्रत्येक वर्षी १ मे ते १५ सप्टेंबर दरम्यान या शिफारसी स्वीकारल्या जातात. 'पद्मपुरस्कार समिती' नंतर या नावातून काही जणांची शिफारस पंतप्रधान व राष्ट्रपतींकडे करते. एका वर्षात पद्म पुरस्कार प्रदान केल्या जाणार्या व्यक्तींची संख्या १२० पेक्षा जास्त असू नये. (विदेशी नागरिक व मरणोत्तर पुरस्कार वगळता). 

* प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर केले जातात. दरवर्षी नंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यात एक सोहळ्यात हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातात. 

* राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीचा पुरस्कार रद्द करू शकतात किंवा परत काढून घेऊ शकतात.

* प्रत्येक विजेत्याला एक पदकाची प्रतिकृती दिली जाते. विजेते ती प्रतिकृती कोणत्याही समारोहात किंवा शासकीय समारंभात परिधान करू शकतात. पण या पुरस्काराचा वापर विजेत्याला कोठेही म्हणजेच लेटरहेड, इन्विटेशन कार्ड, पोस्टर पुस्तके यावर करता येत नाही. पदकाचा कोणत्याही पद्धतीने गैरवापर केल्यास पुरस्कार जप्त करण्यात येऊ शकतो.

* २०१६ साली एकूण ११२ व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी १० व्यक्तीना पद्म विभूषण, १९ व्यक्तींना पद्मभूषण तर ८३ व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदा पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिला आहेत.

* यंदा ५ परदेशी व ५ अनिवासी भारतीय (एकूण १० विदेशी) व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला. १ परदेशी व्यक्तीला पद्मविभूषण, १ परदेशी व १ अनिवासी भारतीय व्यक्तीला पद्मभूषण, ३ परदेशी व ४ अनिवासी भारतीय व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 

* यंदा ४ व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. एका व्यक्तीला पद्मविभूषण, एका व्यक्तीला पद्मभूषण आणि दोघांना पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले. मरणोत्तर पद्मश्रीने सम्मानित करण्यात आलेली एक व्यक्ती अनिवासी भारतीय होती. 

* पद्मविभूषण
०१. यामिनी कृष्णमूर्ती - कला (शास्त्रीय नृत्य) - दिल्ली
०२. रजनीकांत - कला (चित्रपट) - तामिळनाडू
०३. गिरीजा देवी - कला (शास्त्रीय संगीत) - पश्चिम बंगाल
०४. रामोजी राव - साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) - आंध्र प्रदेश 
०५. विश्वनाथन शांता - वैद्यकीय शास्त्र (Oncology) - तामिळनाडू
०६. श्री श्री रविशंकर - इतर (अध्यात्म) - कर्नाटक
०७. श्री जगमोहन - सार्वजनिक जीवन - दिल्ली
०८. डॉ. वासुदेव कालकुंटे आत्रे - विज्ञान व तंत्रज्ञान - कर्नाटक
०९. अविनाश दीक्षित (विदेशी नागरिक) - साहित्य व शिक्षण - यु.एस.ए.
१०. धीरुभाई अंबानी (मरणोत्तर) - उद्योग व व्यापार - महाराष्ट्र


* पद्मभूषण
०१. अनुपम खेर - कला (चित्रपट) - महाराष्ट्र
०२. उदित नारायण झा - कला (पार्श्वगायन) - महाराष्ट्र
०३. राम वनजी सुतार - कला (शिल्पकला) - उत्तर प्रदेश
०४. हेइस्नम कन्हैयालाल - कला (रंगभूमी) - मणिपूर
०५. विनोद राय - नागरी सेवा - केरळ
०६. डॉ. यरलागड्डा लक्ष्मी प्रसाद - साहित्य व शिक्षण - आंध्र प्रदेश
०७. एन. एस. रामानुज ताताचार्य - साहित्य व शिक्षण - महाराष्ट्र 
०८. डॉ. बरजींदर सिंग हमदर्द - साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) - पंजाब
०९. प्रा. डी. नागेश्वर रेड्डी - वैद्यकीय सेवा (Gastroenterology) - तेलंगाना
१०. स्वामी तेजोमयानंदा - इतर (अध्यात्म) - महाराष्ट्र
११. हाफीज कॉन्ट्रैक्टर - इतर (वास्तुकला) - महाराष्ट्र
१२. रवींद्रचंद्र भार्गव - नागरी सेवा - उत्तर प्रदेश
१३. डॉ. वेंकट रामा राव अल्ला - विज्ञान व तंत्रज्ञान - आंध्रप्रदेश
१४. सायना नेहवाल - क्रीडा (बैडमिंटन) - तेलंगाना
१५. सानिया मिर्झा - क्रीडा (टेनिस) - तेलंगाना
१६. इंदू जैन - उद्योग व व्यापार - दिल्ली
१७. स्वामी दयानंद सरस्वती (मरणोत्तर) - इतर (अध्यात्म) - उत्तराखंड
१८. रोबर्ट ब्लैकविल (विदेशी नागरिक) - नागरी सेवा - यु.एस.ए.
१९. पालनजी शापूरजी मिस्त्री (अनिवासी भारतीय) -  उद्योग व व्यापार - आयरलैंड


* पद्मश्री
०१. प्रतिभा प्रह्लाद - कला (शास्त्रीय संगीत) - दिल्ली
०२. भिकुदान गढवी - कला (लोकसंगीत) - गुजरात
०३. श्रीभास चंद्र सुपकार - कला (वस्त्र कला) - उत्तर प्रदेश
०४. अजय देवगण - कला (चित्रपट) - महाराष्ट्र
०५. प्रियांका चोप्रा - कला (चित्रपट) - महाराष्ट्र
०६. तुलसीदास बोरकर - कला (शास्त्रीय संगीत) - गोवा
०७. सोमा घोष - कला (शास्त्रीय गायन) - उत्तर प्रदेश
०८. नीला माधब पंडा - कला (चित्रपट दिग्दर्शन) - दिल्ली
०९. एस.एस. राजामौली - कला (चित्रपट दिग्दर्शन) - कर्नाटक
१०. मधुर भांडारकर - कला (चित्रपट दिग्दर्शन) - महाराष्ट्र
११. पंडित एम. वेंकटेश कुमार - कला (लोककलाकार) - कर्नाटक
१२. गुलाबी सपेरा - कला (लोक नृत्य) - राजस्थान
१३. ममता चंद्राकर - कला (लोक संगीत) - छत्तीसगड
१४. मलिनी अवस्थी - कला (लोक संगीत) - उत्तर प्रदेश
१५. जयप्रकाश लेखीवाल - कला (सूक्ष्म चित्रकला) - दिल्ली
१६. के. लक्ष्मा गौड - कला (चित्रकला) - तेलंगाना
१७. भालचंद्र दत्तात्रय मोंढे - कला (छायाचित्र कला) - मध्य प्रदेश
१८. नरेश चंदर लाल - कला (रंगभूमी व चित्रपट) - अंदमान आणि निकोबार
१९. धीरेंद्र नाथ बेजबरुआ - साहित्य व शिक्षण - आसाम
२०. प्रह्लाद चंद्र तसा - साहित्य व शिक्षण - आसाम
२१. रवींद्र नागर - साहित्य व शिक्षण - दिल्ली
२२. दह्याभाई शास्त्री - साहित्य व शिक्षण - गुजरात
२३. संतेशिवरा भैरप्पा - साहित्य व शिक्षण - कर्नाटक
२४. हलदार नाग - साहित्य व शिक्षण - ओडिशा
२५. कामेश्वरम ब्रह्मा - साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) - आसाम 
२६. पुष्पेश पंत - साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) - दिल्ली
२७. जवाहरलाल कौल - साहित्य व शिक्षण (पत्रकारिता) - जम्मू आणि काश्मीर
२८. अशोक मलिक - साहित्य व शिक्षण - दिल्ली
२९. मन्नाम गोपी चंद - वैद्यकीय सेवा (हृदय शस्त्रक्रिया) - तेलंगाना
३०. रवि कांत - वैद्यकीय सेवा (शल्यचिकित्सा) - उत्तर प्रदेश
३१. राम हर्ष सिंग - वैद्यकीय सेवा (आयुर्वेद) - उत्तर प्रदेश
३२. शिव नारायण कुरील - वैद्यकीय सेवा (बाल शस्त्रक्रिया) - उत्तर प्रदेश
३३. सब्यसाची सरकार - वैद्यकीय सेवा (क्ष-किरण तज्ञ) - उत्तर प्रदेश
३४. डॉ. अला गोपाल कृष्ण गोखले - वैद्यकीय सेवा (हृदयरोग तज्ञ) - आंध्र प्रदेश
३५. टी. के. लाहिरी - वैद्यकीय सेवा (हृदयरोग तज्ञ) - उत्तर प्रदेश
३६. प्रवीण चंद्र - वैद्यकीय सेवा (हृदयरोग तज्ञ) - दिल्ली
३७. दलजित सिंग गंभीर - वैद्यकीय सेवा (हृदयरोग तज्ञ) - उत्तर प्रदेश
३८. चंद्रशेखर शेषाद्री थोगुलुवा - वैद्यकीय सेवा (Gastroenterology) - तामिळनाडू
३९. डॉ. अनिल कुमारी मल्होत्रा - वैद्यकीय सेवा (Homeopathy) - दिल्ली
४०. एम.व्ही. पद्मा श्रीवास्तव - वैद्यकीय सेवा (Neurology) - दिल्ली
४१. डॉ. सुधीर व्ही. शाह - वैद्यकीय सेवा (Neurology) - गुजरात
४२. एम.एम. जोशी - वैद्यकीय सेवा (Ophthalmology) - कर्नाटक
४३. डॉ. जॉन एबनेजर - वैद्यकीय सेवा (Orthopaedic Surgery) - कर्नाटक
४४. डॉ. नयुदम्मा यरलागड्डा - वैदकीय सेवा (Paediatric Surgery) - आंध्र प्रदेश
४५. सिमोन ओरओन - इतर (पर्यावरण संरक्षण) - झारखंड
४६. इम्तियाज कुरेशी - इतर (स्वयंपाक शास्त्र) - दिल्ली
४७. पियुष पांडे - इतर (जाहिरात तज्ञ) - महाराष्ट्र
४८. सुभाष पालेकर - इतर (शेती शास्त्र) - महाराष्ट्र
४९. रवींद्र कुमार सिन्हा - इतर (वन्यजीव संरक्षण) - बिहार
५०. एच. आर. नागेंद्र - इतर (योगा) - कर्नाटक
५१. महेश चंद्र मेहता - सार्वजनिक जीवन - दिल्ली
५२. एम.एन. कृष्ण मनी - सार्वजनिक जीवन - दिल्ली
५३. उज्वल निकम - सार्वजनिक जीवन - महाराष्ट्र
५४. तोखेओ सेमा - सार्वजनिक जीवन - नागालैंड
५५. डॉ. सतीश कुमार - विज्ञान व तंत्रज्ञान - दिल्ली
५६. डॉ. म्यलस्वामी अण्णादुराई - विज्ञान व तंत्रज्ञान - कर्नाटक
५७. दीपांकर चटर्जी - विज्ञान व तंत्रज्ञान - कर्नाटक
५८. डॉ. गणपती दादासाहेब यादव - विज्ञान व तंत्रज्ञान - महाराष्ट्र
५९. वीणा टंडन - विज्ञान व तंत्रज्ञान - मेघालय
६०. ओंकार नाथ श्रीवास्तव - विज्ञान व तंत्रज्ञान - उत्तर प्रदेश
६१. सुनिता कृष्णन - सामाजिक कार्य - आंध्र प्रदेश
६२. अजोय कुमार दत्ता - सामाजिक कार्य - आसाम
६३. एम. पंडित दास - सामाजिक कार्य - कर्नाटक
६४. पी.पी. गोपीनाथन अय्यर - सामाजिक कार्य - केरळ
६५. मादेलीन हर्मन द ब्लिच - सामाजिक कार्य - पुदुचेरी
६६. श्रीनिवासन दमल कांदालाई - सामाजिक कार्य - तामिळनाडू
६७. सुधाकर ओलवे - सामाजिक कार्य - महाराष्ट्र
६८. डॉ. टी. व्ही. नारायणा - सामाजिक कार्य - तेलंगाना
६९. अरुणाचलम मुरुगंथम - सामाजिक कार्य - तामिळनाडू
७०. दीपिका कुमारी - क्रीडा (तिरंदाजी) - झारखंड
७१. सुशील दोषी - क्रीडा (वृत्तनिवेदन) - मध्य प्रदेश 
७२. महेश शर्मा - उद्योग व व्यापार - दिल्ली
७३. सौरभ श्रीवास्तव - उद्योग व व्यापार - दिल्ली
७४. दिलीप संघवी - उद्योग व व्यापार - महाराष्ट्र
७५. डॉ. केकी होमरुसजी घरडा - उद्योग व व्यापार - महाराष्ट्र
७६. प्रकाश चंद सुराणा (मरणोत्तर) - कला (शास्त्रीय संगीत) - राजस्थान
७७. सईद जाफरी (अनिवासी भारतीय) (मरणोत्तर) - कला (चित्रपट) - यु.के.
७८. मायकेल पोस्तेल (विदेशी) - कला (पुरातत्व क्षेत्र) - फ्रान्स
७९. सलमान अमीन साल खान (अनिवासी भारतीय) - साहित्य व शिक्षण - यु.एस.ए.
८०. हुई लान झांग (विदेशी) - इतर (योगा) - चीन
८१. प्रेद्राग के. निकिक (विदेशी) - इतर (योगा) - सर्बिया
८२. सुंदर आदित्य मेनन (अनिवासी भारतीय) - सामाजिक कार्य - यु.ए.इ.
८३. अजयपाल सिंग बग्गा (अनिवासी भारतीय) - उद्योग व व्यापार - यु.एस.ए.