राष्ट्रीय सभेची अधिवेशने - भाग ३

१९३८ हरिपुरा अधिवेशन 
०१. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखालील या अधिवेशनात नेताजींनी योजना बनविण्यासाठी एखादी समिती असावी अशी शिफारस केली. म्हणूनच त्यांना 'Father Of Indian Planning Commision' असे म्हटले जाते. 
०२. त्यामुळे या अधिवेशनात पंडीत नेहरूंच्या अध्यक्षतेखाली "राष्ट्रीय योजना समिती'ची स्थापना करण्यात आली. भारत पारतंत्र्यात असताना व भारत स्वतंत्र झाल्यानंतर दोन्ही वेळेस "नियोजन आयोगा"चे अध्यक्ष बनण्याचा मान पंडित नेहरू यांना मिळाला.१९३९ त्रिपुरी अधिवेशन  
०१. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत नेताजींनी गांधीजींचे शिष्य 'पट्टाभी सीतारमय्या' यांचा पराभव केला. सलग दुसऱ्या वर्षी नेताजी कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनले. 

०२. परंतु या कारणामुळे गांधी प्रणीत कॉंग्रेस गटाने व कार्यकारिणीने नेताजींना सहकार्य करण्यास नकार दिला. त्यामुळे नेताजींनी कॉंग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

०३. त्यानंतर कॉंग्रेसने डॉ. राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष पदावर नियुक्ती केली. एकाच अधिवेशनाला दोन अध्यक्ष बनविण्याची ही कॉंग्रेसच्या अधिवेशनातील पहिली वेळ होती.१९४२ मुंबई अधिवेशन 
०१. १९४० ते १९४५ अशा दीर्घ काळापर्यंत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर राहिलेली एकमेव व्यक्ती मौलाना आझाद होते. या अधिवेशनात चले जाव चळवळीचा ठराव मांडण्यात आला. १९४६ मीरत अधिवेशन 
०१. यावेळी अध्यक्ष जे.बी. कृपलानी होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळीसुद्धा अध्यक्षपद यांच्याकडेच होते.इतर माहिती 
०१. १९३५च्या कॉंग्रेस मुस्लीम कराराचे जनक मौलाना आझाद होते. 

०२. राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले भारतीय सेक्रेटरी अयोध्यानाथ कुंझरू होते. 

०३. १८९१ च्या नागपूर कॉंग्रेस अधिवेशनाचे जनक पी. आनंद चार्लू हे राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले हिंदू अध्यक्ष होते.

०४. १९४८ च्या कॉंग्रेसच्या जयपूर येथील हीरकमहोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या होते. 

०५. १९६५ च्या दुर्गापूर येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या अमृतमहोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्ष के. कामराज होते.

०६. १९८५ साली मुंबई येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या शतक महोत्सवी अधिवेशनाचे अध्यक्ष राजीव गांधी होते. कॉंग्रेसची अधिवेशने व त्यांचे अध्यक्ष

वर्षठिकाणअधिवेशनाचे अध्यक्षउपस्थिती
१८८५मुंबईव्योमेश चंद्र बैनर्जी ७२
१८८६कलकत्तादादाभाई नौरोजी४३४
१८८७मद्रास बद्रुद्दीन तय्यबजी६०७
१८८८अलाहाबादजॉर्ज यूल१२४८
१८८९मुंबई विल्यम वेडरबर्न १८८९
१८९०कलकत्ता फिरोजशाह मेहता६७७
१८९१नागपूरआनंद चार्लू८१२
१८९२अलाहाबाद व्योमेश चंद्र बैनर्जी ६२५
१८९३लाहोरदादाभाई नौरोजी ८६७
१८९४मद्रास आल्फ्रेड वेब११६३
१८९५पुना सुरेंद्रनाथ बैनर्जी १५८४
१८९६कलकत्तारहिमतुल्ला एम. सयानी ७८४
१८९७अमरावती सी. संकरन नायर६९२
१८९८मद्रास आनंदमोहन बोस६१४
१८९९लखनौरोमेश चंद्र दत्त७३९
१९००लाहोरसर नारायण गणेश चंदावरकर५६७
१९०१कलकत्ता दिनशा एदुल्जी वाच्छा८९६
१९०२अहमदाबादसुरेंद्रनाथ बैनर्जी ४७१
१९०३मद्रास लालमोहन घोष५३८
१९०४मुंबई हेन्री कॉटन१०१०
१९०५बनारस गोपाल कृष्ण गोखले७५७
१९०६कलकत्ता दादाभाई नौरोजी १६६३
१९०७सुरत रासबिहारी घोष0
१९०८मद्रास रासबिहारी घोष५६२
१९०९लाहोर मदन मोहन मालवीय २४३
१९१०अलाहाबाद विल्यम वेडरबर्न ६३६
१९११कलकत्ता बिशन नारायण दर ४४६
१९१२बांकीपूर रघुनाथ नरसिंह मुधोळकर
१९१३कराची नवाब सय्यद मुहम्मद बहादूर ३४९
१९१४मद्रास भूपेंद्र नाथ बोस
१९१५मुंबई लॉर्ड सत्येंद्र प्रसन्न सिन्हा २२५९
१९१६लखनौ अंबिका चंद्र मझुमदार २२९८
१९१७कलकत्ता एनी बेझंट ४९६७
१९१८दिल्ली मदन मोहन मालवीय ४८६५
१९१८मुंबई (विशेष सत्र)सय्यद हसन इमाम ३८४५
१९१९अमृतसर मोतीलाल नेहरू७०३१
१९२०कलकत्ता (विशेष सत्र)लाला लजपतराय
१९२०नागपूर सी. विजयारंगाचारी१४५८२
१९२१अहमदाबाद हकीम अजमल खान४७२८
१९२२गया देशबंधू चित्तरंजन दास ३२४८
१९२३काकीनाडा मोहम्मद अली जौहर
१९२३दिल्ली (विशेष सत्र)अबुल कलाम आझाद
१९२४बेलगाम महात्मा गांधी १८४४
१९२५कानपूर सरोजिनी नायडू२६८८
१९२६गुवाहाटी एस. श्रीनिवास अय्यंगार ३०००
१९२७मद्रास मुख्तार अहमद अन्सारी२७११
१९२८कलकत्ता मोतीलाल नेहरू५२२१
१९२९लाहोर जवाहरलाल नेहरू
१९३१कराची सरदार वल्लभभाई पटेल
१९३२दिल्ली रणछोडलाल अमृतलाल
१९३३कलकत्ता नेली सेनगुप्ता
१९३४मुंबई राजेंद्र प्रसाद
१९३६लखनौ जवाहरलाल नेहरू
१९३७फैजपूर जवाहरलाल नेहरू
१९३८हरिपुरा सुभाषचंद्र बोस
१९३९त्रिपुरी सुभाषचंद्र बोस २२८५
१९४०रामगड अबुल कलाम आझाद
१९४७मीरत जीवतराम भगवानदास कृपलानी
१९४८जयपूर पट्टाभी सीतारामय्या
१९५०नासिक पुरुषोत्तम दास टंडन
१९५१दिल्ली जवाहरलाल नेहरू
१९५३हैदराबाद जवाहरलाल नेहरू
१९५४कलकत्ता जवाहरलाल नेहरू
१९५५आवडी उच्छरंगराई नवलशंकर ढेबर
१९५६अमृतसर उच्छरंगराई नवलशंकर ढेबर
१९५७इंदोरउच्छरंगराई नवलशंकर ढेबर
१९५८गुवाहाटी उच्छरंगराई नवलशंकर ढेबर
१९५९नागपूर उच्छरंगराई नवलशंकर ढेबर
१९५९दिल्ली इंदिरा गांधी
१९६०बंगलोर नीलम संजीव रेड्डी
१९६१भावनगर नीलम संजीव रेड्डी
१९६२पटनानीलम संजीव रेड्डी
१९६४भुवनेश्वर कुमारस्वामी कामराज
१९६५दुर्गापूर कुमारस्वामी कामराज
१९६६जयपूर कुमारस्वामी कामराज
१९६८हैदराबाद सिद्दावनहल्ली निजलिंगप्पा
१९६८गुजरात सिद्दावनहल्ली निजलिंगप्पा
१९६९फरीदाबाद पी. मेहुल
१९७०मुंबई जगजीवन राम
१९७२कलकत्ता शंकर दयाल शर्मा
१९७५चंदीगड देवकांत बरुआ
१९७८दिल्ली इंदिरा गांधी
१९८३कलकत्ता इंदिरा गांधी
१९८५मुंबई राजीव गांधी
१९९२तिरुपती पामुलपरती वेंकट नरसिम्हा राव
१९९६कलकत्ता सीताराम केसरी
१९९८कलकत्ता सोनिया गांधी