०१. सुंदरबन  भारत आणि बांगलादेश मध्ये पसरलेले असून. त्याचा बहुतांश भाग बांगलादेश मध्ये आहे. पश्चिम बंगालमधील २४ परगणा दक्षिण या सुंदरबनचा भाग आहे.

०२. तेजस स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे. २००३ मध्ये तत्कालीन  पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तेजस असे नामकरण केले. ते ‘मिग-२१’ या विमानाची जागा घेईल.

०३. ३१ वे ऑलिम्पिक ब्राझील मधील रिओ या शहरात पार पडले. यामध्ये एकूण २०७ (२०६ देश + १ निर्वासितांचा संघ) संघ सहभागी झाले होते. याच्या उदघाटनात ‘हवामान बदल’ या विषयावर चर्चा करण्यात आली.

०४. ८८ व्या ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट पुरस्कार “सन ऑफ सॉल” या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट एनिमेटेड लघु चित्रपट ‘बेअर स्टोरी’, सर्वोत्कृष्ट एनिमेटड फिचर पुरस्कार ‘इनसाईड आउट’ तर सर्वोत्कृष्ट अनुबोधपट पुरस्कार ‘एमी’ या चित्रपटाला मिळाला. 

०५. जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आहेत.

०६. ऑल्विन टॉफ्लर यांनी फ्युचर शॉक, पॉवर शिफ्ट व थर्ड वेव्ह हे ग्रंथ लिहिले आहेत.

०७. ‘अणवस्त्र तंत्रज्ञान नियंत्रण नियम’ (MTCR) या गटात ३५ राष्ट्रे आहेत. भारत जून २०१६ मध्ये या गटात समाविष्ट झाला. प्रथमच भारताचा समावेश अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात झाला आहे.क्षेपणास्त्रे आणि वैमानिक विरहित विमानाच्या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवणे हा या गटाचा मुख्य उद्देश आहे.

०८. हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या गुरुग्राम या नावाने ओळखला जातो.

०९. २०१४ ते २०१६ या कालावधीत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लुर या होत्या.

१०. युरोपियन युनियनचे मुख्यालय ब्रुसेल्स येथे आहे. ब्रिटन १९७३ मध्ये यामध्ये सहभागी झाला. कोर्ट ऑफ जस्टीस आणि युरोपियन कमिशन या EU च्या उपसंस्था आहेत.

११.  नवज्योतसिंग सिधु यांनी १८ जुलै २०१६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

१२. २१ ऑक्टोबर २०१५ रोजी जाहीर झालेले २०१२-१३ चे शिव छत्रपती पुरस्कार विजेते 
जीवन गौरव – रमेश विपट
नेमबाजी – राही सरनौबत
जिम्नॅस्टिक – रोमा जोगळेकर
जिजामाता – नंदिनी बोगाडे

१३. ISRO म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन 

१४. रा.ची. ढेरे यांनी चक्रपाणी, त्रिविधा, लज्जागौरी हे ग्रंथ लिहिले आहेत.

१५. सर्वोच्च  न्यायालयाप्रमाणे प्रत्येक उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे भारताचे नागरिक असावेच लागतात. प्रत्येक उच्च न्यायालयाचे त्यांच्या कर्मचारीवर्गावर पूर्ण नियंत्रण असते. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती हे भारताच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्ला मसलती नंतर करतात.

१६. नागालँड राज्याची स्थापना १९६३ या वर्षी झाली. मणिपूर राज्याची स्थापना १९७२ या वर्षी झाली. गोवा राज्याची स्थापना १९८७ या वर्षी झाली. झारखंड राज्याची स्थापना २००० या वर्षी झाली. संदर्भ

१७. भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या ५०० तर कमीत कमी ६० आहे. तरतूद (कलम १७०) संदर्भ

१८. १७७६ साली सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीवरून ४२व्या घटनादुरुस्तीने १० मुलभूत कर्तव्यांची यादी घटनेत समाविष्ट केली. ८६ व्या घटनादुरुस्तीने २००२ साली ११ वे कर्तव्य घटनेत समाविष्ट करण्यात आले. संदर्भ

१९. ग्रामपंचायतींना घरे, व्यवसाय, वाहने, यात्रे करी, स्थावर मालमत्ता, जन्म विवाह, बाजारी पिके, पाणीपुरवठा, बाजार, जकात सफाई इ. प्रकारचे कर वा शुल्क आकारता येतात. शिवाय स्वतःच्या मालमत्तेपासून किंवा पंचायत समितीच्या व सरकारी अनुदानातून पैसा उपलब्ध होतो. संदर्भ

२०. पंचायत राज संस्थेच्या निवडणूक लढविण्यासाठी कमीत कमी वय २१ वर्षे आवश्यक आहे.

२१. मूलभूत हक्क संदर्भ
कायद्यासमोर समानता – कलाम १४
जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण – कलम २१
धार्मिक स्वातंत्र्य – कलम २५
शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण – कलम २८

२२. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल १९९४ मध्ये करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेणे हे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य आहे. राज्य विधानसभेची निवडणूक घेणे हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे कार्य आहे. संदर्भ 

२५. विधान परिषद जोड्या संदर्भ
पदवीधर मतदारसंघ – १/१२ सदस्य
विधानसभा सदस्यांद्वारे निवड – १/३ सदस्य
राज्यपाल नियुक्त सदस्य – १/६ सदस्य
परिषदेची गणपूर्ती – १/१० सदस्य

२६. पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून क्रॉफर्ड मार्केट पर्यंत होती.

२७. ब्रिटिशकालीन भारतात जमीनदारी, रयतवारी आणि महालवारी या शेतसारा वसूल करण्याच्या पद्धती होत्या. संदर्भ

२८. ऍनी बेझंट यांनी न्यू इंडिया हे वृत्तपत्र सुरु केले होते. संदर्भ

२९. १९४६ साली भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनमध्ये तीन सदस्य होते. त्यात लॉर्ड पॅट्रिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश होता. संदर्भ

३०.नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. (बॉंबे मिल हॅन्ड्स असोसिएशन) संदर्भ

३१. इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी १६ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर केला. संदर्भ

३२. ‘भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ’ याची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.

३३. ५ मार्च १९४८ रोजी सी. राजगोपालचारी यांची भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. तत्पूर्वी १५ ऑगस्ट १९४७ पासून १९४८ पर्यंत लॉर्ड माउंटबटन भारताचे गव्हर्नर जनरल होते. संदर्भ

३४. जोड्या लावा संदर्भ
स्वातंत्र्य, समता बंधुता – जेम्स स्टीफन्स
कायमधारा पद्धती – लॉर्ड कॉर्नवॉलिस
महालवारी पद्धती – लॉर्ड विल्यम बेंटिक
रयतवारी पद्धत – थॉमस मन्रो

३५. ‘आर्य महिला समाज’ ही संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली. संदर्भ

३६. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली.

३७. अभिनव भारत ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. संदर्भ

३८. कायदेशीर सुधारणा संदर्भ
सिविल प्रोसिजर कोड – १८५९
इंडियन पिनल कोड – १८६१
राणीचा जाहीरनामा – १८५८
व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट – १८८०

३९. पहिले महिला विद्यापीठ १९१६ मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केले. (Print Mistake in Q Paper 1816संदर्भ

४०. जलसिंचन योजना
देवघर – पुणे
पुणेगाव – नाशिक
मांजरा – उस्मानाबाद
नळगंगा – बुलढाणा 

४१. महाराष्ट्रातील खाड्यांचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे 
तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी

४२. फरिदाबाद हे  उपग्रह शहर आहे. हे शहर दिल्लीपासून ५० किमी अंतरावर आहे.

४३. भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील इंदिरा पॉईंट हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते ६ अंश ४५ मिनिट उत्तर अक्षवृत्तावर आहे.

४४. महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात बॉकसाईट चे साठे आहेत.

४५. नद्या जोड्या
तापी – अनेर
मांजरा – तावरजा
प्रवरा – मुळा
भीमा – घोड

४६. पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास मालगुझरी म्हणतात.

४७. सिक्कीम हे राज्य २०१५ मध्ये सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केले गेले.

४८. रेल्वे विभाग जोड्या
पश्चिम विभाग – चर्चगेट (मुंबई)
पूर्व मध्य विभाग – हाजीपूर
पूर्व किनारी विभाग – भुवनेश्वर 
उत्तर मध्य विभाग – अलाहाबाद

४९. शहरांच्या वसाहतींचा क्रम
खेडे, शहर, नगर, महानगर, सन्नगर 

५०. उपग्रह जोड्या
गगन – दिशादर्शन
जीसॅट – दळणवळण उपग्रह
कार्टोसॅट – पृथ्वीचे निरीक्षण
ऍग्रोमेट – हवामान व पर्यावरण

५१. नियोजन आयोगाच्या २०१२ च्या प्रसिद्धिपत्रकानुसार २००९-१० मध्ये गरिबीमध्ये छत्तीसगड राज्याचा प्रथम क्रमांक लागतो.

५२. देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत विशिष्ठ कालावधीमध्ये साधारणतः एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाच्या किमतीची एकूण म्हणजे GDP होय.

५३. शेती क्षेत्रातील खूप गर्दीमुळे छुपी बेरोजगारी पाहावयास मिळते.

५४. सद्यस्थितीत IIP चे पायाभूत वर्ष २०११-१२ आहे. यापूर्वी पायाभूत वर्ष २००४-०५ होते.

५५. बँकिंग जोड्या
राष्ट्रीय बँक – आंध्र बँक
विदेशी बँक – उरी बँक
जुनी खाजगी क्षेत्रातील बँक – नैनिताल बँक
नवीन खाजगी क्षेत्रातील बँक – येस बँक

५६. २०११-१२ च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण BPL लोकांचे प्रमाण २१.९% आहे. हे प्रमाण ग्रामीण भागात २५.७% तर शहरी भागात १३.७% आहे. संदर्भ

५७. विनिमय माध्यम, मूल्यमापन, मूल्य संग्रह आणि विलंबित देणी ही सर्व पैशांची कार्ये आहेत.

५८. भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आर्थिक वर्षाचा कालखंड हेच ‘वर्ष’ मानले जाते. (१ एप्रिल ते ३१ मार्च)

५९. २०११ च्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर हजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या १०८४ आहे. २००१ च्या जनगणनेनुसार १०५८ होता.

६०. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनित बदलतो तेव्हा ध्वनीची विपुलता (Amplitude) वाढवतो.

६१. श्राव्यातीत ध्वनी लहरींच्या साहाय्याने केलेली तपासणी अनेक गोष्टीसाठी उपयोगी आहे.
गर्भात असलेला दोष समजण्यासाठी डॉक्टर याचा वापर करतात.
हृदयाच्या झडपांची हालचाल समजण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या अल्ट्रासाउंड  तपासणीला echocardiography असे म्हणतात.

६२. व्हेल, हत्ती, पाणघोडा, गेंडा, जिराफ, ओकापी आणि एलिगेटर इत्यादी प्राणी इन्फ्रासॉनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतात.

६३. ग्लुकोजचे रूपांतर इथील अल्कोहोल मध्ये करण्यासाठी झाय्मेज हे संप्रेरक वापरतात .

६४. कार्बन डायऑक्साइड हा वायू ‘ग्रीन हाउस इफेक्ट’ला कारणीभूत असतो.

६५. प्रत्येक माणसाला दररोज सरासरी श्वसनाद्वारे १५ ते २२ किलो हवा श्वसन केले जाते.

६६. प्राणी जोड्या
लीच – एनिलिडा
ऑक्टोपस – मोलुस्क
डॉगफिश – पायसीज
स्टेगोसारस – रेप्टिलिया

६७. गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगायींचे कवच एकेरी वाल्व ने बनलेले असते.

६८. पालाश हे महत्वाचे पोषकद्रव्य पाणी व क्षारांचे शोषण वाढविते. ऑरगॅनिक ऍसिडच्या चयापचय क्रियेत भाग घेते. अनेक संप्रेरकांना कार्यंवित करते. 

६९. वनस्पतींच्या शेंगधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्ये असतात, ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते. त्या रंगद्रव्यास लेगहिमोग्लोबीन म्हणतात.

७०. कोबाल्ट हे मूलद्रव्य व्हिटॅमिन बी-१२ या जीवनसत्वाचा घटक आहे.