राज्यात वन्यप्राणी गणना 20 जानेवारीपासूनराज्यातील व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित जंगलातील प्राणी गणना 20 ते 25 जानेवारीदरम्यान होणार आहे. 


‘ट्रान्झेक्‍ट’ पद्धतीने होणारी ही गणना चार टप्प्यांत होईल. त्यामुळे संपूर्ण देशातील वाघांसह इतरही प्राण्यांची नेमकी संख्या कळू शकणार आहे. ही प्रक्रिया 15 मार्चपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देशही प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहे. 

मांसभक्षी आणि तृणभक्षक प्राण्यांची गणना राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प, अभयारण्य तसेच संचार प्रकल्पात होणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पात प्रशिक्षण देण्यात आले. हे अधिकारी आपापल्या विभागात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. 

देशभरात प्राणी गणना सुरू झाली असून, महाराष्ट्रात लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे. दर चार वर्षांनंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून (एनटीसीए) ही गणना केली जाते. मागील गणना 2014 मध्ये झाली होती. 

महाराष्ट्रासह देशभरात दोन टप्प्यांत गणना केली जाणार आहे. प्राण्यांचा अधिवास असलेल्या मर्यादित जांगावर ‘कॅमेरे ट्रॅपिंग’ लावून गणनेचे काम केले जाणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.



संसदेत NABARD (दुरूस्ती) विधेयक मंजूर
संसदेच्या राज्‍यसभेत ‘राष्‍ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (दुरूस्ती) विधेयक-2017’ मंजूर करण्यात आले आहे.

विधेयक ‘राष्‍ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अधिनियम-1981’ मध्ये दुरूस्ती करणार. यामध्ये केंद्र शासनाला बँकेची अधिकृत मालमत्ता 5000 कोटी रूपयांवरून वाढवत 30,000 कोटी रूपये करण्याची परवानगी देणारी तरतूद आहे.

भारतात कृषी व ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी ‘राष्‍ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अधिनियम-1981’ अन्वये NABARD ची स्थापना करण्यात आली. 

NABARD ला कृषी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये औद्योगिक विकासासाठी कर्ज यासारख्या सुविधा प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या नियमनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. 

सध्या NABARD मध्ये 99.6% भागीदारी केंद्र शासनाची तर उर्वरित भारतीय रिजर्व बँकेची आहे. वर्तमानात भारतात कृषी क्षेत्राचा सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 17.40% वाटा आहे.



प्रसिद्ध उर्दू कवी अनवर जलालपूरी यांचे निधन
प्रसिद्ध शायर आणि उर्दू कवी अनवर जलालपुरी यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले आहे.

“गीता” उर्दू शायरीत प्रस्तुत करणार्‍या अनवर जलालपुरी यांनी गीताच्या 701 श्लोकांना 1761 उर्दूमध्ये भाषांतरित केले होते. लखनऊच्या या कवीने ‘उर्दू शायरी में गीता’ या शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध केले.


ग्लोब सॉकरचा सर्वोत्तम खेळाडू ‘ख्रिस्तियानो रोनाल्डो’
पोर्तुगाल व रिअल माद्रिद क्लबचा प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो च्या खात्यात आणखी एक पुरस्कार जमा झाला आहे. रोनाल्डोला ‘ग्लोब सॉकर सर्वोत्तम खेळाडू’च्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 

रोनाल्डोने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला. रोनाल्डोने 2011, 2014 आणि 2016 साली युरोपियन असोसिएशन फुटबॉल एजंट्स आणि युरोपियन क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा हा पुरस्कार जिंकला होता.

रोनाल्डोने या पुरस्कार सोहळ्यात दूर चित्र संवादामार्फत (व्हिडीओ कॉन्फरन्स) उपस्थिती लावली. त्याला इटलीचे अ‍ॅलेझांड्रो डेल पिएरो यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. 

तसेच यंदाच्या सर्वोत्तम क्लबचा पुरस्कार रिअल माद्रिदने, तर सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार झिनेदिन झिदान यांनी पटकावला आहे.



एव्हरेस्टवर एकट्या गिर्यारोहकाला बंदी
जगातील सर्वोच्च शिखरांच्या पंगतीत बसलेल्या माऊंट एव्हरेस्टवर पोहोचणे ग‌र्यिारोहकांसाठी स्वप्नच आहे. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हे ग‌र्यिारोहक अव‌रित सराव करतात. 

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ग‌र्यिारोहकांचे झालेले मृत्यू पाहता नेपाळमधून एकट्या ग‌र्यिारोहकाला एव्हरेस्टवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबरच अंध आण‌ि द‌व्यिांग ग‌र्यिारोहकांच्या एव्हरेस्ट चढाईला मनाई केली आहे. 

या बंदीबाबत अनेक ग‌र्यिारोहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या न‌यिमांवर गेल्या मह‌न्यिाभरापासून चर्चा सुरू असून या आठवड्यात हे न‌यिम लागू केले जाणार असल्याचे नेपाळने स्पष्ट केले आहे. 

2017 या वर्षात बहुतांश गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला. सुप्रसिद्ध गिर्यारोहक उली स्टेक हे देखील एव्हरेस्ट सर करण्याच्या तयारीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटना टाळण्यासाठीच सुरक्षेचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.



पाकिस्तानने निर्यात व वित्त पुरवठ्यासाठी चिनी चलन ‘युआन’ ला परवानगी दिली
पाकिस्तान सरकारने निर्यात व वित्त पुरवठ्यासाठी ‘युआन’ या चिनी चलनाला व्यवहारासाठी परवानगी दिली. त्यामुळे चीन आणि पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय व्यापार ‘युआन’ च्या स्वरुपात होणार.

देशात वर्तमानात आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी फक्त डॉलर चलनाचा वापर होत होता.