चालू घडामोडी ३ जानेवारी २०१८

अंदमानात 'मुंगी' कीटकाची नवी स्थानिक प्रजाती सापडली
संशोधकांना अंदमानाच्या जंगलांमध्ये 'मुंगी' या कीटक वर्गातल्या जीवांच्या रंगीबेरंगी आणि सुरेख अश्या दोन नवीन प्रजाती आढळून आल्या आहेत.


नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (बेंगळुरू) आणि जपानच्या ग्रॅज्युएट विद्यापीठाच्या संशोधकांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात 'टेट्रामोरियम' जातीमध्ये 'क्रिश्नानी' आणि 'जरावा' या दोन नव्या प्रजाती आढळून आल्या. 

भारतात पहिल्यांदाच प्रयोगशाळेत प्रजातींच्या सहज वर्गीकरणाची ओळख पटविण्यासाठी संरचनात्मक रचनांची पाहणी करण्यासाठी मुंगीच्या नमुन्यांचे त्रि-आयामी मॉडेल तयार करण्यासाठी 'एक्स-रे मायक्रो CT तंत्रज्ञान' याचा वापर करण्यात आला आहे. 

हे तंत्रज्ञान उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी या 3D प्रतिमांना प्रजातींच्या जनुकीय ओळखीसह वेगळे करते.अरुणाचल प्रदेश 'हागणदारी मुक्त' राज्य घोषित
अरुणाचल प्रदेशाकडून 'हागणदारी मुक्त (Open Defecation Free / खुल्यावर शौच मुक्त)' राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.

सिक्किमनंतर हागणदारी मुक्त होणारा ईशान्य भारतातला हा दूसरा राज्‍य आहे.नागालँडला ६ महिन्यांसाठी 'अशांत' घोषित 
संपूर्ण नागालँडला AFSPA अंतर्गत १ जानेवारीपासून ते जून २०१८ पर्यंत सहा महिन्यांसाठी 'अशांत क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आले आहे.

राज्य गृह आणि राजकीय विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, सशस्त्र दल (विशेषाधिकार) अधिनियम-१९५८ अंतर्गत देण्यात आलेल्या शक्तीनुसार, राज्याचा कारभार पूर्वपदावर येईपर्यंत हा निर्णय लागू राहणार.

सशस्त्र दल (विशेषाधिकार) अधिनियम-१९५८ (AFSPA) हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे, ज्यामधून 'अशांत क्षेत्र' घोषित केल्यास भारतीय सशस्त्र दलाला विशेष अधिकार प्रदान केले जातात. 

'अशांत क्षेत्र (विशेष न्यायालय) अधिनियम-१९७६' नुसार एखाद्या क्षेत्राला 'अशांत' घोषित केल्यास, त्या क्षेत्राला किमान तीन महिन्यांत परिस्थिती सांभाळता यायला हवी. 

हा कायदा लागू केल्यास, सशस्त्र दल कोणत्याही सूचनेशिवाय कोणालाही कधीही कैदेत टाकण्याचे अधिकार आणि कुठेही मोहीम चालविण्यास सक्षम असते. 

भारत छोडो आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी १५ ऑगस्ट १९४२ रोजी सशस्त्र दल विशेषाधिकार अध्यादेश लागू केला होता.
विदर्भने रणजी जिंकून इतिहास रचला
विदर्भ संघाने इंदौरमध्ये खेळल्या गेलेल्या 'रणजी करंडक' या प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

चंद्रकांत पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाचे हे आपल्या संपूर्ण कारकि‍र्दीतले पहिले रणजी विजेतेपद आहे. विदर्भाने अंतिम सामन्यात सात वेळा रणजी जिंकलेल्या दिल्लीवर ९ गडी राखून मात केली.

रणजी करंडक ही भारताची एक स्थानिक क्रिकेट स्पर्धा आहे. यामध्ये एक स्थानिक प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा क्षेत्रीय क्रिकेट संघांच्या प्रतिनिधित्व संघांच्या दरम्यान भारतात खेळली जाते. ही स्पर्धा प्रथम भारतीय क्रिकेटपटू रणजीतसिंह यांच्या नावावरून ओळखली जाते.सौदी अरब आणि UAE मध्ये प्रथमच वॅट लागू करण्यात आला
सौदी अरब आणि संयुक्त अरब अमीरात (UAE) या आखाती देशांमध्ये प्रथमच मूल्यवर्धित कर (VAT / वॅट) लागू करण्यात आला आहे.

देशाचा महसूल वाढविण्याच्या उद्देशाने बहुतेक वस्तूंवर आणि सेवांवर ५% कर आकारला आहे. खान-पान, वस्त्र, पेट्रोल, फोन, जल आणि वीज देयकांसोबतच हॉटेल बुकिंगवरही वॅट आकारला जात आहे. वैद्यकीय, वित्तीय आणि सार्वजनिक परिवहन सेवा मात्र करमुक्त आहेत.

मूल्यवर्धित कर (VAT) म्हणजे कोणतेही उत्पादन व सेवेच्या वर्धित मूल्यावर लावण्यात येणारा अप्रत्यक्ष कर आहे. VAT एक बहु-बिंदू गंतव्‍य आधारित कर आकारणी आहे, ज्यामध्ये उत्‍पादन/वितरण श्रृंखलेच्या व्यवहाराच्या प्रत्‍येक चरणात मूल्‍यवर्धनावर घेतला जाणारा कर आहे. 

'मूल्‍यवर्धन' म्हणजेच वस्तू व सेवांच्या उत्‍पादन आणि वितरण श्रृंखलेत त्यांच्या किंमतीमध्ये वृद्धी होय. हा वस्तू वा सेवांच्या अंतिम विक्रीवर लादला जाणारा कर आहे आणि हा शेवटी ग्राहकाकडून वसूल केला जातो.बल्गेरियाकडे युरोपिय संघाचे राष्ट्राध्यक्षपद
बल्गेरियाकडे युरोपिय संघाचे राष्ट्राध्यक्षपद आले आहे. ही निवड १ जानेवारी २०१८ पासून सहा महिन्यांसाठी झाली आहे.

युरोपिय संघ (EU) हा २८ सदस्य राज्यांचा राजकीय आणि आर्थिक संघ आहे, जो प्रामुख्याने युरोप खंडात आहेत. युरोपिय संघाची स्थापना १ नोव्हेंबर १९९३ रोजी झाली आणि याचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आहे. 

बल्गेरिया हा संघातला सर्वात गरीब सदस्य देश आहे.