भारताचे चांद्रयान-२ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या तयारीत
महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा अत्यल्प खर्चामध्ये आणि यशस्वीरीत्या पूर्ण करून नावलौकिक मिवणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) अजून एका महत्त्वाकांक्षी मोहितीमेची तयारी केली आहे. 


इस्रो आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ योजनेच्या अखेरच्या टप्प्यात आहे. २०१८ मध्ये हे चांद्रयान चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. 
तर चंद्राच्या दक्षिण गोलार्धावरील जागा या मिशनसाठी निवडण्यात आली आहे. 

तामिळनाडूतील महेंद्र गिरी येथील इस्रोच्या लिक्वीड प्रॉपल्शन सिस्टिम सेंटरवर सध्या या चांद्रमोहिम-२ च्या ‘टच डाऊन’ ची तयारी सुरू आहे. 

७० ते ८० मीटर उंचीवरून चंद्रावर उतरताना किती वेग असावा याचा प्रोटोटाइपवर सराव करण्यात येत आहे. 



उपराष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत प्रथम ‘आंतरराष्ट्रीय कला मेळावा’ चे उद्घाटन
ललित कला अकादमीच्या वतीने ४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत प्रथम ‘आंतरराष्ट्रीय कला मेळावा’ चे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्लीत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

मेळाव्यात विविध कला कार्यक्रमांचे आणि कार्यशाळेचे आयोजन केले जाणार, ज्यामध्ये दृश्यकला फिल्मोत्सव, पॉटरी/पटचित्र/पेपरमेशी कार्यशाळा, बेस्ट फ्रॉम वेस्ट कार्यशाळा, संगीत मैफिली, नृत्य-नाट्य, आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार.



श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार
२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत पार पडलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF-२०१८) मध्ये प्रसिद्द चित्रपट निर्माता श्याम बेनेगल यांना प्रतिष्ठित व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार हा वृत्तचित्र, लघुपट व चलचित्रपट निर्माणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तीला दिला जाणारा पुरस्कार आहे. स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि १० लक्ष रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट संघाकडून हा पुरस्कार दिला जातो.



मराठा लाइट इंफंट्रीला २५० वर्ष पूर्ण
भारतीय लष्कराच्या सर्वात जुन्या पलटणापैकी एक अशी ‘मराठा लाइट इंफंट्री’ ला ४ फेब्रुवारी २०१८ रोजी २५० वर्षे पूर्ण झालेली आहेत.

‘मराठा लाइट इंफंट्री’ पलटणचा वर्धापन दिवस ४ फेब्रुवारीला पाळला जातो. मराठा रेजिमेंटची पहिली तुकडी १७६८ साली ‘सेकंड बटालियन बॉम्बे सिपॉयज’ च्या रूपात तयार केली गेली होती, ज्याला नंतर ‘जंगी पलटण ३’ च्या नावाने ओळखले जात होते. 

याच्या यशवंत घाडगे आणि नामदेव जाधव या दोन सैनिकाला विक्टोरिया क्रॉस हा दुर्लभ सन्मान मिळाला आहे. ही १८४१ साली प्रथम अफगान युद्धादरम्यान ‘लाइट इंफंट्री’ चा किताब मिळवणारी लष्कराची पहिली सेना इंफंट्री पलटण आहे.


तामिळनाडू १९ पदकांसह खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेचा विजेता
खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या शेवटी पदकतालिकेत तामिळनाडू १९ पदकांसह प्रथम स्थानी होता. १९ पदकांमध्ये ५ स्वर्ण, ८ रौप्यपदकांचा समावेश आहे.

पदकतालिकेत तामिळनाडूनंतर केरळ (१७), हरियाणा (१२) आणि महाराष्ट्र (११) या राज्यांचा क्रमांक लागतो. या सर्वांना ५ सुवर्ण पदक प्राप्त झालेत. उत्तरप्रदेशाला १६ पदक मिळालीत, मात्र त्यामध्ये फक्त २ सुवर्ण पदक आहेत.

एप्रिल २०१६ मध्ये भारत सरकारने देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली होती. समाजाच्या अगदी तळ पातळीवर बदल करून राष्ट्रव्यापी क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१८ दरम्यान ‘खेलो इंडिया शालेय खेळ’ याच्या प्रथम संस्करणाचे आयोजन करण्यात आले. 

स्पर्धांमधून निवडण्यात येणार्‍या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत खेळाडूंना आठ वर्षापर्यंत दरवर्षी प्रत्येकी पाच लक्ष रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार, जी १००० उदयोन्मुख खेळाडूंसाठी निश्चित करण्यात आलेली आहे. 

वर्षागणीक खेळाडूंना ‘खेलो इंडिया’ अंतर्गत जोडण्यात येणार. क्रीडा स्पर्धा आणि शिक्षण अश्या दोन्ही प्रकारे खेळाडूंना सहभाग घेता येईल अश्या देशभरातल्या २० विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रीडा केंद्र म्हणून प्रोत्साहन देणार. 

मोठ्या राष्ट्रीय शारीरिक आरोग्यसंबंधी कार्यक्रमामधून १०-१८ वर्षे वयोगटातील २०० दशलक्ष लहान मुला-मुलींना या कार्यक्रमात समाविष्ट केले जाईल. शालेय खेळांमध्ये १६ क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे.



मुंबई विमानतळाने मोडला स्वत:चा विक्रम 
सर्वाधिक वर्दळ असलेला रनवे आहे मुंबई विमानतळाचा. तरीही २० जानेवारी रोजी २४ तासांत ९८० विमानांची ये-जा पूर्ण करून, या मुंबई विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. यापूर्वी ६ डिसेंबर रोजी याच विमानतळावर २४ तासांमध्ये ९७४ विमानांची ये-जा झाली होती.

तसेच लंडनमधील गॅटविक विमानतळाची दर तासाला ५५ एअर ट्रॅफिक कंट्रोल करण्याची क्षमता आहे, तर मुंबईची क्षमता ५२ आहे.