जागतिक चिमणी दिन २० मार्च 
दरवर्षी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिन’ म्हणून जगभर पाळला जातो. यावर्षी हा दिवस ‘आय लव्ह स्पॅरो’ या विषयाखाली साजरा होत आहे. यानिमित्त ‘राइज फॉर द स्पॅरो-एक्सपिरियंस द पॉवर ऑफ वन’ पुढाकाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. 


पहिला जागतिक चिमणी दिन २० मार्च २०१० रोजी पाळला गेला. वाढत्या प्रदुषणामुळेच चिमण्यांची संख्या कमी झाल्याचे आढळून आले आहे. याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. 

२०१५ साली दिल्ली महापालिकेने ‘चिमणी’ हा तेथील राज्य-पक्षी जाहीर केला.



प्रसिद्ध हिंदी कवी केदारनाथ सिंग यांचे निधन 
ज्येष्ठ हिंदी कवी केदारनाथ सिंग यांचे २० मार्च २०१८ रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.

केदारनाथ सिंग यांना २०१३ साली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘अभी बिलकूल अभी’, ‘जमीन पक रही है’ आणि ‘अकाल में सरस’, ‘टॉलस्टॉय और साइकिल’ या काव्यरचना प्रसिद्ध आहेत.



नवी दिल्लीत अनौपचारिक WTO मंत्रिस्तरीय बैठक संपन्न 
१९ मार्च आणि २० मार्च २०१८ या दोन दिवसात नवी दिल्लीत अनौपचारिक ‘जागतिक व्यापार संघटना (WTO) मंत्रिस्तरीय बैठक’ घेण्यात आली. इतर सदस्य देशांसोबत भागीदारी करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत ५० हून अधिक देशांमधील प्रतिनिधींचा सहभाग होता



पुरीमधील ‘नबाकलेबार महोत्सव’ याच्या स्मृतीत नाणी जाहीर 
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी १८ मार्च २०१८ रोजी ओडिशाच्या पुरीमध्ये शुभारंभ करण्यात आलेल्या ‘नबाकलेबार महोत्सव’ला चिन्हांकित करण्यासाठी रू.१००० आणि रू.१० मूल्यांची स्मारक नाणी जाहीर केलीत. या नाण्यांवर भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे प्रतीक चित्र आहेत.

ओडिशाच्या पुरीमध्ये तीर्थक्षेत्र जगन्नाथ मंदिराच्या परिसरात ‘नबाकलेबार महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय संस्कृत संस्थेने केले आहे.


‘वरुण-१८’ भारत-फ्रांस नौदलांचा द्विपक्षीय सराव 
भारत आणि फ्रांस यांचा ‘वरूण-१८’ नावाचा संयुक्त नौदल सराव १९ मार्चपासून अरबी समुद्रात गोव्याच्या किनार्‍याजवळ सुरू करण्यात आला आहे. ‘वरूण-१८’ सरावाचा अरबी समुद्रातला पहिला टप्पा २४ मार्च २०१८ रोजी पूर्ण होणार.

सरावाचा दुसरा टप्पा एप्रिल २०१८ मध्ये बंगालच्या उपसागरात चेन्नई सागरी किनार्‍याजवळ आणि तिसरा टप्पा मे २०१८ मध्ये दक्षिण-पश्चिम हिंद महासागरात रियूनियन बेटाजवळ आयोजित केला जाणार आहे.

सरावात पाणबुडी-रोधी, हवाई संरक्षण आणि वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास केला जात आहे. फ्रांसची पाणबुडी-रोधी ‘जीन डी विएने’ जहाज, भारताची ‘INS मुंबई’ आणि ‘INS त्रिखंड’ जहाजे सरावाचा भाग बनले आहेत.

भारताची पाणबुडी ‘INS कलवरी’, पी८-१ विमान आणि ‘डॉर्नियर’ गस्त विमान आणि मिग-२९ विमान यांचाही सहभाग आहे.

मे १९९३ पासून भारतीय नौदल आणि फ्रेंच नौदल द्विपक्षीय सागरी सराव आयोजित करत आहेत. २००१ साली या सरावाला ‘वरूण’ हे नाव देण्यात आले आणि आजपर्यंत सुमारे १५ आवृत्त्या यशस्वीरीत्या पार पाडल्या गेल्या आहेत. 

२०१७ साली युरोपीय जलक्षेत्रात प्रथमच तीन सागरी भागात ‘वरूण-१७’चे आयोजन करण्यात आले होते



भारताने म्यानमारकडे शेवटचे डिझेल रेल्वे लोकोमोटिव्ह इंजिन सुपूर्द केले 
शेजारी देशांना मदत करण्याच्या उद्देशाने भारत आणि म्यानमार संबंधातून, १९ मार्च २०१८ रोजी भारताने म्यानमारकडे शेवटचे डिझेल रेल्वे लोकोमोटिव्ह इंजिन सुपूर्द केले. 

भारतीय रेल्वेकडून 18 AC-DC 1350 HP डिझेल इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिन म्यानमार रेल्वेला औपचारिक रूपाने सोपवण्यात आले आहे. हे इंजिन मायक्रोप्रोसेसर नियंत्रित प्रणालीने सुसज्जीत आहेत. हे वाराणसीच्या डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स येथे तयार करण्यात आले आहेत.



पृथ्वी निरीक्षणासंबंधी माहिती सामायिक करण्यासाठी भारत, युरोपीय संघ यांच्यात करार 
आपापसात उपग्रहांकडून पृथ्वीच्या निरीक्षणासंबंधी माहिती सामायिक करण्यासाठी भारत आणि युरोपीय संघ (EU) यांच्यात करार झाला आहे.
‘कोपरनिकस कार्यक्रम’ हवामान बदल, भूमी, समुद्र आणि वातावरणाची निगरानी सोबतच नैसर्गिक आपत्तीचे अंदाज, व्यवस्थापन आणि उपशमन यासाठी व्यापक अनुप्रयोग प्रदान करतो.

 या व्यवस्थेअंतर्गत, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) माहिती सामायिक करणार. युरोपीय आयोग भारताला उच्च बँडविड्थ कनेक्शनच्या सहाय्याने उपग्रहांच्या कोपरनिकस सेन्टिनेल कुटुंबापासून प्राप्त महितीला पुर्णपणे मुक्त, समग्र आणि खुला प्रवेश देणार.