लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय 

कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.

लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची केंद्र सरकारकडे लिखित मागणी करण्यात येईल असा निर्णय १९ मार्च रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

नागामोहन दास समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाआधी मंत्रिमंडळात सविस्तर आणि प्रदीर्घ चर्चा झाली. कर्नाटक अल्पसंख्याक कायद्याच्या कलम २ (डी) अंतर्गत लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मान्यता देण्याचा विचार व्हावा असे नागामोहन दास समितीने म्हटले होते. 

स्वतंत्र धर्म आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याची लिंगायत समाजाची मागणी बऱ्याच काळापासून प्रलंबित होती.

तसेच कर्नाटकात लिंगायत समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के आहे. लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा मिळाला तर कलम २५, २८, २९ आणि ३० अंतर्गत फायदे मिळतीलभारतात तयार होणार एफ-१६ फायटर विमाने 
भारतात ज्या एफ-१६ फायटर विमानांची निर्मिती होईल त्यामध्ये काही खास वैशिष्ट्य असतील असे अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने म्हटले आहे.

अमेरिकन संरक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या लॉकहीड मार्टिनने भारतात एफ-१६ फायटर विमानांच्या निर्मितीचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे भारताच्या हवाई सुरक्षेच्या गरजा पूर्ण होणार असून मेक इन इंडियाचे धोरणही प्रत्यक्षात येईल.

मेक इन इंडियामुळे संरक्षण क्षेत्राचे दरवाजे भारतीय खासगी कंपन्यांसाठी खुले झाले आहेत. हवाई दलाला अधिक मजबूत, सक्षम करण्यासाठी आपल्या ताफ्यात नव्या लढाऊ विमानांचा समावेश करण्याची भारताची योजना आहे. अब्जावधी डॉलर्सचे हे कंत्राट मिळवण्यासाठी लॉकहीड मार्टिन कॉर्प, साब एबी ग्रिपेन आणि बोईंग या कंपन्यांमध्ये अटीतटीची स्पर्धा आहे.

एफ-१६ विमान निर्मितीचा संपूर्ण प्रकल्प भारतात आणण्याची लॉकहीड मार्टिनची तयारी आहे. भारतात विमानांची निर्मिती करताना त्यात काही खास गोष्टी असतील. ज्या यापूर्वी कुठल्याही फायटर विमान निर्मिती कंपनीने दिलेल्या नाहीत असे लॉकहीड मार्टिनचे उपाध्यक्ष विवेक लाल यांनी सांगितले.भारतीय क्रिकेट संघाने ‘निडाहास करंडक २०१८’ जिंकला 
भारतीय क्रिकेट संघाने कोलंबो (श्रीलंका) येथे त्रिकोणीय टी-20 शृंखलेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशला हरवून ‘निडाहास करंडक २०१८’ जिंकला.

दिनेश कार्तिक (भारत) याला अंतिम सामन्याचा सामनावीर घोषित करण्यात आले. शिवाय स्पर्धेदरम्यान, रोहित शर्मा (भारत) टी-२० मध्ये ७००० धावा करणारा दहावा फलंदाज ठरला.


विदर्भ क्रिकेट संघाने आपला पहिला ‘इराणी करंडक २०१८’ जिंकला 
पहिल्यांदाच रणजी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भ संघाने नागपुर (महाराष्ट्र) येथे खेळला गेलेला ‘इराणी करंडक २०१८’ देखील जिंकला. हा त्याचा पहिलाच इराणी करंडक आहे.

विदर्भाच्या वासिम जाफरला २८६ धावांच्या विक्रमी खेळीसह सामनावीर घोषित करण्यात आले.

इराणी करंडक या स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदा सन १९५९-६० च्या हंगामात आयोजन करण्यात आले होते. १९२८ ते १९७० या काळात आपल्या मृत्यूपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) स्थापनेपासून जुळून राहिलेल्या झेड. आर. इराणी या माजी क्रिकेटपटूच्या स्मृतीत ही स्पर्धा खेळली जाते. 

ही स्पर्धा प्रत्येक वर्षीच्या रणजी करंडक विजेता संघ व शेष भारतातील संघातील निवडलेल्या खेळाडूंच्या संघात खेळली जाते.व्लादिमिर पुतीन चौथ्यांदा रशियाचे राष्ट्रपती होणार 
रशियाचे पुढील राष्ट्रपती म्हणून व्लादिमिर पुतीन चौथ्यांदा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांचा पुढील कार्यकाळ सन २०२४ पर्यंत असणार.

रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची आतापर्यंत राष्‍ट्रपती निवडणुकीत मतांची ७०% गणना पूर्ण झाली, त्यात पुतीनला ७५.९% मते मिळालीत.
व्लादिमिर पुतीन प्रथम २००० मध्ये रशियाचे राष्‍ट्रपती बनले. त्यानंतर चार-चार वर्षांचे दोन कार्यकाळ मे २००८ मध्ये समाप्‍त झालेत. 

८ मे २००८ रोजी ते रशियाचे पंतप्रधान बनले. त्यानंतर २०१२ मध्ये ते देशाचे राष्‍ट्रपती बनले. पूर्वी रशियाच्या राष्‍ट्रपती पदाचा कार्यकाळ चार वर्षांचा होता आणि आता २०१२ साली हा कार्यकाळ सहा वर्षांचा करण्यात आला आहे.

रशिया हा पूर्व यूरोप आणि उत्तर एशिया प्रदेशात स्थित एक विशाल आकार असलेला देश आहे. हा एकूण १७०७५४०० चौ. किमी. क्षेत्रफळ असलेला जगातला सर्वात मोठा देश आहे. आकाराच्या दृष्टीने हा भारताच्या पाच पट आहे. या देशाची राजधानी मॉस्को शहर असून देशाचे चलन रशियन रूबल हे आहे. देशाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे आहेत.‘गल्फ स्टार १’ – भारत आणि UAE यांचा पहिला नौदल युद्धाभ्यास 
संयुक्त अरब अमीरतीची राजधानी अबु धाबीजवळ समुद्रात भारतीय नौदल आणि संयुक्त अरब अमीरती (UAE) चे नौदल यांचा पहिलाच द्विपक्षीय ‘गल्फ स्टार १’ युद्धाभ्यास सुरू करण्यात आला आहे.

हा सराव १७ मार्च ते २२ मार्च २०१८ या काळात चालणार आहे. सरावात भारताच्या INS गोमती (मार्गदर्शित क्षेपणास्त्र सुसज्जित लढाऊ जहाज) आणि INS कोलकाता (मार्गदर्शित क्षेपणास्त्र सुसज्जित विध्वंसक) या जहाजांचा सहभाग आहे. 

ही दोन्ही जहाजे माझगाव डॉक लिमिटेड येथे बांधण्यात आली आहेत आणि अत्याधुनिक देशी युद्धनौका बांधण्यासाठी भारताच्या क्षमतांचे प्रतिनिधी आहे