रत्नागिरी येथे तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी भारतीय संघटनेचा सौदी आर्माकोसोबत सामंजस्य करार  
महाराष्ट्रातल्या रत्नागिरी येथे तेलशुद्धीकरण व पेट्रो केमिकल्स कंपनी उभारण्यासाठी भारतीय सार्वजनिक तेल कंपन्यांची संघटना आणि सौदी आर्माको यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. 


IOCL, HPCL आणि BPCL या तीन सार्वजनिक तेल कंपन्यांच्या संघटनेनी भारतातर्फे हा करार केला आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा, स्रोत, तंत्रज्ञान, अनुभव आणि तज्ज्ञ या सर्वांची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. 

या कंपनीत सौदी आर्माको गुंतवणूक भागीदारही राहणार आहे. दरवर्षी या तेलशुद्धीकरण प्रकल्पातून 18 दशलक्ष टन पेट्रोकेमिकल उत्पादनांवर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. या प्रकल्पासाठी एकूण 3 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 



ऋषद प्रेमजी NASSCOM चे नवे अध्यक्ष (प्रेसिडेंट) 

ऋषद प्रेमजी (विप्रोचे मुख्य धोरण अधिकारी) यांची राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (NASSCOM) ने 2018-19 सालासाठी अध्यक्ष (चेअरमन) म्हणून नियुक्ती केली आहे. 

राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (National Association of Software and Services Companies -NASSCOM) हे भारतीय माहिती तंत्रज्ञान (IT) आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) उद्योगाची व्यापार संघटना आहे. 

याची सन 1988 मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. NASSCOM ही एक जागतिक व्यापार संघटना आहे, ज्याचे जगभरात 2000 हून अधिक सदस्य आहेत. 



65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली 

भारत सरकारकडून दिल्या जाणार्‍या यंदाच्या 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. 3 मे 2018 रोजी हे सर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील.

मराठी चित्रपटसृष्टीत निर्मित

सर्वोत्कृष्ट चित्रपट –व्हिलेज रॉकस्टार्स
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – म्होरक्या
स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) – म्होरक्या – यशराज कऱ्हाडे
सर्वोत्कृष्ट संकलन – मृत्युभोग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (लघुपट) – नागराज मंजुळे (पावसाचा निबंध)
सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फीचर) – मयत (सुयश शिंदे)
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट – चंदेरीनामा (राजेंद्र जंगले)
नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) – धप्पा (निपुण धर्माधिकारी)

सर्वोत्कृष्ट चित्रपट (भाषेनिहाय)

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन (निर्माता अमित मसुरकर)
सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट- गाझी
सर्वोत्कृष्ट लद्दाखी चित्रपट- वॉकिंग विद द विंड
सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट- टू लेट
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट- मयूरक्षी
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट- हेब्बत रामाक्का
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- थोंडीमुथलम दृक्शियम
सर्वोत्कृष्ट ओरिया चित्रपट- हॅलो आर्सी
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट- दह..
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट- इशू

अन्य पुरस्कार

दादासाहेब फाळके पुरस्कार – विनोद खन्ना (मरणोत्तर)
सर्वोत्कृष्ठ अभिनेता – अक्षय कुमार (रूस्तम चित्रपटासाठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – श्रीदेवी (मॉम)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – दिव्या दत्ता (इरादा)
सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं – अब्बास अली मोगल (बाहुबली 2)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – बाहुबली 2
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – गणेश आचार्य (गोरी तू लठ मार – टॉयलेट एक प्रेम कथा)
स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) – अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- ए.आर. रहमान (मॉम)
‘न्यूटन’ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांना राष्ट्रीय पुरस्कार
सर्वोत्कृष्ठ अॅनिमेशन चित्रपट – फिश करी
सर्वोत्कृष्ठ चित्रपट (नॉन फिचर) – वॉटर बेबी

दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट उद्योगामध्ये भारताचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाढ आणि विकासामधील उल्लेखनीय योगदानाकरिता भारत सरकारद्वाकडून दिला जातो. पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ स्मृतीचिन्ह, 10 लाख रुपये रोख आणि एक शाल यांचा समावेश आहे. हा पुरस्कार प्रथम 1969 मध्ये सादर करण्यात आला.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतीय चित्रपट सृष्टीत भारत सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित असा प्रमुख पुरस्कार आहे. हे पुरस्कार १९५४ सालापासून दिले जात आहेत. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटाना देण्यासोबतच बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.


थाळीफेकमध्ये सीमाला रौप्य आणि नवजीतला कांस्यपदक 
थाळीफेक प्रकारातील दोन पदकांसह भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील अ‍ॅथलेटिक्सच्या पदकांचे खाते उघडले आहे.
सीमा पुनिया आणि नवजीत कौर ढिल्लन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले आहेत.

सीमाने कारकीर्दीतील सलग चौथ्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची किमया साधताना पहिल्याच प्रयत्नात 61.41 मीटर ही कामगिरी नोंदवली, तर नवजीतने अखेरच्या प्रयत्नात 57.43 मीटर अंतरावर थाळी फेकली.

माजी विश्वविजेत्या डॅनी स्टीव्हन्सने (ऑस्ट्रेलिया) 68.26 मी. थाळीफेक करीत स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक पटकावले आहे.

34 वर्षीय सीमाने राष्ट्रकुलमध्ये प्रत्येक प्रयत्नात यश मिळवले आहे. 
2006 मध्ये मेलबर्नला तिने रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर 2010 मध्ये रौप्य आणि 2014 मध्ये कांस्यपदकपटकावले होते.



तेजस्विनी सावंतची सुवर्णपदकाची कमाई 

नेमबाज तेजस्विनी सावंतनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

तेजस्विनीनं तिच्या अनुभवाच्या जोरावर 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स प्रकारात अव्वल स्थान पटकावलं आहे.

तेजस्विनीनं 50 मीटर रायफल प्रकारात 618.9 गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावलं होतं.

तसेच स्कॉटलंडची सेओनेड मकिनटोश तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. तिला 444.6 गुणांची कमाई करताआली



11 वी जागतिक हिंदी परिषद मॉरिशसमध्ये भरणार  

मॉरिशसच्या शिक्षण मंत्र्‍यांच्या हस्ते 11 एप्रिलला जागतिक हिंदी परिषदेच्या 11 व्या संस्करणाच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले आहे. 

मॉरिशसच्या पोर्ट लुईमध्ये स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे 11 वी जागतिक हिंदी परिषद 18-20 ऑगस्ट 2018 या काळात आयोजित केली जाणार आहे. 

जागतिक हिंदी परिषद पहिल्यांदा 1975 साली नागपुरमध्ये आयोजित केली गेली होती आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन केले होते.