चालू घडामोडी २६ जानेवारी २०१९

राष्ट्रीय मतदार दिन: 25 जानेवारी
निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवा यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारीला देशभरात राष्ट्रीय मतदार दिन पाळला जातो. यावर्षी भारत नववा मतदार दिन पाळत आहे. यावर्षी या दिनाची ‘नो व्होटर टू बी लेफ्ट बिहाइंड’ ही संकल्पना आहे.

यानिमित्ताने, दिनांक 24 जानेवारी 2019 रोजी नवी दिल्लीत ‘निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक आणि सुलभ’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद भरविण्यात आली. मुख्‍य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन झाले. 

या परिषदेत बांग्लादेश, भुटान, कझाकस्तान, मालदीव, रशिया आणि श्रीलंका या देशातले मुख्य निवडणूक आयुक्त तसेच अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झालेत.

दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त 2011 सालापासून दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन पाळला जातो. 

या दिवशी निवडणुकीत वापरलेल्या उत्कृष्ट सरावांसाठी अधिकार्‍यांना राष्ट्रीय पुरस्काराने पुरस्कृत केले जाते. नवी दिल्लीत निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात.विमानांसाठी स्वदेशी तयार केलेल्या जैव-इंधनाला मान्यता मिळाली
प्रदूषण टाळण्याकरिता विमानांमध्ये इंधन म्हणून वापरले जाऊ शकणारे पर्यायी इंधन म्हणून, भारतीय संशोधकांनी देशातच तयार केलेल्या जैव-इंधनाला वापरण्यास सेंटर फॉर मिलिटरी एयरवर्दीनेस अँड सर्टिफिकेशन (CEMILAC) कडून मान्यता देण्यात आली आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणिकरणाद्वारे शिफारस केलेल्या प्रक्रियेनुसार अनेक चाचण्या घेतल्यानंतर हे नवे जैव-इंधन अपारंपारिक स्त्रोतापासून म्हणजेच भाज्या/झाडापासून तयार केलेल्या अखाद्य तेलापासून तयार केलेले विमानात इंधन म्हणून वापरण्यास उपयुक्त म्हणून औपचारिकपणे मंजूरी देण्यात आली आहे.

जेट्रोफा झाडाच्या बियांपासून हे बायो-जेट फ्युएल तयार करण्यात आले आहे. त्यावर देहरादून येथील CSIR-IIPच्या प्रयोगशाळेत प्रक्रिया करण्यात आली. या इंधनामुळे प्रदूषणामध्ये कमतरता येण्यास मदत होईल.
भारत-इस्राएल यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या LRSAM क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
24 जानेवारी 2019 रोजी ओडिशापासून जवळच ‘INS चेन्नई’ या भारतीय नौदलाच्या जहाजावरून ‘बराक 8’ नावाच्या दूरपर्यंत मारा करणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्राची (LRSAM) यशस्वीपणे चाचणी पार पाडण्यात आली आहे.

‘बराक-8’ क्षेपणास्त्र हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (LR-SAM / MR-SAM) प्रणाली आहे. याद्वारे जास्तीत जास्त 70 कि.मी. दुरवरचे हवेतले लक्ष्य भेदले जाऊ शकते. 

ही संरक्षण प्रणाली इस्राएल एरोस्पेस इंडस्ट्रीज (IAI) आणि भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांनी संयुक्तपणे विकसित केलेली आहे. हे क्षेपणास्त्र अगदी कमी उंचीवर उडणारे लक्ष्य भेदण्यास सक्षम आहे. सध्या ही प्रणाली इस्राएलचे नौदल तसेच भारतीय नौदल आणि हवाईदलाकडून वापरली जात आहे.जगभरात 2018 साली नैसर्गिक संकटांमुळे सुमारे 61.7 दशलक्ष लोक प्रभावित झाले: UN
आपत्ती जोखीम कमतरता यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय (UNISDR) कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, जगभरात 2018 साली नैसर्गिक संकटांमुळे सुमारे 61.7 दशलक्ष लोक प्रभावित झाले. तर भूकंप आणि त्सुनामी अश्या घटनांमुळे 10,373 लोकांनी जीव गमावला.

UNISDRच्या सेंटर फॉर रिसर्च ऑन द एपिडेमियोलॉजी ऑफ डिझास्टर्स (CRED) ने 2018 साली जगभरात तीव्र हवामान-विषयक 281 नैसर्गिक घटना नोंदविल्या. गेल्या वर्षी अश्या घटना जगभरात दिसून आल्या. पूर, दुष्काळ, वादळ आणि वणवा अश्या घटनांनी जवळपास 57.3 दशलक्ष लोकांना प्रभावित केले.

नैसर्गिक संकटांनी सर्वाधिक प्रभावित झालेल्या देश म्हणजे भारत होता, जिथे 23.9 दशलक्ष लोकांना प्रभावित केले होते. त्यानंतर फिलिपिन्सचा (6.5 दशलक्ष) आणि चीनचा (6.4 दशलक्ष) क्रमांक लागतो

सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये इंडोनेशिया (4,535), भारत (1,388), ग्वाटेमाला (427), जपान (419) आणि चीन (341) यांचा अग्रक्रम लागतो आहे

2000 आणि 2017 या दरम्यानच्या कालावधीत 77,144 मृत्यू झालेत, तर 2018 साली 10,373 लोकांचा मृत्यू झाला.

डिसेंबर 1999 मध्ये आपत्ती जोखीम कमतरता यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय (United Nations Office for Disaster Risk Reduction -UNISDR) तयार करण्यात आले होते. 

नैसर्गिक संकटांमध्ये कमतरता आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय धोरणांची अंमलबजावणी केले जात असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) शहरात आहे.