राष्ट्रीय संस्कृत संस्था ५ दत्तक गावांना संस्कृत शिकविणार

 

  • राष्ट्रीय संस्कृत संस्था (RKS), लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (दिल्ली), राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (तिरुपती) या तीन केंद्रीय संस्था देशात संस्कृत प्रचाराचे काम पाहतात.
  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या संस्थांना संस्कृत शिकविण्यासाठी प्रत्येकी दोन गावे दत्तक घेण्याचे निर्देश दिले होते.
  • राष्ट्रीय संस्कृत संस्थेने जुबार्ता (त्रिपुरा), मासोत (हिमाचल प्रदेश), चिट्टेबळी (कर्नाटक), अदात (केरळ) आणि बराइ (मध्य प्रदेश) ही पाच गावे दत्तक घेतली आहेत.

फिफा महिला फुटबॉल विश्वचषक

  • विजेता – अमेरिका
  • उपविजेता – नेदरलँड
  • अमेरिकेच्या मेगन रॅपिनोने सर्वोत्कृष्ट खेळाडू, गोल्डन बॉल व गोल्डन बूट पुरस्कार जिंकले
  • नेदरलँडच्या सारी वान विणेंडलने सर्वोत्कृष्ट गोलरक्षक व गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार जिंकले
  • फिफाबद्दल माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रोहित शर्माचा एका विश्वचषकात पाच शतके झळकाविण्याचा विश्वविक्रम

एस.जयशंकर ८ जुलै २०१९ रोजी राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी

  • जयशंकर १९७७ सालच्या भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी
  • २०१५ ते २०१८ या काळात भारताचे परराष्ट्र सचिव
  • ३० मे २०१९ रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेत उत्तराखंड सर्वोत्तम

तेजस रेल्वे भारतातील पहिली खाजगी रेल्वे ठरणार

  • ही रेल्वे दिल्ली-लखनौ मार्गावर धावणार

राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) प्रमुख

  • National Cricket Academy (NCA) बंगळुरू येथे आहे. २००० साली याची स्थापना करण्यात आली. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राज सिंग डुंगरपूर यांच्या संकल्पनेतून NCA चा जन्म झाला.
  • १९ वर्षाखालील गुणवान खेळाडूंना निवडून त्यांना तयार करण्याचे काम द्रवीड करणार आहे.

UNCCD परिषदेचे COP-14 सत्र प्रथमच भारतात

  • UNCCD – संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंधक परिषद
  • COP-14 सत्र : ग्रेटर नोएडा (२ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर २०१९)
  • आयोजक : पर्यावरण, वन व हवामान मंत्रालय
  • सहभाग : १९५ देशांमधील ५००० प्रतिनिधी
  • चर्चा : वाळवंटीकरण, दुष्काळ, जमीन नापीक होणे
  • UNCCD बद्दल माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) पुरस्कार २०१८-१९

  • सत्कृष्ट पुरुष खेळाडूर्वो : सुनील छेत्री (६ व्यांदा पुरस्कार) [भारतीय संघ व बंगळूर संघाचा कर्णधार]
  • सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू : आशालता देवी [केरळ ब्लास्टर्स]
  • उदयोन्मुख महिला खेळाडू : डांगमई ग्रेस (मणिपूर)
  • उदयोन्मुख पुरुष खेळाडू : सहल अब्दुल समद (केरळ)

     

व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यविषयक अटी विधेयक-२०१९ मंजूर

  • १० जुलै २०१९ रोजी मंजुरी
  • १३ केंद्रीय कामगार (श्रम) कायद्यांच्या संबंधित तरतुदींचे एकत्रीकरण करून नवीन नियमावली तयार करण्यात आली

जागतिक लोकसंख्या दिन – ११ जुलै

  • UN द्वारे साजरा
  • या दिनानिमित्ताने महिलांसाठी मेडरॉक्झीप्रोगेस्टेरॉन एसीटेट (MPA) नावाची नवीन गर्भनिरोधक पद्धत म्हणजे इंट्रामस्क्युलय इंजेक्शनद्वारे गर्भनिरोधकांची रिव्हर्सिबल मेथड उपयोगात आणणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले.
  • जागतिक लोकसंख्या दिनाविषयी वाचण्यासाठी क्लिक करा

EXIM बँकेचा पापुआ न्यू गिनी व सेनेगलसोबत करार

  • देशातील पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा विषयक प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी कर्ज स्वरूपात एकूण १२४ दशलक्ष डॉलर (८५० कोटी रुपये) एवढा निधी देण्याच्या हेतूने आयात निर्यात बँकेचा पापुआ न्यू गिनी व सेनेगल देशासोबत करार झाला.

जीत थाइल यांची बुकर पारितोषिक निर्णय समितीमध्ये निवड

जेरेमी लालरुनूंगाचा २०१९ राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेत विश्वविक्रम

  • सामोआ देशात स्पर्धा सुरु
  • १६ वर्षीय जेरेमीने ६७ किलो वजन गटात स्नॅचमध्ये १३६ किलो वजन उचलण्याचा पराक्रम केला
  • त्याने युवा विश्वविक्रम, आशियाई विश्वविक्रम, राष्ट्रकुल विश्वविक्रम असे तीन विश्वविक्रम मोडले.
  • स्पर्धेचे आयोजन राष्ट्रकुल भारोत्तोलन महासंघ (CWF) करतो
  • CWF ची स्थापना १९४७ साली करण्यात आली
  • राष्ट्रकुलसंदर्भात माहिती वाचण्यासाठी क्लिक करा

अंशुला कांत जागतिक बँकेच्या MD व CFO पदी

विम्बल्डन स्पर्धा २०१९