* राज्य सरकारने पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ५ वर्षावरून ६ वर्ष निश्चित केली आहे. 
* पालघर हि महाराष्ट्रातील ३४ वि जिल्हा परिषद असून तिची सदस्य संख्या ५७ आहे. तर ८ तालुक्यात पंचायत समितीच्या ११४ जागा आहेत. 
* ९५ व्या बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षा फय्याज खान, स्वागत अध्यक्ष डॉ. अशोक साठे तर उद्घाटक शरद पवार आहेत. 
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आहेत. 
* देशातील वाघांची संख्या २२२६ आहे. २०१० च्या तुलनेत ३०% वाढ झाली आहे. २०१० मध्ये वाघांची संख्या १७०६ होती. 
* जगभरातील वाघापैकी ७०% वाघ भारतात आहेत.
* देशात ४७ व्याघ्र प्रकल्प आहेत. देशातील १८ राज्यातील सुमारे ३,७८,११८ चौ.किमी. क्षेत्रफळावर वाघांची गणना केली आहे. 
* महाराष्ट्रात वाघांची संख्या १६९ वरून १९० इतकी झाली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात १०५ वाघ, मेळघाट प्रकल्पात ३९ वाघ, पेंच प्रकल्पात २३ तर सह्याद्री प्रकल्पात २३ वाघ आहेत. 
* देशातील ४७ व्याघ्र प्रकल्पापैकी १७ व्याघ्र प्रकल्पांना सर्वोत्कृष्ट हा दर्जा देण्यात आला आहे. त्यापैकी मेळघाट, पेंच व ताडोबा हे आहेत. 
* कर्नाटकात सर्वात जास्त ४०६ वाघ, त्यानंतर उत्तराखंड मध्ये ३४६ व मध्य प्रदेश मध्ये ३०८ वाघ आहेत. 
 * महाराष्ट्र दारूबंदी करणारा चंद्रपूर हा वर्धा व गडचिरोली नंतर तिसरा जिल्हा ठरला आहे. गडचिरोली जिल्ह्यात १९९३ मध्ये पहिल्यांदा दारूबंदी चा निर्णय घेण्यात आला. 
* इन्सटंट रिप्ले तंत्राचा शोध लावणारे टोनी वेर्णा यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी १८ जानेवारी २०१५ या दिवशी निधन झाले. 
* हरियानात पानिपत येथे ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या योजनेला २२ जानेवारी २०१५ या रोजी सुरुवात झाली. हि योजना प्राथमिक तत्वावर देशातील १०० जिल्ह्यात लागू होणार आहे. या योजनेंतर्गत २६ जानेवारी २०१५ पासून गावात ग्रामसभा बंधनकारक करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत गावात स्त्री भ्रूण हत्या उघडकीस आल्यास सरपंचावर कारवाई करण्यात येणार आहे. 
* सध्या महाराष्ट्रात ग्रामसभेच्या ४ बैठका घेणे बंधनकारक आहे.
* यावेळी ‘सुकन्या समृद्धी योजने’चे हि औपचारिक उद्घाटन करण्यात आले. १० वर्ष खालील मुलीसाठी अधिक व्याजदर असणाऱ्या तसेच आयकरात सवलत असणाऱ्या बैंक खात्या संदर्भातील हि योजना आहे. 
*देशातील पहिले ‘आयुर्वेदिक हेरीटेज पार्क’कोल्हापूर जिल्ह्यातील कान्हेरी येथे स्थापन करण्यात येणार आहे. 
* भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून अमेरिकेतील भारताचे राजदूत एस. जयशंकर यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर सुजाता सिंह होत्या. 
* सौदी अरेबिया चे राजे अब्दुल्ला बिन अब्दुल अझीझ अल सौद यांचे २२ जानेवारी १९९० रोजी रियाध या ठिकाणी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. 
* त्यांचे सावत्र बंधू सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद हे वयाच्या ७९ व्या वर्षी नवीन राजे झाले आहेत. 
* भारतातील लखनौ शहर हे पहिले सीसीटीव्ही शहर म्हणून ओळखले जाणार आहे. 
* महाराष्ट्रासह सहा राज्यातून १४८३ किमी लांबीचा मुंबई-दिल्ली कोरीडॉर बनवण्यात येणार आहे. महाराष्ट्र, गुजरात,राजस्थान,हरयाणा,उत्तर प्रदेश, दिल्ली या सहा राज्यातून का कोरीडॉर जाणार आहे.  तर महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद या ११ जिल्ह्यातून हा कोरीडॉर जाणार आहे