०१. अचलकुमार ज्योती यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती. 

०२. संसदेच्या लोकलेखा समिती अर्थात पि.एस.सि. च्या अध्यक्षपदी कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते के.व्हि.थोमस यांची फेरनियुक्ती करण्यात आली. कार्यकाल एप्रिल २०१६ पर्यंत असणार आहे. १९६७ पासून या समितीच्या अध्यक्षपदी मुख्य विरोधी पक्षातील सर्वात ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती केली जाते. महालेखापाल अर्थात कॅगचा अहवाल संसदेत सादर झाल्यानंतर लोकलेखा समिती त्या अहवालांची चौकशी करते.या समितीचे दरवर्षी गठन केले जाते. लोकलेखा समितीत अधिकाधिक २२ सदस्य असतात. यामध्ये १५ लोकसभेचे आणि ७ हून अधिक राज्यसभेचे असू शकत नाहीत. समितीच्या सदस्यपदी लोकसभेच्या सदस्यांची निवड होते, तर राज्यसभेचे प्रतिनिधी नियुक्त केले जातात.


०३. ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले. शिवभूषण, दुर्गकथा, गजकथा, हसरा इतिहास हि त्यांची प्रसिद्ध पुस्तके. 


०४. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन. १९९५ मध्ये ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली होती. त्याचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.


०५. राष्‍ट्रीय भारतीय परिवर्तन आयोग अर्थात् नॅशनल इन्स्टिटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया – संक्षेपात नीति या संस्थेच्या नव्या संकेत स्थळाचे उद्‌घाटन आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांच्या हस्ते झाले.


०६.  http://www.niti.gov.in या वेवसाईटवर या आयोगाची रचना, कर्तेव्य आणि अलीकडच्या काळात आयोगाने केलेले कार्य यांचा समावेश आहे.


०७. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची स्थापना होऊन फक्त 3 महिने झाले आहेत. मात्र या अल्पकाळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन पायाभूत सुविधांचा आढावा घेणे, व राज्य, केंद्र, टिम इंडिया यांच्यात प्रगती  व समृध्दिच्या कामासाठी सहकार्य करणे, केंद्र सरकारच्या नव्या योजना म्हणजे  अटल इनोव्हेशन मिशन स्वयं रोजगार व बुध्दिमत्तेचा वापर आदिंच्या बाबत आयोगाने काम सुरु केले.


०८. नीति आयोगावर एक इ-पुस्तिका तयार करण्यात आली असून ती http://pib.nic.in/newsite/pdfdisplay.aspx?docid=04 या वेवसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे.


०९. दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने बलात्कार आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपा प्रकरणी दोषी ठरलेला टेनिस दुहेरीमधील माजी ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन बॉब हेविटला सहावर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


१०. मूळचा ऑस्ट्रेलियन असलेला हेविट सध्या ७५ वर्षांचा आहे. १९८० ते ९० च्या दशकात दक्षिण आफ्रिकेत लहान मुलांना टेनिसचे प्रशिक्षण देत असताना हेविटवर तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोप झाला होता. 


११. शिक्षा सुनावण्यापूर्वी हेविटने आपली ढासळती प्रकृती विचारात घ्यावी तसेच तुरुंगात हल्ला होईल अशी आपल्याला धमकी मिळाली आहे असे त्याने न्यायालयाला सांगितल्याचे टॉक रेडिओ ७०२ ने वृत्त दिले आहे. २०११ मध्ये आपल्याला ह्दयविकाराचा झटका येऊन गेल्याचेही त्याने न्यायालयाला सांगितले.


१२. गुगलने भारतातील मध्यमवर्गीय ग्राहकांचा विचार करुन अवघ्या १२,९९९ रुपयात क्रोमबुक लॅपटॉप लाँच केला आहे. गुगलने लाँच केलेले दोन्ही लॅपटॉप गुगलच्या क्रोम लेटेस्ट व्हर्जन ऑपरेटिंग प्रणालीचे आहेत. 


१३. केवळ १३ हजार रुपयात नवा लॅपटॉप उपलब्ध झाल्याने ग्राहकांकडून यास चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा गुगलने व्यक्त केली आहे.‘द कम्यूटर फॉर एव्हरी वन’ या टॅग लाईनसह गूगलने या लॅपटॉपला भारतीय बाजारात आणले आहे.


१४. बांगलादेशच्या पुरातत्त्व विभागाने ईशान्येकडील एका गावात केलेल्या खोदकामात अतिशय प्राचीन हिंदू मंदिर आढळले आहे. पाला राजघराण्याच्या काळात हे मंदिर बांधण्यात आले असावे, असा अंदाज आहे.


१५. ज्या गावात हे मंदिर सापडले, त्या गावाचे नाव मेहरपूर असे आहे. हे मंदिर कदाचित आठव्या किंवा नवव्या शतकातील असण्याची शक्यता आहे. 


१६. या गावातील शेतकरी त्यांच्या शेतात खोदकाम करीत असताना, अतिशय जुन्या काळातील विटा आढळून आल्या. शिवाय, काही कलाकृतीही जमिनीतून बाहेर आल्या, असे वृत्त सेन यांच्या हवाल्याने स्थानिक वृत्तपत्रांनी दिले आहे.


१७. या मंदिराच्या सभोवताल भिंतही असून, ती अनेक ठिकाणी जळालेली आहे. या परिसरात काही प्राचीन मूर्तीही सापडल्या आहेत. या मंदिराला पायर्‍या असून, आम्ही आणखी खोदकाम करून मंदिर नेमके किती मोठे आहे आणि गाभार्‍यात कोणाची मूर्ती आहे, याचा शोध घेणार आहोत, असे पुरातत्त्व विभागाचे अन्य एक सदस्य सोहाग अली यांनी सांगितले. 


१८. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी, येथून जवळच असलेल्या एका गावात सुमारे आठव्या ते नवव्या शतकातील बौद्ध विहाराचा शोध लागला होता.


१९. भारताच्या गगन नारंगने रिओ ऑलिंपिकमधील सहभागही नक्की केला असून त्याने अमेरिकेतील फोर्ट बेनिंगमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत ५० मीटर प्रोन प्रकारात कांस्यपदकासह ऑलिंपिकचा कोटा मिळविला.


२०. नारंगने अंतिम फेरीत १८५.९ गुणांचा वेध घेतला. पात्रता फेरीत त्याने ६२६.३ गुणांची कमाई केली होती. पात्र स्पर्धकांत तो अखेरचा आठवा होता; पण अंतिम फेरीत त्याने कामगिरीत कमालीची सुधारणा केली. या स्पर्धेत ऑलिंपिक कोटा दोघांनाच होता; पण रौप्यपदक विजेत्या ब्रायन ओले क्रिस्तन याने यापूर्वीच ऑलिंपिक तिकीट मिळविले होते, त्यामुळे नारंगला रिओचे तिकीट देण्यात आले. 


२१. रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला नारंग हा तिसरा भारतीय नेमबाज आहे. यापूर्वी अपूर्वी चंडेला (१० मीटर एअर रायफल) आणि जितू राय (५० मीटर फ्री पिस्तूल) यांनी ही कामगिरी केली आहे. प्रत्येक देशाला कमाल ३० कोटा मिळू शकतात.


२२. झारखंडच्या नवनिर्वाचित राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपालपदाची शपथ घेतली. झारखंडच्या राज्यपालपदी विराजमान होणा-या त्या पहिल्या महिला आहेत. सय्यद अहमद यांच्याकडे मणिपूर राज्याच्या राज्यपालपदाचा कार्यभार सोपवण्यात येणार असल्याने झारखंडच्या राज्यपालपदी द्रौपदी यांची नियुक्ती करण्यात आली.


२३. रशियाच्या सोयूझ यानाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे सोडलेले मालवाहू अवकाशयान कोसळले असतानाच आता रशियाच्या अग्निबाणाने सोडलेला मेक्सिकोचा उपग्रह नादुरुस्त होऊन सायबेरियात कोसळला.२४. रशियाच्या फेडरल स्पेस एजन्सीने म्हटले आहे, की उपग्रहात बिघाड झाला होता. नेमके काय झाले हे अजून समजलेले नसून त्याचा तपास सुरू आहे. अग्निबाणाचा तिसरा टप्पा अजून सापडलेला नाही. तो सायबेरियात कोसळला असावा. 


२५. रशियाचा प्रोटॉन एम अग्निबाण रशियाच्या बैकोनूर अवकाशतळावरून सकाळी ८.४८ वाजता शनिवारी झेपावला, पण त्याला अपयशाची परंपरा असल्याने तो कोसळला. उपग्रह अग्निबाणापासून वेगळा होण्याच्या अवस्थेत कोसळला. अग्निबाणाच्या तिस-या टप्प्यात एक स्वीच बंद पडल्याने हा अग्निबाण उपग्रहासह कोसळला. 


२६. ‘अग्नि-5’च्या कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या ‘डीआरडीओ’चे वरिष्ठ वैज्ञानिक जी. सतीश रेड्डी यांना “रॉयल इंस्टीट्यूट ऑफ नेविगेशन”ची प्रतिष्ठित फेलोशिप प्रदान करण्यात आली. ही फेलोशिप मिळविणारे रेड्डी हे पहिलेच भारतीय आहेत.


२७. डीआरडीओच्या रिसर्च सेंटरचे प्रमुख रेड्डी यांना जड़त्व आणि उपग्रह आधारित नेविगेशन तसेच वैमानिक तंत्रज्ञानातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जाते.


२८. आंतरराष्ट्रीय आण्विक उर्जा संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आण्विक स्रोतांपासून वीज निर्मिती करणाऱ्या जगातील एकूण ३१ देशांमध्ये भारताचे स्थान तेराव्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे देशनिहाय वापरात असणाऱ्या अणुभट्ट्यांच्या संख्येत जागतिक स्तरावर भारताचे स्थान सातवे आहे.


२९. सध्या भारताची आण्विक स्रोतापासून वीज निर्मितीची क्षमता ५७८०  मेगावॅट आहे. सध्या निर्मिती अवस्थेत असलेल्या अणुभट्ट्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यास २०१९ पर्यंत वीज क्षमता १००८० मेगावॅटपर्यंत वाढणार आहे. भारत सरकारने एकूण ३४०० मेगावॅटक्षमता असलेल्या दोन अणुभट्ट्यांच्या उभारणीला नुकतीच मान्यता दिली आहे.


३०. २०१५-१६ या वर्षात आणखी ६ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची तयारी सुरू आहे. यापैकी जीसॅट-६ व जीसॅट-१५ हे दोन दळणवळण उपग्रह आहेत. आयआरएनएसएस-१ई, आयआरएनएसएस-१एफ व आयआरएनएसएस-१जी हे तीन दिशादर्शक उपग्रह असून ॲस्ट्रोसॅट हा उपग्रह अंतराळ विज्ञान उपग्रह आहे. त्याशिवाय चार देशांतून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचा वापर करून १३ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचीही योजना आहे.


३१. बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा अठरावरून सोळा करण्याच्या दुरुस्ती विधेयकाला लोकसभेने मान्यता दिली आहे. एखाद्या सोळा ते अठरा वयोगटातील बाल गुन्हेगाराने गुन्हा केला असेल आणि त्याला २१ व्या वर्षी पकडण्यात आल्यास त्याच्यावर भारतीय दंडविधान संहितेनुसार खटला भरण्यात येईल, त्यासाठी बाल गुन्हेगार कायद्याचा आधार घेतला जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले.


३२. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या महत्वाकांक्षी अशा ‘मेक ईन इंडिया’या नवीन राष्ट्रीय कार्यक्रमात सोन्याचे दागिने आणि ज्वेलरी उद्योगातील उत्पादक, व्यापारी आणि व्यावसायिक यांची सर्वोच्च संघटना “इंडिया बुलियन अँड ज्वेलरी असोशीएशन लिमिटेड” (आयबीजेए) सहभागी होणार आहे.


३३. आयबीजेएने चार उपक्रम ‘मेक ईन इंडिया फॉर जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर’, ‘मेक ईन महाराष्ट्र’, ‘स्कील्ड डेव्हलपमेंट इनिशीएटीव्ह बाय आयबीजेए’ आणि ‘आयबीजेए ज्वेलरी पार्क’ असे हे चार लोगो ११ मे २०१५ रोजी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात प्रकाशित करण्यात येणार आहेत.


३४. ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांना पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनीरोजगार मंत्रालयपदी नियुक्ती केली आहे. सात मे रोजी ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रीती पटेल या एसेक्स प्रांतातील विथॅम येथून मोठे मताधिक्य घेऊन पुन्हा निवडून आल्या आहेत.३५. ब्रिक्स गटातील पाच उदयोन्मुख अर्थव्यवस्थेच्या देशांनी स्थापन केलेल्या ‘न्यू डेव्हलपमेंट बँके’च्या प्रमुखपदी प्रसिद्ध बँकर के. व्ही. कामत यांची नियुक्ती झाली. 


३६. ५० अब्ज अमेरिकन डॉलरच्या या बँकेचे प्रमुखपद कामत यांच्याकडे पाच वर्षे राहील व बँकेचे कामकाज वर्षभरात सुरू होईल, असे अर्थ सचिव राजीव मेहरिषी यांनी सांगितले.  भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात माठ्या आयसीआयसीआय बँकेचे कामत अध्यक्ष आहेत.


३७. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेने (ब्रिक्स) गेल्या वर्षी न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) स्थापन करण्याचा करार केला होता.


३८. परदेशी उत्पन्न व संपत्ती विधेयक लोकसभेत संमत झाले आहे.  या विधेयकामुळे विदेशी बँकांमध्ये काळा पैसा दडवून ठेवणाऱ्यांना कायद्यात कठोर शिक्षा व मोठय़ा करवसुलीची तरतूद करण्यात आली आहे. 


३९. यात दोन्ही सदनाचे मिळून 30 सदस्य असणार आहेत. समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एस. एस. अहलुवालि यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते.


४०. फोर्ब्ज नियतकालिकाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या शक्तिशाली कंपन्यांच्या “ग्लोबल २०००” यादी जाहीर करण्यात आली आहे. जगभरातील सर्वात मोठ्या दोन हजार कंपन्यांपैकी भारतामध्ये तब्बल ५६ कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्या भारतामध्ये “शक्तिशाली कंपन्या” असा नावलौकिक प्राप्त करून आहेत. 


४१. शक्तिशाली कंपन्या कार्यरत असणाऱ्या देशांमध्ये जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी अमेरिकेत ५७९ कंपन्या कार्यरत आहेत. फोर्ब्जच्या सर्वेक्षणानुसार चीनचा यादीत प्रथम क्रमांक आहे तर देशांमध्ये जपानचा क्रमांक तिसरा आला आहे.


४२. भारतात कार्यरत असलेल्या 56 मोठ्या व शक्तिशाली कंपन्यांमध्ये मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजचाप्रथम क्रमांक आला आहे. भारतातील कंपन्या व त्यांची क्रमवारी. भारतीय स्टेट बॅंक (१५२), ऑईल अँड नॅचरल गॅस (१८३), टाटा मोटर्स (२६३), आयसीआयसीआय बॅंक (२८३), इंडियन ऑईल (३४९), एचडीएफसी बॅंक (३७६), एनटीपीसी (४३१), टीसीएस (४८५), भारती एअरटेल (५०६), ऍक्‍सिस बॅंक (५५८), इन्फोसिस (६७२), भारत पेट्रोलियम (७५७), विप्रो (८११), टाटा स्टील (९०३), अदानी एन्टरप्रायझेस (९४४). 


४३. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रसायन शास्रज्ञ आणि देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झालेले भारतरत्न डॉ. सी. एन. राव यांना जपान सरकारनेही सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानचा ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अॅण्ड सिल्व्हर स्टार’ हा पुरस्कार जपान सरकारतर्फे डॉ. राव यांना देण्यात येणार.


४४. भारत आणि बांगलादेश यांच्यातील काही वस्त्या आणि भूभागाचे आदानप्रदान करण्याला मुभा देणाऱ्या ऐतिहासिक घटनादुरुस्ती विधेयकाला संसदेने सर्वसंमतीने मंजुरी दिली. यामुळे बांगलादेशातील सुमारे ५१० एकर जमीन भारताला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीमा विधेयकाच्या रूपाने संसदेने ११९ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटवली. राज्यसभेने सर्वसंमतीने मंजुरी दिल्यानंतर गुरुवारी लोकसभेने तोच मार्ग अनुसरला.


४५. चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दलचा देशातील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेतेशशी कपूर यांना रविवारी प्रदान करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते पुरस्काराचे वाटप झाले. सुवर्णकमळ, 10 लाख रुपये आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे


४६. महात्मा फुले यांची १२५ वी पुण्यतीथी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधत आगामी वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.