०१. देशात विशाखापट्टनम, बोधगया, सिरमौर, नागपूर, संबालपूर आणि अमृतसर या ठिकाणी ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट’च्या (आयआयएम) संस्थांना कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.


०२. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना यापुढं १० हजार रुपये दंड आणि सहा महिने ते एका वर्षाच्या तुरुंगवासाची हवा खावी लागणार आहे. तसंच एका वर्षासाठी गाडीही जप्त केली जाणार आहे. एकापेक्षा अधिक लायसन्स बाळगणाऱ्यांना तसेच एकापेक्षा जास्त लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्यांना शिक्षा. 


०३.  विम्याशिवाय गाडी चालवणाऱ्या चालकांना २ हजार रुपये ते एक लाखांपर्यंत दंड. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसह वाहनांची सदोष निर्मिती अथवा चुकीचे डिझाइन असल्याचे समोर आल्यास ऑटो कंपन्यांनाही दंडात्मक शिक्षेची तरतूद. 


०४. वाहनांची चुकीची डिझाइन असल्याचे आढळल्यास ५ लाखांपर्यंत दंड आणि संबंधित गाडी परत घेण्यास नकार दिल्यास तीन महिन्यांची शिक्षा अथवा गाडीच्या किमती इतकीच दंडाची तरतूद. एखाद्या मुलाच्या अपघाती मृत्यूला जबाबदार असलेल्या चालकाकडून जबरदस्त दंडवसुली. वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे लायसन्स कायमचेच रद्द होणार.


०५. भारताच्या दुसऱ्या चांद्र मोहिमेतील चांद्रयान-२ची प्रतिकृती (ऑर्बिटर क्राफ्ट मोड्युल स्ट्रक्चर) इस्रोकडे सोपविण्यात आले असून ही प्रतिकृती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) यांनी  तयार केली आहे. 


०६. चांद्रयान-२ हे चांद्रयान-१ची सुधारित आवृत्ती आहे. तीन टन वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता असल्याची माहिती एचएएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक टी. सुवर्ण राजू यांनी दिली आहे. इस्रोच्या नियोजनानुसार, चांद्रयान-२ येत्या दोन-तीन वर्षांत भूस्थिर उपग्रह वाहकाद्वारे अवकाशात सोडण्यात येईल.


०७. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक असलेल्या प्रफुल बिडवई या  पत्रकाराचे वयाच्या ६६व्या वर्षी अॅमस्टरडॅम येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तब्बल चार दशके पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेल्या बिडवई यांचा राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रश्नांचा दांडगा अभ्यास होता. 


०८. चळवळ्या स्वभावाच्या बिडवई यांनी पर्यावरण संरक्षण, मानवी हक्क आणि वैश्विक न्याय आदी प्रश्नांवर कार्यकर्ते म्हणून मोलाचे काम केले होते. नर्मदा बचावसह देशातील अनेक महत्त्वाच्या आंदोलनात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. १९७२मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटिकल विकली’ या सदरामुळं पत्रकारितेत त्यांची ओळख निर्माण झाली.


०९. ‘टाइम्स ऑफ इंडिया’, फायनान्शियल एक्स्प्रेस, बिझनेस इंडिया’सह विविध मासिकांत त्यांनी काम केले होते. राजकीय, आर्थिक, औद्योगिक धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध, अणुऊर्जा, पर्यावरण विकास, राष्ट्रवाद आणि साम्यवाद, सायन्स आणि तंत्रज्ञान आदी विषयांवर त्यांनी लिखाण केले होते.



१०. कसोटीमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारी आशियाई टीम पाकिस्तान 
ठरली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत ४८८ कसोटी सामने खेळले आहेत, त्यात भारताच्या नावे १२२ कसोटी विजयांची नोंद आहे. तर पाकिस्तानने ३९० सामने खेळले आहेत. श्रीलंकेवर विजय मिळवत पाकने १२३ वा विजय प्राप्त केला आहे.


११. भारतानंतर श्रीलंकेचा क्रमांक लागतो. श्रीलंकेने २३६ सामन्यांमध्ये ७१ वेळा विजय मिळवला आहे, तर बांगलादेश ९१ कसोटी सामन्यांमध्ये फक्त ७ वेळा जिंकला आहे.


१२. जगभरातील यादी पाहता ऑस्ट्रेलियाच्या नावे सर्वाधिक कसोटी विजयांचा विक्रम नोंद आहे. ऑस्ट्रेलियाने ७७५ सामन्यांमध्ये ३६४ विजय मिळवले आहेत. त्यानंतर इंग्लंड (३४१), वेस्ट इंडिज (१६४), दक्षिण आफ्रिका (१४४), पाक (१२३), भारत (१२२) न्यूझीलंड (८१), श्रीलंका (७१), झिम्बाब्वे (११) आणि बांगलादेश (७) असा क्रम लागतो.


१३. इस्लामिक स्टेट म्हणजेच आयएसआयएस(इसिस) या दहशतवादी संघटनेने सोशल मीडिया वेबसाईटवर गोल्ड क्वाईनचे काही फोटो अपलोड केले आहेत. लंडनमधील वृत्तपत्र ‘टेलिग्राफ’च्या रिपोर्टनुसार, या क्वाईनवर इसिसचे  चिन्हही आहे. 


१४. या एका क्वाईनची किंमत १३९ डॉलर असल्याचं आयएसआयएसने म्हटले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयएसआयएसने स्वत:चं वेगळं चलन सुरु करण्याबाबत घोषणा केली होती. 


१५. एकूण सात क्वाईन्स चलनात आणण्याचं आयएसआयएसनं जाहीर केलं आहे. यामध्ये दोन सोन्याचे क्वाईन्स, तीन चांदी, तर दोन तांब्याचे क्वाईन्स असणार आहेत. सोन्याच्या क्वाईनवर गव्हाच्या पिकाचे चित्र आणि जगाचा नकाशा असणार आहे.


१६. ब्ल्यू मॉरमॉन’ या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देशात महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिलेच राज्य ठरले आहे. 


१७. राज्य शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी : शेकरू, राज्य पक्षी : हरियल, राज्य वृक्ष : आंबा, राज्य फुल : जारूल घोषित केले आहे


१८. ब्ल्यू मॉरमॉनचे शास्त्रीय नाव  ‘पॅपिलिओ पॉली मेलेस्टॉर’ असून ते आकारमानात सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतरचे सर्वात मोठे फुलपाखरू आहे. याचा मुख्य रंग काळा मात्र  मात्र पंखांवर निळसर झाक असते. पंखांवर पांढऱ्या रंगाच्या ठिपक्यांचा पट्टा असतो. पंखांचा आवाका १२० ते १५० मिलीमीटर असतो. 

१९. हे फुलपाखरू समुद्रसपाटीपासून दोन हजार मीटर उंचीपर्यंतच्या जंगलांमध्येही बागडते. एक्झोरा, घाणेरी, पेंटास यासारख्या गुच्छाने येणाऱ्या फुलांवर अधिक दिसते. लिंबूवर्गीय झाडांवर अंडी घालते.  महाराष्ट्रातील गावागावात मोठय़ा संख्येने आढळते. दक्षिण, मध्य भारत, सिक्कीम, बिहार, पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते. या फुलपाखराचा  भारताव्यतिरिक्त म्यानमार आणि श्रीलंकेत वावर आढळतो. 


२०. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणा-या टारगेट ऑलिंपिक पोडियम योजनेंतर्गत एप्रिल ते जून या दोन महिन्यात सहा क्रीडा प्रकारांतील अव्वल ३१ क्रीडापटूंवर राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (एनएसडीएफ) अंतर्गत ६.१ कोटी रुपये खर्च केल्याचे युवा क्रीडा मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. 


२१. या क्रीडापटूंमध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा, मानवजीत सिंग संधू, हीना सिद्धू, अनिसा सय्यदसह बॉक्सर मनदीप जांग्रा, स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल, हरिंदर पाल सिंग, तिरंदाज तरुणदीप राय, जयंता तालुकदार, दीपिका कुमारी आदींचा समावेश आहे.


२२. कारकीर्दीतील सलग दुस-या वनडेत पाचहून अधिक विकेट घेणारा जगातील दुसरा गोलंदाज मुस्तफिझुर रहमान (बांगलादेश) ठरला आहे. यापूर्वी झिम्बाब्वेचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज ब्रायन व्हिटोरीने अशी करामत साधली होती.


२३. विश्वनाथन आनंदने जगज्जेता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसनवर विजय मिळवत नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर अडीच गुण मिळवत संयुक्तरित्या तिस-या स्थानी झेप घेतली आहे. पाच वेळच्या जगज्जेता विश्वनाथन आनंदने जगज्जेता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसनवर विजय मिळवत नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर अडीच गुण मिळवत संयुक्तरित्या तिस-या स्थानी झेप घेतली.


२४. ब्राझीलचा नेयमार (Neymar) या  स्टार फुटबॉलपटूवर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील पुढील चार सामन्यांमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.  कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात नेयमारने मैदानात गैरवर्तणूक केल्याप्रकरणी त्याला पंचानी रेड कार्ड दाखवले होते. सुरुवातीला त्याच्यावर रविवारी होणा-या व्हेनेझुएलाविरुद्धच्या सामन्यात बंदी धालण्यात आली होती. मात्र दक्षिण अमेरिका फुटबॉल फेडरेशनने सामन्यादरम्यान झालेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याच्या शिक्षेत वाढ केली आहे. 



२५. ब्राझील आणि कोलंबियादरम्यानच्या लढतीत नेयमारने कोलंबियाचा अग्युरो मुरिलोला डोक्याने मारण्याच्या प्रयत्न केला होता. यामुळे सामन्याच्या शेवटी अखेरची शिट्टी वाजल्यानंतर त्याला रेड कार्ड दाखवण्यात आल होते. कोलंबियाचा स्ट्रायकर कार्लोस बक्का यालाही रेड कार्ड दाखवण्यात आले. कार्लोसवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.