०१. मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत राज्यघटनेमध्ये कोणतीही स्पष्ट तरतूद केलेली नाही. कलम १६४ नुसार, राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील असे म्हटलेले आहे. संसदीय शासन प्रणालीच्या संकेतानुसार बहुमतप्राप्त पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले जाते. ०२. एखाद्या व्यक्तीने मुख्यमंत्री म्हणून नियुक्त होण्यापूर्वी बहुमत सिध्द करावे असे नाही त्यामुळे राज्यपाल एखाद्याला मुख्यमंत्रीपदी नियुक्त करून नंतर ठराविक कालमर्यादेत बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात. 


०३. विधीमंडळ सदस्य नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी नियुक्त केले जाऊ शकते. पण नियुक्त केल्यापासून सहा महिन्याच्या आत ती व्यक्ती विधीमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य बनणे आवश्यक असते. 


०४. जेव्हा मुख्यमंत्र्यांचा पदावर असतानाच मृत्यू होतो व कोणताही स्पष्ट उत्तराधिकारी नसतो तेव्हासुद्धा राज्यपाल मुख्यमंत्र्याची निवड करताना आपल्या वैयक्तिक स्वेच्छाधीकाराचा वापर करतात. मात्र त्यांनतर मात्र सरकारी पक्षाने आपला नवीन नेता निवडला तर राज्यपालास त्याचीच नियुक्ती मुख्यमंत्री म्हणून करावी लागते. 


०५. मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल निश्चित नसून राज्यपालांची मर्जी असेपर्यंत तो पद्स्थित राहतो. पण विधानसभेमध्ये बहुमताचा पाठींबा असेपर्यंत मुख्यमंत्र्यांना पदच्युत करता येत नाही असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने एस.आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार (१९९४) खटल्यात दिला. 


०६. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेचा विश्वास गमावला तर त्याने राजीनामा दिलाच पाहिजे किंवा राज्यपाल त्याला बडतर्फ करू शकतात. 


०७. मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते विधीमंडळ कायद्याद्वारे निश्चित करते. याशिवाय त्यांना मोफत निवास, प्रवास भत्ते, वैद्यकीय सुविधा इत्यादी अतिरिक्तपणे पुरवले जाते.


शपथ
०१. राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतात. मुख्यमंत्र्यांना दिली जाणारी शपथ हि घटकराज्यातील कोणत्याही मंत्र्याला दिल्या जाणाऱ्या शपथेप्रमाणेच असते. 


०२. पदाची शपथ :- मी …….(व्यक्तीचे नाव)…. ईश्वरसाक्ष शपथ घेतो कि, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, मी भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन, मी ……(राज्याचे नाव)… राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्धबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. 


०३. गोपनीयतेची शपथ :-  मी …….(व्यक्तीचे नाव)…. ईश्वरसाक्ष शपथ घेतो कि,  ……(राज्याचे नाव)… राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठीची आवश्यकता वगळता, मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. 

मुख्यमंत्र्यांचे अधिकार व कार्ये
०१. राज्यपालांना शिफारस करून मंत्र्यांची नियुक्ती करणे, मंत्र्यांमध्ये खातेवाटप व खात्यांची पुनर्रचना करणे, मंत्रीमंडळाच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवणे आणि तिच्या निर्णयावर प्रभाव टाकणे, सर्व मंत्र्यांच्या कार्यामध्ये मार्गदर्शन व सूचना तसेच नियंत्रण व समन्वयन साधणे. 


०२. एखाद्या मंत्र्याशी मतभेद झाल्यास त्याला राजीनामा देण्यास सांगणे किंवा त्याला बडतर्फ करण्याची शिफारस राज्यपालकडे करणे. 


०३. राष्ट्रपती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपालाची नेमणूक करतात. मुख्यमंत्री राज्यपाल व मंत्रीमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतात. 


०४. आपल्या पदाचा राजीनामा देऊन संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करणे. मुख्यमंत्र्याच्या म्राजीनाम्यामुळे किंवा मृत्यूमुळे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होते. याउलट इतर मंत्र्याचा राजीनामा किंवा मृत्यू यामुळे केवळ त्याचे पद रिक्त होते, जे मुख्यमंत्री दुसऱ्या व्यक्तीची निवड करून भरू शकतात. 


०५. राज्याचा महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्त, राज्य लोकसेवा अध्यक्ष व इतर सदस्य यांच्या नियुक्ती संदर्भात मुख्यमंत्री राज्यपालांना सल्ला देतात. 


०६. राज्य विधीमंडळाचे अधिवेशन बोलावणे व तहकूब करणे, कोणत्याही क्षणी विधानसभा बरखास्त करणे याबाबत मुख्यमंत्री राज्यपालाकडे शिफारस करतात. 


०७. सभागृहाच्या पटलावर शासनाची धोरणे निश्चित करतात. 


०७. राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष, विभागीय परिषदांचे उपाध्यक्ष, आंतरराज्य परिषद तसेच राष्ट्रीय विकास परिषद यांचा सदस्य, राज्य शासनाचा मुख्य प्रवक्ता हि पदे मुख्यमंत्री भूषवतात. 


०८. सर्व शासकीय सेवांचे मुख्यमंत्री राजकीय प्रमुख असतात. तसेच ते आणीबाणीच्या प्रसंगी व संकट काळात प्रमुख आपत्ती व्यवस्थापक असतात. 


०९. राज्याचा प्रमुख या नात्याने समाजातील अनेक घटकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्यांबाबत निवेदन स्वीकारणे. 


१०. मुख्यमंत्री विधानसभेत सरकारी धोरणांची घोषणा करतात. विधानसभेत चालणाऱ्या चर्चेत योग्य वेळी हस्तक्षेप करून शासनाची बाजू त्यांना मांडतात येते. 

मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये (कलम १६७)
०१. राज्याचे प्रशासन आणि विधेयकांचे प्रस्ताव या संदर्भातील मंत्रीमंडळाचे सर्व निर्णय व विधीविधानाचे सर्व प्रस्ताव राज्यपालाना कळविणे. 


०२. राज्यपालाने विचारणा, आवाहन केल्यास राज्याचे प्रशासन आणि विधेयाकांचे प्रस्ताव याबाबतची माहिती राज्यपालाला देणे. 


०३. एखाद्या मंत्र्याने एखाद्या विषयाबाबत निर्णय घेतलेला असेल पण मंत्रिमंडळाने तो विषय विचारार्थ घेतलेला नसेल तर राज्यपालाला आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री तो विषय मंत्रीमंडळाच्या विचारार्थ ठेवतात. विलासराव देशमुख
– महाराष्ट्राचे एक लोकप्रिय माजी मुख्यमंत्री.