चुंबक

* चुंबकाचे गुणधर्म

०१. लोखंडी चुरा किंवा लोखंडाचे चुंबकाकडे आकर्षण असते.

०२. चुंबक हवेत मोकळा टांगून ठेवला असतो तो नेहमी दक्षिणोत्तर स्थिर राहतो.

०३. दक्षिणेकडे स्थिर असणाऱ्या टोकास दक्षिण ध्रुव व उत्तरेकडे असणाऱ्या स्थिर बाजूस उत्तर ध्रुव म्हणतात.

०४. चुंबकाच्या ज्या भागात सर्वात जास्त आकर्षण असते ते भाग बिंदूंनी दाखवून त्यांना कल्पित ध्रुव मानतात. कल्पित ध्रुव जोडणाऱ्या रेषेस चुंबकीय अक्ष म्हणतात.

०५. केवळ एकच ध्रुव असलेला चुंबक मिळविणे अशक्य आहे.

०६. चुंबक तुटल्यास तुटल्याजागी विरूध्द ध्रुव निर्माण होतात.

०७. चुंबकाच्या विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते तर सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते. प्रतिकर्षण हीच चुंबकाची खरी कसोटी मानतात.

०८. जेव्हा एखादी सुची चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाने विचलित होत असेल तर चुंबकसुई उत्तर ध्रुव हा चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शविते.

०९. विद्युत वाहकातून प्रवाह जातांना चुंबकीय क्षेत्र निर्माण होते ही गोष्ट प्रथम ओरस्टेड या शास्त्रज्ञाने दाखवून दिली. चुंबकीय क्षेत्राची दिशा विद्युत धारेच्या दिशेवर अवलंबून असते.

१०. जे पदार्थ चुंबकीय क्षेत्रात ठेवले असता त्यांच्याmarathwada-freedom-fightत प्रवर्तनाने चुंबकीय गुणधर्म उतरवतात अशा सर्व पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात. जसे लोखंड, कोबाल्ट, पोलाद, निकेल यांसारखे पदार्थ चुंबकीय पदार्थ होत.

११. ज्या तापमानाला चुंबकाचे चुंबकत्व नष्ट होते त्या तापमानाला क्युरी तापमान असे म्हणतात.

* चुंबकाचे प्रकार

०1. स्थायी चुंबक
—— ज्या प्रवर्तित चुंबकात चुंबकीय गुणधर्म दिर्घकाळ टिकतात अशा चुंबकांना स्थायी चुंबक म्हणतात.
—— हे चुंबक पोलादासारख्या पदार्थापासून तयार केलेले असतात.
—— अलिकडे स्थायी चुंबक तयार करण्यासाठी अल्निको (Alnico) हा ऍल्युमिनिअम, निकेल, कोबाल्ट व लोखंड यांच्या मिश्रणापासून बनविलेला मिश्र धातू वापरला जातो.

०२. अस्थायी चुंबक
—— ज्यांचे चुंबकीय गुणधर्म अल्पकाळ टिकतात ज्यांना अस्थायी चुंबक म्हणतात.
—— अस्थायी चुंबक मृदू लोखंडापासून तयार केले जाते.

०३. विद्युत चुंबक
—— मऊ लोखंडी तुकड्यांभोवती तारेचे वेटोळे घालून त्यातून विद्युतधारा प्रवाहित केल्यास लोखंडी तुकड्यात चुंबक तयार होते. अशा चुंबकास विद्युत चुंबक असे म्हणतात.
—— याचा उपयोग विद्युतधारा निर्मित चुंबकीय क्षेत्रात वाढ करण्यास होतो.

* चुंबकाचे उपयोग

०१. विद्युत घंटा, खलाशाचे होकायंत्र, चुंबकीय सुरूंग, तारायंत्र दूरध्वनी आणि ध्वनीवर्धक अशा विशिष्ट साधनात चुंबकाचा उपयोग केला जातो.

०२. पृथ्वी स्वःताच एका मोठ्या चुंबकाप्रमाणे वागते. या पृथ्वी चुंबकाचा दक्षिण ध्रुव भौगलिक उत्तर दिशेकडे आणि पृथ्वी चुंबकाचा उत्तर ध्रुव भौगोलिक दक्षिण दिशेकडे असतो. या परिणामामुळे चुंबकसूची केव्हाही दक्षिणोत्तर स्थिर होते.

अ.क्र.साधनउपयोग
विद्युत घंटाविद्युतमंडळ जुळणे व भग्न होणी ही योजना
खलाश्याचे होकायंत्रदिशादर्शक म्हणून
चुंबकीय सुरुंगरणगाड्यांचा विध्वंस करण्याकरिता
दूरध्वनीतील माउथपीसध्वनी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करणे
तारायंत्रमोर्सच्या सांकेतिक भाषेत संदेश पाठविण्यासाठी
विद्युत मोटारयंत्रना गती देणे
चुंबकीय क्रेनलोखंडी यंत्रे व इतर अवजड वस्तुंची चढउतार करणे
लाउडस्पीकरतीव्रता वाढवोलेल्या प्रवाहाचे ध्वनीमध्ये रुपांतर करुन मोठा आवाज प्रक्षेपीत करणे.
गॅल्व्होनोमीटरविद्युत धारेचे अस्तित्व ओळखणे
१०व्होल्टमीटरविद्युत विभवांतर मोजणे
११मल्टीमीटरविद्युतधारा, विभवांतर, रोध आदि विजेच्या परिमाणांचे मापन करणे.

* विद्युत चुंबक आणि नियम

०१. चुंबकीय क्षेत्रामध्ये एकक उत्तरध्रुवाचे ज्या मार्गाने विस्थापन होते त्या मार्गाला चुंबकीय बलरेषा किंवा विकर्ष रेषा म्हणतात.

०२. चुंबकीय बलरेषेवरील कोणत्याही बिंदुपाशी काढलेल्या लंबरेषा चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. दोन चुंबकीय बलरेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत.

०३. चुंबकीय बलरेषा या सलग वक्ररेषा असून त्यांची सुरवात उत्तर ध्रुवापासून होते व त्यांचे शेवट दक्षिण ध्रुवापाशी होतो. ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते. त्या ठिकाणी चुंबकीय बलरेषा अधिकाधिक घट्ट झालेल्या दिसतात.

* उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम

तुम्ही तुमच्या उजव्या हातात एक सरळ विद्युत वाहक धरला असेल आणि अंगठा ताठ ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटली, जर अंगठा विद्युतधारेची दिशा दाखवत असेल तर वाहकाभोवती लपटलेली बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात.

* फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम

आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा परस्परांना लंब राहतील अशी धरल्यास जर तर्जरी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवत असेल आणि मधले बोट विद्युत धारेची दिशा दाखवत असेल तर अंगठा वाहकाच्या गतीची दिशा दर्शवितो.