* द्रव्याचे भौतिक गुणधर्म

०१. द्रव्य जागा व्यापतात. त्याबरोबर सर्व पदार्थ जागा व्यापतात.


०२. पदार्थाचे वस्तुमान म्हणजे त्यामधील द्रव्यसंचयन होय. वस्तुमान हा सर्व पदार्थाचा सर्वसामान्य गुणधर्म होय. वस्तुमान हे द्रव्याच्या आकारमानाच्या प्रमाणात असते. भिन्न प्रकारचे द्रव्य असलेल्या परंतु सारखेच आकारमान असलेल्या पदार्थाचे वस्तुमान भिन्न असु शकतात

०३. पदार्थावरील लावलेले बल काढून घेताच ते त्यांच्या मुळचा आकार व मुळ्चे आकारमान प्राप्त करुन घेतात या गुणधर्माला प्रत्यास्थता (Elasticity) असे म्हणतात.

०४. पदार्थात सद्यस्थिती स्वतःहून बदलण्याची प्रवृत्ती असते. पदार्थाच्या या प्रवृत्तीस जडत्व (Inertia) असे म्हणतात.

०५. कठिणपणा (Hardness) हाही एक पदार्थाचा गुणधर्म आहे. हिरा अत्यंत कठीण पदार्थ असल्यामुळे त्याचा काच कापण्यासाठी हि-याचा उपयोग करतात.

०६. आघाताने तुकडे होण्याचा गुणधर्मास ठिसूळपणा (Brittlness) म्हणतात. पदार्थ जितका कठीण तेवढाच तो ठिसूळ असतो. पोलादाचा तुकडा व काचेचा तुकडा फरशीवर टाकल्यावर काचेचे तुकडे पडतात यावरुन काच पोलादापेक्षा अधिक ठिसूळ आहे.

०७. रंध्रे असणा-या गुणधर्मास सरंध्रता ( सच्छिद्रता- Porosity) असे म्हणतात. जसे खडूचा तुकडा पाण्यात टाकल्यास हवेचे बुडबुडे येणे.

०८. पदार्थाच्या ज्या विशिष्ट गुणांमूळे त्याचे पातळ पत्र्यात रुपांतर करता येते, त्या गुणधर्मास वर्धनीयता (Malleability) असे म्हणतात. सर्वाधिक वर्धनीयता चांदीत असते.

०९. पदार्थाच्या ज्या गुणधर्मामुळे त्याची बारीक तार काढता येते त्यास तन्यता (Ductility) म्हणतात. जवळजवळ सर्वच धातूत तन्यता हा गुणधर्म असतो. सर्वाधिक तन्यता सोन्यात असते.
* तापमापी
०१. पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. पाऱ्याच्या तापमापीचा जास्त प्रमाणात उपयोग करतात. 


०२. पाऱ्याचा गोठणांक -३९ अंश सेल्सिअस असतो आणि पाऱ्याचा उत्कलनांक -३५७ अंश सेल्सिअस असतो. 


०३. पाऱ्याचे प्रसरण एकसमान आहे. तापमानात थोडीशी जरी वाढ झाली तरी त्याचे प्रसरण लक्षात येण्यासारखे असते.


०४. पारा उष्णतेचा सुवाहक आहे. 


०५. पारा काचेस चिकटत नाही. पारा अपारदर्शक असून चकाकणारा असल्याने काचेतून सहज दिसतो.


०६. -४० अंश सेल्सिअसला फॅरनहाईट व सेंटिग्रेड सारखेच असते.


०७. -३९ अंश सेल्सिअस पेक्षा तापमान मोजण्यासाठी अल्कोहोल तापमापीचा उपयोग करतात. अल्कोहोलचा गोठणांक -१७ अंश सेल्सिअस असतो.


०८. ३६७ अंश सेल्सिअसच्या वरचे तापमान मोजण्यासाठी (उच्च तापमान) विद्युत तापमापीचा उपयोग करतात.


०९. सर्वसाधारण निरोगी माणसाचे तापमान सामान्यपणे ३६.९ अंश सेल्सिअस असते.१०. सेल्सिअसचे फॅरनहिट तापमानात रूपांतर 0C = 5 /9 (F – 32) या सुत्राने करतात.