गती (Motion )

गती (Motion )

गती (Motion )

* गतीचे तीन प्रकार पडतात.

०१. स्थानांतरणीय गती (Transition Motion) या गती मध्ये वस्तूमधील प्रत्येक कणाचे विस्थापन समान अंतरातून होत असते. त्यामध्ये वस्तुचे चलन सरळ रेषेत होत असले तर रेखीय विस्थापन किंवा एकरेषीय विस्थापन म्हणतात.

-चलन जर वक्र होत असेल तर वक्ररेषी विस्थापन म्हणतात. एकाच दिशेने जाणारी आगगाडी, रस्त्यावरून न वळता चालणारा मनुष्य इ. याची उदाहरणे आहेत. याला यादृच्छिक गती किंवा ब्राऊनची गती असेही म्हणतात.

०२. परिवलन गती (Rotational Motion) यामध्ये वस्तुमधील सर्व कण एकाच आसाभोवती परिवलन मार्गाने फिरत असतात. यालाच घुर्णन गती असेही म्हणतात. पृथ्वीचे परिवलन, कप्पी भोवरा, पंखा, पवनचक्की इ. या गतीची उदाहरणे आहेत.

३. कंपन गती(Vibrational Motion ) ठराविक कालामध्ये पदार्थामध्ये पुन्हा पुन्हा होणारी एकाच प्रकारची हालचाल यालाच कंपन गती असे म्हणतात.

-लंबकाच्या घड्याळातील लंबकाची गती, शिवणयंत्रातील सुईची गती, तंतुवाद्यातील तार छेडली असता तारेत कंपनगती निर्माण होते. स्थायू किंवा द्रव पदार्थातील अणुरेणूंची गती ही कंपन गतींची उदाहरणे आहेत.

* विस्थापन (Displacement)

०१. एखाद्या वस्तुच्या स्थान बदलास विस्थापन असे म्हणतात. विस्थापन व अंतर यामध्ये फरक आहे.

-अंतर म्हणजे प्रवासात आक्रमिलेल्या मार्गाची प्रत्यक्ष लांबी आणि विस्थापन म्हणजे मूळ स्थानापासून अंतिम ठिकाणापर्यंतच्या मार्गाची एकरेषीय लांबी होय.

०२. मूळ स्थान व अंतिम स्थान यांना जोडणाऱ्या किरणाची दिशा निश्चित होते. म्हणून विस्थापन ही सदिश राशी आहे. परंतु अंतर ही अदिश राशी आहे. विस्थापन हे लांबीच्या एककामध्ये cm, m, km मध्ये मोजतात

०४. जर अंतराला दिशेचा उल्लेख केला तर मात्र ते सदिश म्हणावे लागेल. उदा २०० मी अंतर पूर्व दिशेने.

* चाल (Speed)

 ०१. एकक कालावधीमध्ये वस्तूने आक्रमिलेल्या अंतरास त्या वस्तुची चाल असे म्हणतात. चाल = अंतर/काळ. MKS पध्दतीत चालीचे एकक मीटर/सेकंद (m /s) तर CGS पध्दतीत चालीचे एकक सेमी /सेकंद (cm /s) हे आहे.

०२. चाल मोजतांना आपण विस्थापनाची दिशा विचारात घेत नाही म्हणून चाल ही अदिश राशी आहे. सृष्टीत आढळणा-या काही चालींची अदमासे मूल्ये खालील सारणीत तक्त्यात आहे.

०३. तक्ता

किटक व इतर सूक्ष्मजीव 152 m /s
बैलगाडी किंवा चालणारा माणूस 1 m /s
ध्वनी ( हवेतून जाताना ) 340 m / s
स्वनातीत जेट विमान 1000 m / s
पृथ्वीचे सूर्याभोवती भ्रमण 104 m / s
इलेक्ट्रॉनचे अणुकेंद्रकाभोवती भ्रमण 106 m /s
प्रकाश (हवेतून जाताना ) 3 X 108 m / s
चित्ता (सर्वात जलद धावणारे जनावर ) 29 m / s
ससाणा ( सर्वात जलद उडणारा पक्षी ) 78 m / s
बंदुकीची गोळी 860 m / s
प्रकाश लहरी व रेडिओ लहरी 3 X 105 m / s०४. एखाद्या वस्तुने आक्रमिलेले एकूण अंतर, ते कापण्यासाठी लागलेला एकूण कालावधी यांच्या भागाकारास त्या वस्तुची सरासरी चाल असे म्हणतात.

*वेग

०१. एखाद्या वस्तुच्या विस्थापनाचा दर म्हणजे वस्तुचा वेग होय. वेगाचे एकक MKS पध्दतीत मीटर / सेकंद आणि CGS मध्ये सेमी / सेकंद ही आहेत.

* त्वरण(Acceleration)

०१. जेव्हा एखाद्या वस्तुचा वेग बदलत जातो, तेव्हा त्या वस्तुच्या गतीला त्वरणीत गती म्हणतात. एकक कालात होणारा वेगातील बदल म्हणजे त्वरण होय.

-किंवा वेगाच्या परिवर्तनाचा दर म्हणजे त्वरण होय. स्टेशनजवळ आल्यानंतर आगगाडीचा वेग कमी होत जातो व गाडी सुटते तेव्हा वेग वाढत जातो. वेगात जाणारी बस वळणे घेत असते. ही त्वरणची उदाहरणे आहेत.

०२. त्वरण हे वेगातील बदलाशी संबधीत असते. वेग ही सदिश राशी असल्याने त्वरण ही सुध्दा सदिश राशी आहे.

Scroll to Top