लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भाग २

राजकारण

०१. टिळक १८९० साली कॉंग्रेस पक्षात सामील झाले. गांधीच्या पूर्वी टिळकच देशातील सर्वात मोठे राजकीय व्यक्ती होते. नंतर गांधीच्या वलयासमोर टिळकांची जादू फिकी पडली.
०२. पुण्याच्या सार्वजनिक सभेवर न्या. रानडेंचा प्रभाव होता. १८९५ साली बहुमत मिळवून सार्वजनिक सभेच्या कार्यकारिणीवर टिळकांनी ताबा मिळविला. १८९६ साली दुष्काळ पडला तेव्हा, “सरकारविरुद्ध निशस्त्र प्रतिकार करण्याचा पुरस्कार करण्याचा जनतेने करण्याची आवश्यकता टिळकांनी केसरीतून प्रतिपादन केली.
०३. १९०७ मधील कॉंग्रेसच्या सुरत अधिवेशनात नव्या अध्यक्षाच्या निवडीवरून मतभेद निर्माण झाले. लाला लजपतराय यांना अध्यक्षपद देण्याची टिळकांची सूचना मवाळानी मान्य केली नाही. त्यानंतर कॉंग्रेस पक्षात फुट पडली. कॉंग्रेस मध्ये जहाल व मवाळ गट निर्माण झाले यातील जहाल गटाचे नेतृत्व टिळक यांच्याकडे होते.
०४. मधल्या काळात टिळक शिक्षा भोगण्यासाठी मंडाले तुरुंगात गेले. मंडालेचे तुरुंगातून सुटल्यानंतर टिळकांनी त्यांचेच एक सहकारी जोसेफ-काका बाप्टिस्ट यांचे “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि ते मी मिळवणारच” हे घोषवाक्य अवलंबिले व ते प्रसिद्ध केले.
०५. ८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. डॉ. एनी बेझंट यांच्या प्रयत्नाने टिळक १९१५ साली कॉंग्रेसमध्ये परतले. कॉंग्रेसला एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही.
०६. १९१६ साली लखनौ कॉंग्रेसच्या अधिवेशनातील हिंदू-मुस्लिम ऐक्य घडवून आणण्यात टिळकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. टिळकांना राष्ट्रीय ऐक्य वाढवून राष्ट्रीय चळवळीला गती द्यायची होती. यासाठी कॉंग्रेस व मुस्लिम लीग यांची अधिवेशने लखनौ याठिकाणी होऊन दोन संघटनात तडजोड होऊन एक करार करण्यात आला. हाच तो लखनौ करार.
०७. याच कराराने कॉंग्रेस व लीग या संघटना समान राजकीय उद्दिष्टांसाठी लढू लागल्या. करारनुसार राष्ट्रीय सभेने लीगच्या वेगळ्या मतदारसंघाला विरोध करण्याचे सोडून दिले. लीगने ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्याच्या मागणीस मान्यता दिली. परस्परांमधील मतभेदाचे मुद्दे बाजूला सारून ब्रिटीश सत्तेविरुद्ध एकत्र येउन आंदोलन करण्याची तडजोड केली.
०८. स्वराज्य-स्वदेशी-बहिष्कार-राष्ट्रीय शिक्षण हा टिळकांचा चतुःसूत्री कार्यक्रम होता. १९०५ पासूनच स्वदेशी बहिष्काराच्या आंदोलनास सुरुवात झाली. बंगालमध्ये कृष्कुमार मित्र यांनी ‘संजीवनी’ पत्रात प्रथम बहिष्काराचा पुरस्कार केला. १९०६ मध्ये टिळकांनी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या ‘महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळा’स २० हजार रुपयांची मदत केली.
०९. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. २८ एप्रिल १९१६ रोजी टिळकांनी महाराष्ट्र व मध्य प्रदेशात होमरूल लीग स्थापन केली. टिळकांच्या होमरूलचे अध्यक्ष जोसेफ बाप्टीस्टा तर सचिव नरसिंह चिंतामण केळकर होते. याचे कार्यालय पुणे येथे होते.
१०. तसेच १९१६ साली “ऑल इंडिया होम रूल लीग” स्थापन करण्यासाठी त्यांनी एनी बेझंट, बैरीस्टर जीना व जी.एस. खापर्डे यांना सहकार्य केले. सरकारने यामुळे टिळक व एनी बेझंट यांना अटक केली. टिळकांनी हायकोर्टात दाद मागून निर्दोष मुक्तता करून घेतली.
११. तुरुंगातून सुटल्यानंतर टिळकांनी गांधीना “संपूर्ण अहिंसा” हे तत्व सोडून देण्याचा आग्रह केला व त्याऐवजी त्यांनी “स्वराज्य (होमरूल”) हे तत्व स्वीकारावे असे सुचविले. गांधी टिळकांना आपल्या गुरुस्थानी मनात असले तरी त्यांनी स्वतःचा निर्णय बदलला नाही.
१२. १९१९ मध्ये टिळकांनी ‘प्रतियोगिता सहकारिता’ स्थापन केली. सरकारला जर भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती असेल तरच भारतीय जनता सरकारला मदत करेल. हा यामागचा उद्देश होता.
१३. १९१९ साली सरकारने माँटेग्यू चेम्सफोर्ड कायदा लागू केला. याविषयी टिळकांनी “उजाडले पण सूर्य कोठे आहे?” आणि “जनाब अभी देल्ली तो बहुत दूर है” असे उद्गार काढले.
१४. १९२० साली निवडणुका लढविण्यासाठी टिळकांनी कॉंग्रेस डेमोक्रेटिक पार्टीची स्थापना केली.

१५. ताई महाराज हे वादग्रस्त प्रकरण टिळकांशी सम्बंधित आहे.

तुरुंगवास

०१. १८८२ मध्ये कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी आणि दिवान बर्वे यांच्यातील खटला प्रकरणी टिळक, आगरकर व त्यांच्याबरोबर संपादकीय लिहिणारे केशवराव बखले यांना चार महिन्यांची शिक्षा झाली. प्रत्यक्षात त्यांना डोंगरीच्या तुरुंगात १०१ दिवसच राहावे लागले.
०२. २३ जून १८९७ ला दामोदर चाफेकरांनी रँड व त्याचा सहकारी आयरेस्ट याची गोळ्या घालून हत्या केली. चाफेकरांना अटक करून फासावर चढवण्यात आले. टिळकांवरपण रँडच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण त्यासंदर्भात काहीच पुरावा सरकारला मिळाला नाही.
०३. यादरम्यान टिळकांनी केसरीमध्ये “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” व “`राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे” (२५ जून १८९७) हे दोन अग्रलेख लिहिले. याचाच परिणाम म्हणजे, ब्रिटिश सरकारने टिळकांवर दोन राजद्रोहात्मक लेख केसरीमधून लिहिल्याच्या आरोपाखाली खटला भरला.
०४. या खटल्याची सुरुवात ८ सप्टेंबर १८९७ रोजी मुंबईच्या उच्च न्यायालयात झाली. एकूण नऊ पंचांमध्ये सहा युरोपीय पंच व तीन भारतीय पंच होते. टिळकांच्या बचावासाठी पूर्ण देशभरातून जवळपास ४०,००० रूपये इतका निधी गोळा करण्यात आला. दिनशा दावर यांनी टिळकांचे वकीलपत्र घेतले. न्यायाधीश जस्टिस स्ट्रॅची यांनी बहुमतानुसार टिळकांना दोषी घोषित केले व १८ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
०५. टि़ळकांना तीन महिन्यासाठी डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले व नंतर भायखळ्याच्या तुरुंगात हलविण्यात आले. तुरुंगवासादरम्यान टिळकांना राजकीय कैद्याप्रमाणे न वागवता सामान्य कैद्याची वागणूक दिली जात असे.
०६. याचा संस्कृत विद्वान व टिळकांचे परिचित मॅक्स म्यूलर यांनी तसेच इंग्लंडमधील काही नेत्यांनी विरोध केला. याचा परिणाम म्हणजे सरकारने टिळकांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलविले तसेच त्यांना तुरुंगात काही काळ वाचनाची व लिखाणाची मुभा दिली.
०७. तुरुंगवासादरम्यान टिळकांनी ‘आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ या त्यांच्या पुस्तकासाठी टिपणे बनविली. बारा महिन्याच्या तुरुंगवासानंतर ७ सप्टेंबर १८९८ रोजी टिळकांची सुटका करण्यात आली.

०८. यानंतर दुसऱ्या प्रकरणात ३० एप्रिल १९०८ रोजी प्रफुल चाकी आणि खुदिराम बोस मुजफ्फरपूर येथे कलकत्त्याचा मुख्य न्यायाधीश डग्लस किंग्सफोर्ड याच्या गाडीवर बॉम्ब फेकला. यात गाडीत प्रवास करणाऱ्या दोन बालके व दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर चाकी याने आत्महत्या केली तर खुदिराम बोस यांना पकडून फासावर लटकाविण्यात आले.
०९. टिळकांनी केसरी मध्ये लिहिलेल्या अग्रलेखात या दोन तरुणांचे समर्थन केले. यामुळे टिळकांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटक करण्यात आली. न्यायाधीश दिनशा दावर यांनी टिळकांना ६ वर्षाची कैद आणि १००० रु दंड ठोठावला. यावेळी टिळकांचे वकील बैरीस्टर मुहम्मद आली जीना होते. यानंतर टिळकांना मंडाले (ब्रह्मदेश) येथे पाठविण्यात आले.
१०. मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी “गीतारहस्य” हे पुस्तक लिहिले. यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. तुरुंगातूनच टिळकांनी १९०९ साली पारित झालेल्या मोर्ले-मिंटो कायद्याची प्रशंसा केली.

पत्रकारिता

०१. टिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून.
०२. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.
०३. सुरुवातीला आगरकरांकडे ‘ केसरी ‘ चे संपादकपद तर टिळकांकडे ‘ मराठा ‘ या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही ‘ केसरी ‘ त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ‘ केसरी ‘ चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ‘ केसरी ‘ चा आत्मा होता.
०४. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ‘ सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ‘, ‘ उजाडले पण सूर्य कुठे आहे ,’ ‘ टिळक सुटले पुढे काय ‘, ‘ प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ‘, ‘ टोणग्याचे आचळ ‘, ‘हे आमचे गुरूच नव्हेत ’, ‘ बादशहा ब्राह्मण झाले ‘ हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.

साहित्य आणि संशोधन

०१. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas)त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. सेल्फ डिटरमिनेशन (स्वयं निर्धार) हेसुद्धा त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे.
०२. पुनश्च हरिओम, बॉम्ब गोळ्यांचा अर्थ, बॉम्ब गोळ्यांचा रहस्य आणि दुहेरी इशारा हे त्यांचे प्रसिद्ध लेख आहेत.

प्रसिद्ध वाक्ये

०१. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच
०२. देव जर अस्पृश्यता पाळणार असेल तर मी देवाला मुळीच मानणार नाही.
०३. ‘हिंसा या साधनाचा वापर विवेकाने करा’ आणि ‘अविवेक किंवा साहस आत्मघाती ठरू शकते’ असा सल्ला त्यांनी क्रांतीकारकांना दिला होता.

वर्णन

०१. गांधीजी १९१४ साली दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले. गांधींनी टिळक आणि गोखले यांच्याविषयी मत व्यक्त करताना असे म्हटले कि, “टिळक हे मला महासागरासारखे वाटले. गोखले हे मात्र गंगेप्रमाणे भासले.”
०२. लोकमान्य टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ अशी उपाधी वैलेंटाइन चिरोल या इंग्रज पत्रकाराने आपल्या ‘इंडियन अनरेस्ट’ या पुस्तकात दिली.
०३. गणपती उत्सवामध्ये धार्मिक प्रवृत्तीच्या ब्राह्मनाबरोबरच दगडूशेठ हलवाई, बोरकर वकील, बंडोबा तरवडे, गावडे पाटील, भाऊसाहेब रंगारी अशी ब्राह्मणेतर मंडळीही हौसेने सामील झाली होती. त्यामुळेच टिळकांची ‘तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी’ अशी ओळख निर्माण झाली.

०४. लोकमान्य, मंडईचे कुलगुरू, हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते अशीही टिळकांची ओळख होती. महात्मा गांधी त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ असे म्हणत. तर प्रा. छत्रे यांच्यानुसार, ‘हा टिळक्या म्हणजे सूर्याचे पिल्लू होय’

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा.