स्वच्छता मोहिमेत सिधुदुर्ग व पुणे यांना पुरस्कार
०१. स्वच्छता मोहिमेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे महापालिका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावले आहेत. 

०२. दिल्लीत झालेल्या इंडोसॅन (इंडिया सॅनिटेशन कॉन्फरन्स) या स्वच्छता परिषदेत पंतप्रधानांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. विज्ञान भवनात झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री तसेच उपस्थित सर्व मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ भारतासाठी कटिबद्धता दर्शविणाऱ्या जाहीरनाम्यावर सह्या केल्या.


०४. या वेळी स्वच्छता मोहिमेसाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ११ संस्था व संघटनांना गौरविण्यात आले.

०५. देशात स्वच्छतेत अग्रेसर असणाऱ्या ७५ जिल्ह्य़ाचा सर्वे केंद्राच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने क्वॉलिटी कॉन्सिल ऑफ इंडिया या संस्थेमार्फत करण्यात आला होता. या मध्ये ५३ पठारी व २२ डोंगरी जिल्ह्य़ांचा समावेश होता. 


०६. किनारपट्टीवरील जिल्ह्यांमधील सर्वांत स्वच्छ शहर या गटात सिंधुदुर्ग जिल्ह्याला गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरसिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

०७. या सर्वेक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाने १०० पैकी ९६.८ टक्के गुण मिळवत स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकाविला होता. १०० टक्के साक्षर जिल्हा म्हणून या जिल्ह्य़ाची ओळख आहे. त्यातच स्वच्छ जिल्हा अशी आणखी एक ओळख निर्माण झाल्याने याचा फायदा जिल्ह्य़ाला पर्यटन वाढीसाठी होणार आहे.


०८. घनकचरा व्यवस्थापनात देशभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पुणे महापालिका आणि स्वच्छ सहकार समाज यांना गौरविण्यात आले. पुण्याचे महापौर प्रशांत जगताप आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

०९. घराघरांतून कचरा उचलणे, कचऱ्याची वर्गवारी करणे, कचऱ्यापासून खत तयार करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना आधुनिक साधने देणे, यामध्ये पुणे महापालिकेची कामगिरी संपूर्ण देशात उजवी ठरली आहे. 


१०. रानी की वाव या गुजरातमधील पर्यटन स्थळाला सर्वांत स्वच्छ सांस्कृतिक वारसा स्थळ पुरस्कार देण्यात आला. तर अधिक लोकसंख्येची सर्वाधिक स्वच्छ शहरे या श्रेणीत चंडीगड आणि म्हैसूर या शहरांनी पुरस्कार पटकावला. सर्वांत स्वच्छ पर्यटन स्थळ म्हणून गंगटोक (मेघालय) या शहराला.सर्वाधिक रेल्वे स्थानक म्हणून सुरत रेल्वे स्थानकालाही या वेळी गौरविण्यात आले.



‘सर्जिकल स्ट्राईक’साठी कार्टोसॅट उपग्रहाचा वापर
०१. उरी ह्ल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने बुधवारी रात्री सीमारेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारताचे डीजीएमओ रणबीर सिंह यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराच्या नवी दिल्ली येथील संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

०२. ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणजे अतिशय ठरवून आणि नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई होय. या कारवाईमध्ये जे टार्गेट असतं त्यांच्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्यामुळे नुकसान पोहचणार नाही याची काळजी यामध्ये घेतली जाते. 


०३. ठरलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊन विमानातून बॉम्बहल्ला करणे हे ‘सर्जिकल स्ट्राईक’चे योग्य उदाहरण म्हणता येईल. जमिनीवरून बॉम्बहल्ला करण्याच्या हे अगदी विरूध्द आहे. अमेरीकन सैन्याने २००३ मधील इराक युध्दाच्या सुरूवातीच्या काळात बगदादवर केलेला हल्ला हा ‘सर्जिकल स्ट्राईक’चे उदाहरण आहे. 

०४. भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांना लक्ष्य करत त्यावर हल्ले चढवले.

०५. भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही ‘सर्जिकल स्ट्राईक’चा वापर करण्यात आला होता. परंतु, त्याची उघडपणे वाच्यता करण्यात आलेली नव्हती. यावेळी पहिल्यांदाच भारतीय लष्कराने केलेली कारवाई प्रसारमाध्यमांसमोर उघड करण्यात आली आहे.


०६. भारताने अत्यंत सफाईदारपणे पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या लक्ष्यवेधी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, या कारवाईसाठी प्रथमच कार्टोसॅट मालिकेतील ‘२ सी’ या इस्रोने सोडलल्या उपग्रहाची मदत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

०७. ‘कार्टोसॅट २ सी’ हा उपग्रह या वर्षी २२ जूनलाच अवकाशात सोडण्यात आला आहे. या उपग्रहाने पाकव्याप्त काश्‍मीरमधील काही भागांच्या काढलेल्या अत्यंत उच्च प्रतीच्या छायाचित्रांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. 
या छायाचित्रांच्या वापराबाबत ‘इस्रो’ आणि संरक्षण मंत्रालयाने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. 

०८. कार्टोसॅट २,  २ ए, २ बी आणि २ सी हे भारताचे रिमोट सेन्सिंग उपग्रह आहेत. यामुळे भारताच्या लष्करी टेहळणीला अतिशय मोठा फायदा होत असून, ०.६५ मीटर दर्जाची छायाचित्रे याद्वारे मिळत आहेत. या उपग्रहाद्वारे आपल्याला हव्या असलेल्या भागांची अवकाशातून छायाचित्रे काढता येतात आणि चित्रीकरणही करता येते.



ब्रह्मपुत्रेचे पाणी अडविण्याचा चीनचा प्रयत्न
०१. उरी हल्ल्यानंतर सिंधू पाणी कराराच्या फेरविचाराचे सूतोवाच भारताने केलेले असतानाच चीनने ब्रह्मपुत्रेच्या उपनदीचे पाणी अडवण्याचा प्रयत्न चालवला आहे. या उपनदीवर चीन अवाढव्य जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करत असून २०१४ पासून त्याचे बांधकाम सुरू आहे. 

०२. तिबेटमधील क्षिगाझे येथील यार्लुग झँग्बो (ब्रह्मपुत्रेचे तिबेटी नाव) नदीची उपनदी असलेल्या क्षिआबुकुवर तब्बल ७५ कोटी अमेरिकी डॉलर एवढा महाप्रचंड खर्च करून लाल्हो हा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

०३. या प्रकल्पामुळे भारतीय भूभागात वाहणारा ब्रह्मपुत्रेचा प्रवाह आक्रसणार असून त्याचा परिणाम ईशान्येकडील राज्यांवर होणार आहे. बांगलादेशलाही या प्रकल्पाचा फटका बसणार आहे. भारताने यापूर्वीच चीनकडे या प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

०४. चीनने त्याची दखल घेत प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाची रचना जलसाठा करण्याची नसून वाहत्या पाण्यावरील प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले होते. सिंधू कराराबाबत पाकिस्तानला दिलेल्या धमकीच्या पाश्र्वभूमीवर चीनच्या या प्रकल्पाबाबत भारताकडून साशंकता व्यक्त केली जात आहे.



एसबीआय अध्यक्षपदी अरुंधती भट्टाचार्य यांना मुदतवाढ
०१. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाल एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

०२. ‘एसबीआय’च्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर कार्यकाळ वाढविण्यात आलेल्या अरुंधती भट्टाचार्य या पहिल्या अध्यक्षा आहेत. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही अध्यक्षांना मुदतीनंतर कार्यकाळ वाढवून मिळालेला नाही. 

०३. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र कार्यकाळ वाढविण्यात आल्यामुळे आता त्या ६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळतील.

०४. जागतिक पातळीवरील धोरणानुसार स्टेट बँकेमध्ये सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या विलीनीकरणाची जबाबदारी सुरळीत पार पाडावी, म्हणून सरकारकडून अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाल वाढविण्यात आला असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. त्यामुळे सहयोगी बँकांचे विलीनीकरण त्यांच्या देखरेखीखाली होणार असल्याचे संकेत मिळतात.



भारत अमेरिकेमध्ये युद्ध अभ्यास
०१. भारतीय लष्कर आणि अमेरिकेचे सैन्य यांचा उत्तराखंडातील चौबतियाच्या जंगलातील दोन आठवड्यांचा सामूहिक युद्ध सराव यशस्वीपणे पार पडला. ‘युद्ध अभ्यास २०१६’ या उपक्रमाअंतर्गत हा सराव झाला.

०२. युद्धाच्या दरम्यान एकमेकांच्या सहकार्याने शत्रूविरुद्ध कोणचे डावपेच आखायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत अभ्यास करण्यात आला.

०३. या युद्ध सरावात भारतीय लष्कराच्या पायदळाचे २२५ जवान आणि अमेरिकी सैन्याचे २० इन्फन्ट्री रेजिमेंटचे २२५ सैनिक सहभागी झाले होते.

०४. अमेरिकी सैन्याच्या पॅसिफिक भागीदारी कार्यक्रमाअंतर्गत गेल्या २००४ पासून सुरू झालेला दोन्ही देशांचा युद्ध अभ्यास मालिकेतील हा बारावा सराव होता.

०५. या सरावांमुळे दहशतवाद्यांना प्रमुख्याने डोंगरी भागात तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे आणि प्रत्युत्तर देण्याबाबत सैन्यात प्रगती झाली आहे.