कुष्ठरोग हा मंद गतीने लागण होणारा संसर्गजन्य आजार असून तो ‘मायकोबॅक्टेरियम लेप्री’ या जिवाणूमुळे होणारा आजार आहे.


या रोगजंतूचा शोध डॉ.ए.हॅन्सन यांनी 1873 साली लावला. म्हणून या रोगास ‘हॅन्सन्स डिसीज’ असेही म्हणतात.कुष्ठरोगावरील औषध ‘डॅप्सोन’ (D.D.S.) हे 1940 मध्ये उपलब्ध झाले व त्यांचा वापर 1943 पासून सुरु झाला.

कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाची भारतामध्ये 1954-55 मध्ये सुरुवात झाली. 1980 मध्ये कुष्ठरोगावरील ‘बहुविध औषधोपचार पद्धती’ (MDT) सुरु झाली. 1983 मध्ये ‘राष्ट्रीय कुष्ठरोग दूरीकरण कार्यक्रम’ सुरु झाला.

जगातल्या एकूण कुष्ठरुग्णांपैकी 1/3 रुग्ण एकटया भारतामध्ये आहेत. भारतात तामिळनाडू, आंध्र प्रदेश, प. बंगाल, बिहार, ओरिसा या राज्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.दर 10 हजार लोकसंख्येमध्ये एकपेक्षा कमी प्रमाण करणे म्हणजे ‘कुष्ठरोग दूरीकरण’ होय.


कुष्ठरोग हा आनुवंशिक रोग नाही. कुष्ठरोगाचा प्रसार हा नजीकच्या संपर्कामुळे (तसेच हवेमार्फतही) होतो. 

कुष्ठरोग लक्षणे

बधीर चट्टा ( न खाजणारा, न दुखवणारा)
जाड, तेलकट त्वचा
दुखऱ्या नसा
त्वचेच्या जंतू परीक्षणात जंतू सापडणे.

निदान – लक्षणांवरून निदान तसेच कानाच्या पाळीच्या त्वचेच्या भागाचे जंतू परीक्षण करतात.

कुष्ठरोगाचा प्रकार

सांसर्गिक (मल्टी बॅसिलरी) च. इ.(Multi Bacillary) (6 पेक्षा जास्त चट्टे/दोनपेक्षा जास्त दुखऱ्या नसा) औषधोपचार 12 ते 18 महिने असतो.
असांसार्गिक (पॉसी बॅसिलरी) झ.इ.(Pauci Bacillary) (1 ते 5 चट्टे एक दुखरी नस) औषधोपचार 6 ते 9 महिने असतो.

उपचार
कुष्ठरोगावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. कुष्ठरोग औषधोपचार पद्धतीत बहुविध औषधोपचार पद्धती MDT (Multi Drug Therapy) असे म्हणतात.

कुष्ठरोग निवारण दिन – 30 जानेवारी (महात्मा गांधीनी निर्मुलनासाठी कार्य केल्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीदिनी साजरा करतात.)

महाराष्ट्रामध्ये डॉ. बाबा आमटे यांचा ‘आनंदवन’ प्रकल्प (विदर्भामध्ये) कुष्ठरोगाबाबत सामाजिक कार्य करतो