बजेट हा शब्द ‘Baugette’ या फ्रेंच शब्दापासून तयार झाला आहे. या शब्दाचा प्रथम वापर १७३३ मध्ये करण्यात आला.

अर्थ संकल्प म्हणजे सरकारच्या वित्तीय साधनाचे व्यवस्थापन होय.
भारतीय घटनेत Budget हा शब्द प्रयोग नसून त्याऐवजी कलम ११२ मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा उल्लेख आहे.
भारतात अंदाज पत्रकाची सुरुवात १८६० मध्ये जेम्स विल्सन यांनी केली. 

शिलकी अंदाजपत्रक, तुटीचे अंदाजपत्रक, आणि संतुलीत अंदाजपत्रक असे अंदाजपत्रकाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात.

शिलकी अंदाजपत्रक 
(Surplus Budget):- सरकारचे अपेक्षित उत्पन्न हे अपेक्षित खर्चापेक्षा जास्त असल्यास त्या अंदाजपत्रकास शिलकी अंदाजपत्रक असे म्हणतात.


तुटीचे अंदाजपत्रक (Deficit Budget):- सरकारचे अपेक्षित उत्पन्न हे जर खर्चापेक्षा कमी असेल तर अशा अंदाजपत्रकास तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात.

संतुलीत अंदाजपत्रक (Balance Budget):- जर सरकारचे अपेक्षित उत्पन्न हे अपेक्षित खर्चाबरोबर असेल तर अशा अंदाजपत्रकास संतुलीत अंदाजपत्रक असे म्हणतात.



तुटीचे प्रकार
भारत सरकारच्या एका वर्षाचा एकूण खर्च वजा करुन एकूण जमा (उत्पन्न) यातून जी शिल्लक राहते त्यास अंदाजपत्रकीय तुट (Budgetry Deficit) असे म्हणतात.

महसूली खर्चातून महसूली जमा वजा केली असता शिल्लक राहीलेली महसूली तुट (Revenue Deficit) होय. महसूली जमा (उत्पन्नापेक्षा) महसूली खर्च अधिक केला जातो आणि हे पैसे भांडवली खात्यातून काढले जातात. त्यामुळे भांडवली खात्यावर कमी खर्च केला जातो. म्हणून उत्पादक कार्यासाठी केला जाणारा खर्च कमी पडतो त्यामुळे उत्पादन प्रक्रियेसाठी महसूली तुट अडथळा निर्मान करते. यातूनच उत्पादन प्रक्रियांची गती मंदावते.

जेव्हा सरकारचा खर्च व जमा यामध्ये तुट निर्माण होते तेव्हा रिझर्व्ह बॅक निव्वळ पत (कर्ज) देवून भरुन काढते. याला मौद्रीक तुट म्हणतात.

एकूण खर्चातून स्वतःला मिळवू शकणारे उत्पन्न वजा केले असता शिल्लक राहीलेली राजकोषीय तुट (Fescal Deficit) होय.

राजकोषीय तुटीतून व्याज वजा केल्यास शिल्ल्क राहिलेली रक्कम म्हणजे प्राथमिक तुट 
(Premaery Deficit)होय. 



वाढत्या तुटीचे परिणाम 
०१. महसूली तुटीमुळे आर्थिक विकासाला अडथळा निर्माण होतो.


०२. राजकोषीय तुटीमुळे कर्जात वाढ होते.

०३. एकंदरीत सरकारच्या कर्जात वाढ झाली तर कर्जावरील व्याज देण्याचे प्रमाण वाढते. सध्या भारत सरकार एकूण खर्चाच्या जवळपास २५% खर्च व्याज देण्यावर करते.

०४. उत्पादन प्रक्रिया मंदावते कारण उत्पादनासाठी आवश्यक असणारा खर्च हा व्याज देण्यासाठी वापरला जातो.


०५. कर प्रणातीत बदल करावा लागतो कारण व्याज जास्त द्यावे लागले तर नवीन कर बसवावे लागतात कराचा दर वाढवावा लागतो त्यामुळे कराचा अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे जनतेचे सामाजिक कल्याण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट पुर्ण होवू शकत नाही.



अर्थसंकल्पाचे तंत्र
लाईम ऍटम अर्थसंकल्प

उद्दिष्टांपेक्षा साधनांवर अधिक भर दिलेला असतो.

कार्य परिक्षण अर्थसंकल्प

या अर्थसंकल्पात कार्य, कार्यक्रम, क्रिया प्रकल्प अशी वर्गवारी केलेली असते. उदा. अमेरिका-हुअर कमिशन

कार्यक्रम अर्थसंकल्प

या अर्थसंकल्पात नियोजन असते. उदा. खाजगी क्षेत्र

शुन्याधारित अर्थसंकल्प

अगोदरचा तपशील किंवा आर्थिक निर्णय लक्षात न घेता नव्याने अर्थसंकल्प मांडणे याला शुन्याधारीत अर्थसंकल्प म्हणतात. 



शून्याधारित अर्थसंकल्प
अगोदरचा तपशील किंवा आर्थिक निर्णय लक्षात न घेता नव्याने अर्थसंकल्प मांडणे याला शुन्याधारीत अर्थसंकल्प म्हणतात. 

सर्वप्रथम अमेरिकेत पिअर ए. पियर (P.A, Pyher) या उद्योजकाने आपल्या उद्योगात प्रयोग करुन महत्व सिध्द केले. 


१९८६-८७ मध्ये भारताने स्विकार केला तेव्हा व्हि. पी. सिंग हे अर्थ मंत्री होते. 

१९८७-८८ मध्ये शंकरराव चव्हान हे मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्रात शून्याधारीत अर्थसंकल्प लागू करण्यात आला होता. त्यावेळी अर्थमंत्री श्रीकांत जिचकर होते. 


भारतात शुन्याधारीत अर्थसंकल्प लागू करनारे महाराष्ट्र हे पहीले राज्य होते. शुन्याधारीत अर्थसंकल्प मांडणारे दुसरे राज्य आंध्रप्रदेश ( १२ ऑगस्ट २०००) आहे.

शुन्याधारीत अर्थसंकल्पाचे टप्पे :- 
०१. सूक्ष्म अभ्यास करणे 
०२. खर्चाचे परीक्षण 
०३. मुल्यमापन करणे. 
०४. समर्थन करणे 
०५. प्राधान्य क्रम ठरविणे.

आवश्यकता :-

०१. उत्पादनाचे योग्य वाटप 
०२. ढाससळलेल्या अर्थव्यवस्थेस सावरण्यासाठी


फायदे:-
०१. जास्त लाभ देणा-या प्रकल्पांची निवड 
०२. अनुत्पादक खर्च टाळता येतो. 
०३. कार्यक्षम व्यवस्थापन