‘कार्य’ म्हणजे बल व विस्थापन यांचा गुणाकार होय. (w = f × d)

कार्य व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाण सांगितले तरी पुरेसे आहे. दिशा सांगण्याची गरज नाही. म्हणून कार्य ही ‘आदिश राशी’आहे.

SI पद्धतीला बलाचे एकक न्यूटन आहे व विस्थापनाचे एकक मीटर आहे. म्हणून कार्याचे एकक न्यूटन – मीटर म्हणजेच ज्यूल हे आहे. CGS पद्धतीत डाईन-सेंटीमीटर किंवा अर्ग आहे.


1 ज्यूल = 1 न्यूटन × 1 मीटर
1 अर्ग = 1 डाईन × 1 सें.मी.
1 ज्यूल = 107 अर्ग 

घन, ऋण व शून्य कार्य
ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते तेव्हा त्या बालाने केलेले कार्य धन असते. उदा. बंद बस ढकलणे

बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते. त्या बलाने केलेले कार्य ऋण असते. उदा. 
चेंडूचा झेल घेणे

ज्या वेळी बाल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात तेव्हा बलाने केलेले कार्य शून्य असते. उदा. 
दोरीला बांधलेला दगड फिरवणे

पृथ्वी व सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. यामध्ये केंद्रकीय बलाने केलेले कार्य शून्य आहे. 

सरल दोलक विराम अवस्थेत असतो तेव्हा त्याचे वजन अधोगामी दिशेने कार्य करते, तर दोरीवरील ताण त्याच्या वजनाच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात.  त्यामुळे सरल दोलक विराम अवस्थेत असतो. त्यावरील बलाने केलेले कार्य शून्य असते.