भारतीय लोकमताच्या दडपणामुळे ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या हंटर आयोगाने जनरल डायरविरूध्द कोणतीही ठोस कारवाई सुचवली नाही. इंग्लडमध्ये डायरच्या कृत्याचे समर्थ नच केले गेले. या घटनांमुळे भारतीय जनतेने ब्रिटिश सरकारविरूध्दचा आपला लढा अधिक तीव्र केला.


पहिल्या महायुध्दानंतर तर्कस्तानवर कठोर तह लादला गेल्याने प्रक्षुब्ध झालेल्या भारतीय मुस्लीम समाजाने खिलाफत आंदोलन उभारले. राष्ट्रीय सभेने खिलाफत चळवळीला दिलेला पाठिंबा आणि मुस्लिमांनी राष्ट्रीय सभेच्या आंदोलनास दिलेला पाठिंबा यामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य साधण्यात गांधीजीना यश मिळाले.


गांधीजींनी व काँग्रेसने असहकाराचे अहिंसक आंदोलन सप्टेंबर १९२० मध्ये सुरु केले. पंजाबात व खिलाफतीबद्दल जो अन्याय झाला होता तो दूर होऊन स्वराज्य मिळेपर्यंत ते चालू राहावयाचे होते. गांधीजींनी एका वर्षात स्वराज्य अशी घोषणा केली.

असहकार चळवळ
२० फेब्रुवारी १९२० रोजी नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली. येथेच चळवळीचा ठराव पास करण्यात आला. या अधिवेशनाचे अध्यक्ष चक्रवर्ती विजय राघवाचार्य होते.ठरावात पुढील बाबींचा समावेश होता. 
०१. सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.
०२. सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.
०३. सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे
०४. सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे. पंचायत न्यायदान इ. चा उपयोग करावा.
०५. प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.
०६. परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे. ०७. दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे. 
०८. टिळक स्मारक निधी निर्माण करुन देशी उद्योगंधदे सुरु करावे. यावेळी निधीसाठी एकूण १ कोटीहून अधिक रक्कम जमा झाली.


या चळवळीच्या वेळी चरखा हे स्वदेशी व स्वराज्याचे प्रतीक मानण्यात आले. भारतातील ब्रिटिश सत्तेचा शेवट करणे आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थांची स्थापना करणे ही दोन उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली.


गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली. त्यामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.


असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी ५ फेब्रुवारी १९२२ रोजी घेतला.


५ फेब्रुवारीस चौरीचौराची घटना घडली. तीन हजार शेतकर्‍यांच्या एका काँग्रेस मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला व त्याचा सूड म्हणून प्रक्षुब्ध जमावाने पालिसचौकीच पेटवून दिली. त्यांत २२ पोलिस ठार झाले.


१० मार्च १९२२ रोजी चोरीचौरा प्रकरणासाठी ब्रिटिशांनी गांधींवर राष्ट्रद्रोहाचा खटला भरून ६ वर्षांची शिक्षा केली.

असहकार चळवळ सूरु करण्याची कारणे
०१. पहिल्या महायूध्दामध्ये भारतीय सैन्य व जनता यांच्यात प्रखर राष्ट्रवाद व राष्ट्रजागृती निर्माण झाली.०२. महायूध्दाचा खर्च वसूल करण्यासाठी इंग्रजांनी प्रचंड आर्थिक पिळवणूक केली


०३. नैसर्गिक संकटसमयी आपल्या आर्थिक नीतीचा त्याग केला नाही व मदत ही केली नाही.


०४. इंग्रजांचा जुलमी राज्यकारभार असून लोकांवर दहशत बसविण्यासठी अनेक कायदे मंजूर केले.


०५. रौलेट अ‍ॅक्टचा निषेध करण्यासाठी जमा झालेल्या जालियनवाला बागेतील लोकांवर जनरल डायरने गोळीबार करुन अनेकांना ठार मारले.

असहकार चळवळीचे स्वरूप
०१. जमनालाल बजाज, म. गांधी रवींद्रनाथ टागोर सुंभाषचंद्र बोस यांनी पदव्या व पदवीचा त्याग केला.०२. बॅ. चित्तरंजन दास, मोतिलाल नेहरू, बॅ.एम.आर. जयकर, कन्हैय्यालाल मुन्शी, केशूभाई पटेल, चक्रवर्ती राजगोपालाचारी, वल्लभभाई पटेल, डॉ.सैफुद्दीन किचलू यांनी व्यवसायाचा त्याग केला.


०२. १९१९ च्या कायद्याने होणार्‍या कायदेमंडळाच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकला.


०३. डयुक ऑफ कॅनोटच्या आगमनप्रसंगी हरताळ, प्रिन्स ऑफ वेल्सच्या होणार्‍या समारंभावर बहिष्कार टाकला.


०४. विद्याथ्र्यानी सरकारी शाळेवर बहिष्कार टाकला. विदेशी मालाच्या दुकानासमोर पिकेंटिंग करण्यात आले. भाषिक आधारावर प्रांतिक काँग्रेस समित्या संचलित करण्यात आल्या. काँग्रेस संघटना अगदी खेडयांपर्यंत पोहोचली व तिच्या सभासदत्वाचे वार्षिक शुल्क केवळ चार आणे ठेवण्यात आले. ग्रामीण व शहरी भागांतील गरीब जनतेलाही सभासद होता यावे हा त्यामागचा उद्देश होता.


सरकारचे धोरण 
सरकारने आदेश काढून सांगितले की कायदेभंग करू नये.


भाषणबंदी सभाबंदी, मिरवणूकबंदी, परंतू जनतेने त्याकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले, त्यातूनच उतर प्रदेश, मालेगाव, मलबार येथे हिंसक घटना घडल्या ५ फेब्रुवारीपोलीस चौकी जाळली. 

असहकार चळवळीचे परिणाम
१९२०-२१ साली ब्रिटिशांनी भारतात १०२ कोटींची आयात केली. १९२१-२२ या वर्षात ही आयात ५७ कोटींवर आली. 


१९२०-२१ या एक वर्षाच्या काळात संबंध भारतात ३९६ संप झाले.


त्यामुळे प्रथमच लक्षावधी शेतकरी व नागरी विभागांतील गरीब जनता राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात आली. किंबहुना सार्‍या भारतीय जनतेलाच आता अस्मितेची जाणीव झाली. त्यात शेतकरी, कामगार, कारागीर, ददुकानदार, व्यापारी, डॉक्टर, इतर व्यावसायिक व कचेर्‍यांत काम करणार्‍या नोकरवर्गाचाही समावेश होता. 


स्त्रियांही या आंदोलनाकडे आकर्षित झाल्या. देशाच्या अगदी दूरवरच्या कोपर्‍यापर्यंत ही चळवळ फैलावली. किंबहुना जनतेची लढयाची प्रवृत्ती आणि स्वार्थत्यागाची भावना यावरच गांधीजींनी आपले सर्व राजकारण आधारले होते. त्यांनी जनतेला राष्ट्रीय संग्रामाच्या आघाडीवर आणले व त्यांचे जनआंदोलनात रुपांतर केले


भारतीय जनता आता निर्भय बनली. आता ब्रिटिश साम्राज्यशाहीची तिला भीती वाटेनाशी झाली. नेहरुनी नंतर म्हटल्याप्रमाणे गांधीजींनी त्यांच्यातील पौरुषत्व जागृत केले. सार्‍या देशाच्या बाबतीत असेच घडले.


 या संदर्भात असे ध्यानात घ्यावयास हवे की अहिंसा हे दुबळया व भेकडांचे शस्त्र आहे. असे गांधीजी मुळीच मानीत नसत. अगदी खंबीरवृत्तीची माणसेच त्याचा उपयोग करु शकत. भेकडपणापेक्षा मला हिंसाचार परवडेल, असे गांधीजींनी पुन: पुन्हा सांगितले आहे. 


भेकड वृत्तीवरने असहाय्यपणे आपला अवमान निमूटपणे पाहात राहण्यापेक्षा आपल्या मानाच्या रक्षणासाठी हिंदी जनतेने हिंसेचा अवलंब केला तरी मला चालेल.


२३ फेब्रुवारी १९२२ ला चळवळ मागे घेताना गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे, ब्रिटिश जनतेला जाणीव करुन देण्यास हीच योग्य वेळ आहे. १९२० मध्ये जो संग्राम सुरु झाला तो आता शेवटाला जाईपर्यंत चालू राहणार आहे. मग तो एक महिना वा एक वर्ष किंवा कित्येक महिने वा कित्येक वर्षे चालो. 


असहकार आंदोलनाने भारतीय जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. लाखोंच्या संख्येत सामान्य लोक निर्भयपणे असहकार आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाद्वारे हिंदू-मुस्लीम ऐक्य दृढ झाले. सत्याग्रहाच्या अभिनव मार्गाने ब्रिटिश साम्राज्यवादी राजवटीचा पाया कमकुवत करण्यात गांधीजी यशस्वी झाले