स्वराज्य पक्षाची स्थापना

स्वराज्य पक्षाची स्थापना

स्थापना : १ जानेवारी १९२३
स्थळ : अलाहाबाद
अध्यक्ष : बॅ. चित्तरंजन दास (देशबंधू)
सचिव : मोतीलाल नेहरू
सहकार्य : न.चि. केळकर


०१. १९२० च्या दशकाचा मोठा काळ गांधीजी प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहिले. राजकारणाच्या पटावर ते १९२८ मध्ये परत आले.


०२. पक्षातील सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या तरुण नेत्यांची मागणी तात्काळ स्वराज्याची होती. पण गांधीजींनी ब्रिटिश सरकारला उत्तरासाठी एका वर्षाचा अवधी दिला. पण ब्रिटिश सरकारने काही उत्तर दिले नाही. 

०३. गांधींनी असहकार चळवळ मागे घेतल्याने काँग्रेसमधील तरुणवर्गाने बाहेर पडून या पक्षाची स्थापना केली.


०४. मोन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा अंतर्गत होऊ घातलेल्या निवडनुकीवर बहिष्कार घालावा असे राष्ट्रसभेचे धोरण होते.परंतु हा बहिष्कार घालण्याऐवजी कायदे मंडळात प्रवेश करून सरकारला सनदशीर मार्गाने विरोध करावा असे काही नेत्यांना वाटत होते.


०५. त्यामुळे राष्ट्रसभेची फेरवादी नावाचा गट सी. आर. दास. व मोतीलाल नेहरू यांच्या नियंत्रणाखाली स्थापन झाला. 
काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून तिच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना डिसेंबर १९२२ मध्ये फेरवादी विचारवंतानी केली.


०६. नाफेरवादी एक गट डॉ राजेंद्रप्रसाद वल्लभबाई पटेल यांच्या नियंत्रणाखाली तयार झाला. 



०७. गांधीजींच्या असहकार व सत्याग्रहाने भारताला स्वातंत्र्य मिळेल असे वाटत नाही म्हणून मोतीलाल नेहरू, बॅरिस्टर चित्तरंजन दास, बॅरिस्टर मुहम्मद अली जिना, न.चि. केळकर, लाला लजपतराय, बॅरिस्टर एम.आर. जयकर, पंडित मदनमोहन मालवीय यांनी या पक्ष स्थापनेसाठी पुढाकार घेतला.

०८. निवडणूक लढवून इंग्रजांच्या कायदेमंडळात प्रवेश करून सरकारवर दबाव टाकण्यासाठी ‘स्वराज्य पक्षाची’ स्थापना करण्यात आली.

०९. १९२३ साली झालेल्या निवडणुकीत या पक्षास १४५ पैकी ४८ जागा मिळाल्या व त्यावेळी एवढ्या जागा मिळविणारा तो भारतातील सर्वात मोठा पक्ष बनला.

१०. त्यात मोतीलाल नेहरू, पंडित मदन मोहन मालवीय, लाला लजपतराय, न चि केळकर इत्यादी नेते निवडून आले.


स्वराज्य पक्षाची उदिष्टे
आपल्या मताचा प्रसार करून असहकार चळवळीमुळे लोकांच्या मनात निर्माण झालेला गैरसमज दूर करून व निवडणुका लढवणे व कायदे मंडळाचे सभासदत्व प्राप्त करणे.

सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये स्वराज्याची तळमळ कायम ठेवून राष्ट्रीय चळवळीत प्रगती करणे आवश्यक होते.


ब्रिटीश शासनाच्या दडपशाही विरुद्ध आवाज उठवून हिंदुस्तानच्या घटनेत आवश्यक ते अनुकूल परिवर्तन घडवून आणणे.


देशातील सर्व हिंदू मुसलमानामध्ये ऐक्याची भावना निर्माण करणे.



ब्रिटीश शासनाची हिंदुस्तानच्या बाबतीत असलेली ताठर भूमिका बदलून कल्याणकारी राज्य स्थापन करणे.


स्वराज्य पक्षाची कार्ये
सरकारच्या धोरणावर प्रहार
चळवळीची जागृती
चळवळीचे कार्यक्रम
गोलमेज परिषदेची उभारणी



स्वराज्य पक्षाचे विलीनीकरण
१९२५ साली बॅरिस्टर चित्तरंजन दास यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर या पक्षास उतरती कळा लागली.


या दरम्यानच्या काळात गांधींनी नागपूर येथे झेंडा सत्याग्रह केला. याचा उद्देश अशिक्षित लोकांना एकत्रित करून भारताचा झेंडा जाहीरपणे फडकविणे व तसा संदेश पोहोचविणे हा होता.


१९२५ साली गांधींच्या विचारसरणीवर आधारित मानवेंद्रनाथ रॉय यांनी मुंबई येथे कम्म्युनिस्ट पक्षाची स्थापना केली.


या दरम्यानच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतात युवक संघटना उभ्या केल्या.


पुढे गांधींनी काही वर्षानंतर या पक्षाचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये केले

Scroll to Top