राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ – अपेक्षित ७० उत्तरे

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ – अपेक्षित ७० उत्तरे

०१. पृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक ०.२६ एकक असून तेथील उतार कोन ६० आहे. या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ०.५२ एकक असेल.


०२. उद्वाहकाची ओझे वाहून नेण्याची कमाल मर्यादा १८०० किलोग्रॅम आहे. हे उद्वाहक अर्धव दिशेने २ मी/स या एकसमान चालीने गतिमान आहे. गतीला विरोध करणारे घर्षण बल ४००० N आहे. g=१० m/sआहे. तर मोटार यंत्राकडून उद्वाहकाला किमान ५९ hp ताकद पुरविली गेली.


०३. लांबीचे नवीन एकक असे निवडले कि ज्यानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाची गती १ एकक येते जर सूर्यप्रकाश सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर ८ मिनिट व २० सेकंदात कापत असेल, तर लांबीच्या नवीन एककानुसार सूर्य व पृथ्वीमधील अंतर ५०० एकक असेल.


०४. जण दोन रोध एकसर जोडणीने जोडले, तर त्याचा परिणाम रोध ४५ ओहम होतो. जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध १० ओहम होतो. तर त्या रोधांच्या किमती काढा. १५ ओहम  आणि ३० ओहम 


०५. मांस, मासे, यकृत व लहान आतड्यामधील जिवाणू हे व्हिटॅमिन बी-१२ चे स्रोत आहेत.


०६. एक जनुक – एक पाचकरस परिकल्पना जॉर्ज हेल्स बीडल आणि एडवर्ड टोटॅम यांनी प्रस्तावित केली होती.


०७. लायकेन कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून ऍन तयार करतात.


०८. इथिलिन हे वनस्पती संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात.


०९. वृषण हे साधारणतः जन्माच्या अगदी पूर्वी किंवा जन्माच्या वेळेस अंडकोषामध्ये उतरतात.


१०. १० चा १८ वा घात याचा उपसर्ग गुणांक एक्सा आहे.

११. जोड्या जुळवा
भारतीय परिषद अधिनियम १९०९ – मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व
भारत सरकार अधिनियम १९१९ – प्रांतामध्ये द्विशासन पद्धती
भारत सरकार अधिनियम १९३५ – केंद्रामध्ये द्विशासन पद्धती 
भारतीय स्वातंत्र्य अधिनियम १९४७ – राजा हा अधिकाराचा स्रोत नाही

१२. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीसंबंधी संदर्भ कलम २३९ AA व कलम २३९ AB मध्ये सापडतात. परंतु संभाव्य उत्तर २३९ AA आहे.

१३. १०८ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्य विधानसभा मध्ये महिलांसाठी एकतृतीयांश जागांसंबंधी आहे. राज्यसभेने ९ मार्च २०१० रोजी मंजूर केले होते. लोकसभेने या विधेयकावर कधीच मतदान केले नाही. १५ व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले.

१४. नागरिकांनी देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवा करण्यास तयार राहणे. हे महत्वाचे मूलभूत कर्तव्य आहे.

१५.जर एखादा व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य म्हणून निवडून आला तर त्याने १० दिवसांच्या आत त्याला कोणत्या सभागृहात कार्य करायचे आहे हे सुचित करणे गरजेचे असते. अन्यथा त्याची राज्यसभेतील जागा रिक्त होते. 

जर एखाद्या सभागृहाचा कार्यरत सदस्य दुसऱ्या सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते. 
जर एखादा व्यक्ती एकाच सभागृहाच्या दोन जागांवर निवडून आला तर त्याने एका जागेची निवड करणे गरजेचे असते अन्यथा त्याच्या दोन्ही जागा रिक्त होतात. 


१६. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष आणि  सदस्य यांची निवड राष्ट्रपती सहा सदस्यीय समितीच्या शिफारसीवरून करतात. या समितीचा अध्यक्ष पंतप्रधान असतो तर समितीमध्ये लोकसभेचा सभापती, राज्यसभेचा उपाध्यक्ष, संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री इत्यादी सदस्य असतात. 


१७. राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही.


१८. विभागीय परिषदा या घटनात्मक नसून वैधानिक संस्था आहेत. याची निर्मिती ‘राज्य पुनर्रचना कायदा, १९५६’ ने करण्यात आली. सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष केंद्रीय गृह मंत्री असतात. सध्या देशात सहा विभागीय परिषद आहेत.


१९. आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग, नेदरलँड येथे आहे. न्यायाधीशांची निवड ९ वर्षांसाठी केली जाते. निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात. आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडविले जातात.


२०. १७ वे एशियाड खेळ दक्षिण कोरिया येथे आयोजित करण्यात आले होते. याच्या पदकतालिकेत चीनने पहिले, दक्षिण कोरियाने दुसरे तर जपानने तिसरे स्थान पटकावले. या खेळात ११ सुवर्णपदके व एकूण ५७ पादकांसह भारतने आठवे स्थान पटकावले.


२१. जोड्या लावा
लँड ऑफ केक्स – स्कॉटलंड 
लँड ऑफ कॅनाल्स – नेदरलँड
लँड ऑफ थाऊसंड लेक्स – फिनलंड
लँड ऑफ व्हाईट एलिफन्टस – थायलंड


२२. राष्ट्रकुलाची औपचारिक स्थापना १९३१ मध्ये करण्यात आली होती. त्यास स्वतःची घटना अथवा सनद नाही. २९ नोव्हेंबर २००९ मध्ये रवांडा हा देश नव्याने सदस्य झाला. १३ ऑक्टोबर २०१६ रोजी मालदीव नुकताच राष्ट्रकुलातून बाहेर पडला.


२३. आग्रा किल्ला आणि अजंता लेण्या ही भारताची दोन स्थळे वारसा स्थळांच्या यादीत पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आली.


२४. जिनपिंग हे धरण जगातील सर्वात उंच धरण आहे.


२५. सध्या भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे विवेक एक्स्प्रेस – डिब्रुगड ते कन्याकुमारी आहे.


२६. 
भरतनाट्यम – पद्मा सुब्रमण्यम
कथक – सितारा देवी
कुचिपुडी – मृणालिनी साराभाई (भारतनाट्यम आणि कथकली)
ओडिसी – इंद्राणी रहमान


२७. झारखंड राज्यात ‘सरहूल उत्सव’ साजरा केला जातो.


२८. जोड्या लावा (खालील सर्व लेखकांना २०१४ साली पुढील पुस्तकांसाठी साहित्य अकादमी अवॉर्ड २०१४ मिळाला होता)
मुनव्वर राणा – शाहदाब (उर्दू)
जसविंदर – अगरबत्ती (पंजाबी)
आशा मिश्रा – उचाट (मैथिली)
नंदा हंगकीम – सत्ता ग्रहण (नेपाळी)


२९. अर्जेंटीना (२७८०४०० चौकिमि), भारत (३२८७२६३ चौकीमी), ब्राझील (८५१५७६७ चौकिमी), चीन (९५७२९०० चौकिमी), रशिया (१७०९८२४६ चौकिमी) क्षेत्रफळ आहे.


३०. दार -उस-सलाम ही टांझानियाची जुनी राजधानी आहे. हे व्यापाराचे मुख्य शहर आहे. हे के नैसर्गिक बंदर आहे. व वाहतुकीचे मुख्य केंद्र आहे.


३१. जोड्या लावा (युद्ध सराव)
शक्ती – भारत व फ्रांस
इंद्र – भारत व रशिया
युद्ध अभ्यास – भारत व युएसए
मित्र शक्ती – भारत व श्रीलंका


३२. रिजर्व बँक ऑफ इंडियाने पारंपरिक बँकामध्ये ‘इस्लामिक विंडो’ उघडण्याची शिफारस केली आहे.


३३. केंद्र शासनाने २०१० साली जम्मू काश्मीरमध्ये शांततेसाठी उपाययोजना सुचविणाऱ्या समितीचे अध्यक्षपद दिलीप पाडगावकर यांनी भीषविले होते.


३४. जी-सैट ७ हा पहिला नौदल उपयुक्त उपग्रह ऑगस्ट २०१३ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता.


३५. ‘वन लाईफ इज नॉट इनफ’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक के नटवर सिंह आहेत.


३६.सायना नेहवाल यांना २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.


३७. महाजनपदे जोड्या लावा
अंग – पूर्व बिहार
मगध – दक्षिण बिहार
वज्जी – ऊत्तर बिहार
मल्ल – गोरखपूर जिल्हा


३८. सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते जोड्या लावा
हडप्पा – दयाराम साहनी
मोहेंजोदडो – राखालदास बॅनर्जी
चहूंदडो – गोपाळ मुजुमदार 
लोथल – रंगनाथ राव


३९. स्टीटाईट दगडाचा वापर करून बनविलेल्या मुर्त्या हडप्पाच्या उत्खननांत आढळल्या होत्या.


४०. महाजनपदे राजे जोड्या
कोसल – प्रसेनजित 

मगध – बिंबिसार
वत्स – उदयन
अवंती – प्रद्योत


४१. अंगुत्तर निकाय या बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा उल्लेख आढळतो.


४२. ईश्वरचंद्र विद्यासागर हे संस्कृतचे महान पंडित होते. तरीही त्यांनी पाश्चात्य विचारांचा स्वीकार केला. संस्कृत कॉलेजमध्ये त्यांनी पाश्चात्य विद्येचे अध्यापन सुरु केले. विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा आधार दिला.


४३. सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडन अँग्लो इंडियन स्कुलची स्थापना केली होती. भारताच्या तिसऱ्या वर्गाचा तारा हा किताब त्यांना इंग्रजांकडून मिळाला होता.


४४. विद्यापती ठाकूर या मिथिलेतील कवीला हिंदू तसेच मुस्लिम सुलतानाचे प्रोत्साहन मिळाले होते.


४५. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत वायव्य सरहद प्रांतात सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांनी पठाणांच्या सत्याग्रहींची फौज निर्माण केली. या सत्याग्रहींना घेऊन त्यांनी खुदा-इ-खिदमतगार ही संघटना निर्माण केली. या संघटनेला लाल डागलेवाल्यांची संघटना असेही म्हणतात.
नागालँडची गेंडील्यू हिने वयाच्या १३ व्या वर्षी बंड पुकारले आणि जन्मठेपेची शिक्षा मिळाली. नंतर भारताच्या स्वातंत्र्यांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. पंडित नेहरूंनी त्यांना ‘राणी’ हा किताब दिला.
सविनय कायदेभंग चळवळीमुळे काँग्रेस संघटना १९२१-२२ पेक्षा ग्रामीण भागात बलवान बनली.


४६. सर सय्यद अहेमद खान यांच्या शिवाय देशातील जवळ जवळ सर्वच प्रमुख व्यक्ती राष्ट्रीय सभेत सामील झाल्या होत्या.


४७. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशात काही ठराव पास करण्यात आले. त्यात भारताच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी एक रॉयल कमिशन नेमावे आणि त्यात भारत व इंग्लंड या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा. हिंदू चे संपादक सुब्रम्हण्य अय्यर यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
भारतमंत्र्याचे इंडिया कौन्सिल रद्द करण्यात यावे असा ठराव चिपळूणकरांनी मांडला.
लष्करी खर्च वाढवू नये वाढल्यास संरक्षक जकाती बसवून तो खर्च वसूल करावा. भारत सरकारच्या कर्जाला ब्रिटिश सरकारने हमी द्यावी. युध्दाच्या खर्चाचा बोजा जनतेवर लादू नये.
लॉर्ड डफरिनने याच सुमारास उत्तर ब्रहादेशावर स्वारी केली होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यावादी धोरणावर टिका करणारा ठराव संमत करण्यात आला. ब्रम्हदेशावर ताबा मिळवला तर तो देश भारतात सामील न करता एक स्वतंत्र वसाहत म्हणून ठेवावा असे फिरोजशहा मेहतांनी सुचविले.


४८. काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शिवण्यासाठी गाडगे महाराजांनी कीर्तन या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला.


४९. ज्योतिबा फुले स्कॉटिश मिशन शाळेत असताना मानव समानतेचे तत्व शिकले. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे त्यांना शिक्षणाचे माहित कळले. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. स्त्री भ्रूण हत्येला विरोध केला.


५०. पृथ्वी उत्पत्ती सिद्धांत जोड्या लावा
इमॅन्युएल कांत – वायुरूपी परिकल्पना
लाप्लास –  तेजेनिग परिकल्पना
चेम्बरलीन – ग्रहकण परिकल्पना

जेम्स जीन्स – भरती परिकल्पना

५१. पृथ्वीच्या अंतरंगात खोलीनुसार तापमान वाढत जाते

५२. संद्रीभवनादरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस अनुदभूत उष्णता म्हणतात.

५३. ऋतू जोड्या लावा
वसंत संपात – मार्च २१
उन्हाळा अयन – जून २१
हिवाळा अयन – डिसेंबर २२
शरद संपात – सप्टेंबर २३

५४. ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास भूकंपाचे बाल्य केंद्र म्हणतात. संदर्भ

५५. बोरा वारे अंटार्क्टिका प्रदेशात वाहतात.

५६. खाडी जोड्या लावा
१० डिग्री – अंदमान व निकोबार
८ डिग्री – मिनीकॉय व मालदीव
९ डिग्री – मिनीकॉय व लक्षद्वीप
डंकन – लहान अंदमान व मोठे अंदमान

५७. बेटे जोड्या लावा
साल्सेट – सात बेटांचा समूह
श्रीहरीकोटा – रॉकेट उतरण्याचे ठिकाण
वेलिंग्टन – नौदल स्थानक
व्हीलर (एपीजे कलाम बेट) – मिसाईल उतरण्याचे ठिकाण

५८. ला निनो स्पॅनिश भाषेतील शब्द आहे याचा अर्थ लहान मुलगी होतो तर एल निनो चा अर्थ लहान मुलगा होतो. लाल निनोच्या काळात महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते. ला निनो मान्सून वारे प्रबळ करतो. एल निनो च्या काळात व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते.

५९. ढगफुटीचे ठिकाण जोड्या लावा
केदारनाथ – १६ जून २०१३
लेह-लडाख – ६ ऑगस्ट २०१०
मुंबई – २६ जुलै २००४
चिरगाव – १५ ऑगस्ट १९९७

६०. प्लास्टिकचा पुनर्वापर उत्पादन व वापर कायदा १९९१ प्रमाणे कॅरीबॅगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लस्टिकची जाडी ४० मायक्रॉनपेक्षा कमी असावी नुकतीच ही मर्यादा वाढवून ५० करण्यात आली आहे. वरीलपैकी एकही नाही

६१. हिमाचल प्रदेश भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य होण्याच्या मार्गावर आहे.

६२. पश्चिम घाट जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संरक्षित क्षेत्र आहे.

६३. ओझोन छिद्र सर्वप्रथम १९८५ साली आढळले.

६४. ‘योजना अवकाश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना ‘१९६६-६९‘ या काळात राबविल्या गेल्या.

६५. एल.पी.जी. चा अन्वयार्थ लिबरायजेशन, प्रायव्हटायजेशन आणि ग्लोबलायजेशन आहे.

६६. २००९ मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठीचा तज्ञ् समितीचा अहवाल एस.डी. तेंडुलकर यांनी सादर केला.

६७. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार प्रति दर लाख जिवंत बालक जन्मामागे माता मृत्युदर १०० च्या खाली आणणे आणि प्रति हजारी जिवंत बालक जन्मामागे बालक मृत्यूदर ३० च्या खाली आणणे हा होता. त्यासोबतच संसर्गजन्य रोगांची लागण प्रतिरोध करणे आणि नियंत्रणाखाली आणणे हा होता.

६८. वित्तीय समावेशनासाठी शासनाने २०१४ मध्ये खालीलपैकी प्रधानमंत्री जन धन योजना अंमलात आणली.

६९. डी.बी.टी. चे फुल फॉर्म डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर हे आहे.

७०. ‘ग्रीन क्लायमेट फंड’ची स्थापना २०१० या वर्षी झाली.
Scroll to Top