दुय्यम निरीक्षक पूर्व परीक्षा २०१७ संभाव्य उत्तरे [८० उत्तरे]
०२. जंतूसंसर्ग झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील मास्ट पेशी हिस्टमाईन हे रसायन वापरतात.
०३. कोरडी कडधान्ये, साखर, पीठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे टिकाऊ व स्थिर पदार्थांची आहेत.
०४. AEHJK; EILNO; IMPRS; MQTVW; QUXZA
०५. KGLFT–> PTOUG तर MERSA–> NVIHZ
०६. अकरा खेळाडू A B C D E F G H I J K त्यांच्या प्रशिक्षकासमोर एका रांगेत उभे आहेत. तर रांगेच्या मध्यभागी I उभा आहे.
०७. अक्षर व प्रतीके यांची व्यवस्था दिली आहे.त्यात ५ पैकी ४ गट सामान आहेत. त्यामध्ये I4@ हा गट गटात बसत नाही.
०८. वर्तुळाच्या भोवती असलेल्या संख्यांच्या वर्तुळातील संख्यांशी संबंध शोधा. त्यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी ६७६ ही संख्या येईल.
०९. दिलेल्या संख्या शृंखलेतील दोन संख्यांचे भाग गहाळ आहेत. दोन्ही ठिकाणी एकच संख्या व्यवस्थित बसेल.
7560, 1080, 180, 36, 9, 3
१०. खालील संख्यामालेतील चुकीची संख्या शोध
3,10,27,4,16,64,5,25,125
११. जर 2×8=20, 3×9=31, 5×8=44 तर 30×5=154
१२. DOUBLE–> GSXFOI तर MISTER –> PMVXHV
१३. काही कुत्रे बकरे आहेत, सर्व बकरे झाडे आहेत, काही झाडे कुत्रे नाहीतकाही झाडे कुत्रे आहेत. फक्त अनुमान I निघते.
१४. दिलेली मालिका पुढे सुरु ठेवण्यासाठी दिलेल्या पर्यायातून कोणती आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. पर्याय क्रमांक ३ मधील आकृती येईल.
१५. प्रत्येक आकृतीतील संख्या विशिष्ट नियमानुसार आहेत. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. 75
१६. प्रदेशातील वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी ४ मित्रांनी गाडीने विविध ठिकाणांना भेट भेटी दिल्या. त्यात अरमानने ९ तास गाडी चालविली.
१७. मॅन बुकर हा साहित्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात १९७६ साली तर आंतरराष्ट्रीय रित्या २००५ साली झाली.
१८. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन या संस्थेचा सामग्री मोहिमेत अतुलनीय शौर्य दाखविल्याबद्दल पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कॅप्टन राधिका मेनन आहेत.
१९. भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा माजुली हा आहे.
२०. ट्रान्सअटलांटिक व्यापार आणि गुंतवणूक भागीदारी हा अमेरिका आणि युरोपियन युनियन यांच्यामधील चर्चेच्या टप्प्यावर असलेला करार आहे.
२१. जानेवारी २०१७ मध्ये भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वायफाय व्यवस्था मुंबई या शहरात सुरु करण्यात आली.
२२. भीम –> भारत इंटरफेस फॉर मनी
२३. फ्रांस या देशाने ‘ऑपरेशन सेंटिनल’ नावाची लष्करी कारवाई पार पाडली.
२४. सौर उर्जेवर चालणारी देशातील पहिली बोट नुकतीच केरळ राज्यात कार्यंवित करण्यात आली.
२५. तारक मेहता यांचा विनोदी स्तंभ चित्रलेखा या नियतकालिकात १९७१ साली प्रसिद्ध झाला.
२६. जागतिक बँकेच्या ‘इज ऑफ डुईंग बिजनेस रिपोर्ट, २०१६’ मध्ये भारताला १३० वा क्रमांक मिळाला.
२७. पी.व्ही. सिंधू हिने २०१६ च्या समर ऑलिंपिक मध्ये महिला एकेरी मध्ये रजत पदक जिंकले.
२८. जानेवारी २०१७ मध्ये अग्नी-४ चे सहावे प्रक्षेपण घेण्यात आले.
२९. २०१६ सालच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसन याने अंतिम फेरीत सर्गेई कर्जाकिन याचा पराभव केला.
३०. भारतात लवाद व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उच्च स्तरीय समिती न्यायमूर्ती बी.एन. कृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आहे.
३१. जोड्या लावा (पर्याय १)
राष्ट्रीय मतदार दिन – २५ जानेवारी
राष्ट्रीय विज्ञान दिन – २८ फेब्रुवारी
जागतिक महिला दिन – ८ मार्च
जागतिक ग्राहक दिन – १५ मार्च
३२. २०१६ साली ओडिशाची स्थापना होऊन ८० वर्षे पूर्ण झाली.
३३. २०१७ मधील उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूक ७ टप्प्यामध्ये घेण्यात आल्या.
३४. २०१७ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रात जागेश्वर सहारिया हे राज्य निवडणूक आयुक्त होते.
३५. जोड्या जुळवा (पर्याय ४)
१० वी घटनादुरुस्ती – दादर व नगर हवेली
२१ वी घटनादुरुस्ती – सिंधी भाषा
५२ वी घटनादुरुस्ती – पक्षांतरबंदी कायदा
१०१ वी घटनादुरुस्ती – वस्तू व सेवा कर
३६. आर्थिक न्यायाच्या तत्वाचा उद्देशिका आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वामध्ये उल्लेख आहे.
३७. ‘खाजगीपणाचा अधिकार’ कलम २१ जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारात समाविष्ट होतो.
३८. सार्वत्रिक निवडणुकात मतदान करणे हे मूलभूत कर्तव्य नाही.
३९. ‘कॅबिनेट’ या संज्ञेचा उल्लेख कलम ३५२ मध्ये आहे.
४०. घटनादुरुस्ती विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे गरजेचे असते.
४१. ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे रेल्वे बोर्ड स्थापन केले.
४२. जोड्या जुळवा (पर्याय १)
फ्री प्रेस बुलेटिन – बॉम्बे
फ्री इंडिया – कलकत्ता
दिनमणी – मद्रास
सकाळ – पुणे
४३. रत्त्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी या विषयावर ‘अग्निदिव्य’ हे नाटक लिहिले.
४४. सहकारी दुग्ध व्यवसाय मुंबईत आरे येथे सुरु झाला.
४५. १ मे १९६० रोजी ‘महाराष्ट्र राज्य’ निर्मिती सोहळ्याचे उदघाटन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
४६. जोड्या जुळवा (पर्याय २)
श्री.ना. पेंडसे – रथचक्र
गो.नी. दांडेकर – शितू
भालचंद्र नेमाडे – कोसला
जयवंत दळवी – चक्र
४७. कोंकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा कारबुडे (६५०६ मी) या ठिकाणी आहे.
४८. जोड्या जुळवा (पर्याय ३)
साम्राज्यवादी विचारसरणी – व्हॅलेंटाईन चिरोल
केम्ब्रिज विचारसरणी – अनिल सील
राष्ट्रवादी विचारसरणी – आर.सी. माजुमदार
साम्यवादी विचारसरणी – आर.पी. दत्त
४९. लॉर्ड हार्डिंग्ज II या गव्हर्नर जनरलने भारताची राजधानी कलकत्ता येथून मुंबई येथे हलवली.
५०. एम.एन. रॉय हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य होते.
५१. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार लॉर्ड रिपन याने सुरु केले.
५२. १९४६ च्या कॅबिनेट मिशननुसार भारतीय संविधान सभा गठीत करण्यात आली. पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली. करावे सत्र १४ ते २६ नोंव्हेबर १९४९ मध्ये झाले. [अ ब क बरोबर]
५३. आझाद हिंद फौजेचे संस्थापक रास बिहारी बोस होते.
५४. महारष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर बीड जिल्ह्यात आहे.
५५. २००६ पासून संत तुकाराम वनग्राम योजना सुरु झाली आहे.
५६. तापी नदी खोऱ्याच्या उताराची दिशा पश्चिम आहे. [पर्याय १ फक्त अ]
५७. जोड्या लावा (पर्याय १)
थळ घाट – मुंबई नाशिक
बोर घाट – मुंबई पुणे
माळशेज घाट – मुंबई कल्याण ओतूर
आंबोली घाट – वेंगुर्ला निपाणी
५८. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता १९६०-६१ मध्ये १२९ होती. [पर्याय ४ वरीलपैकी कोणतेही नाही]
५९. जोड्या जुळवा(पर्याय १)
कातकरी – रायगड
भिल्ल – नंदुरबार
कोरकू – अमरावती
गौंड – भंडारा
६०. शिखरांचा उंचीनुसार क्रम कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, सप्तशृंगी
६१. २०११ च्या जनगणनेनुसार घनतेच्या आधारावर जिल्ह्यांचा क्रम गडचिरोली, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे
६२. निरगुडा ही वर्धा नदीची उपनदी आहे.
६३. पुणे जिल्ह्यास ५ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत.
६४. पृथ्वीचा बाह्य थरापासून अंतर्गत थरांकडे क्रम
शिलावरण, दुर्बलावरण, मध्यावरण, केंद्रावरण
६५. रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत वरीलपैकी सर्वांचा समावेश होतोत.
६६. २०१२-१३ भारताच्या निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा २१.७% सहित प्रथम क्रमांक आहे.
६७. नरसिंहम समितीने SLR २५% करण्याची शिफारस केली होती.
६८. नीती आयोगाबाबत पर्याय १ अ, ब, ड विधाने सत्य आहेत.
६९. सरकारच्या कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च अनुत्पादक खर्च आहे.
७०. जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो त्याला तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात.
७१. ‘विविध परिमाण दारिद्र्य निर्देशांक’ हा मानव विकास अहवाल २०१० मध्ये मांडण्यात आला.
७२. भारताच्या आयातदार देशात युएसए, युएइ, चीन, सौदी अरब असा क्रमांक आहे. [पर्याय नाही]
७३. दूरदृष्टीदोष बहिर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो. लघुदृष्टिदोष अंतर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो. [पर्याय ४]
७४. जलविद्युत केंद्रात ऊर्जेचे रूपांतर स्थितिज->गतिज->विद्युत असे होते.
७५. Sb हे अँटिमनी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे.
७६. अंडी घालणारे सस्तन प्राणी प्रोटोथेरिया या वर्गात मोडतात.
७७. टेपवर्म मध्ये पचनक्रियेचा अभाव असतो.
७८. मावा किंवा तुडतुडे किडी हेमिप्टेरा ऑर्डरमध्ये मोडते.
७९. अमरवेल ही खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती आहे.
८०. आवृत्तबीजी वनस्पतीवर्गामधील सर्वात लहान वनस्पती वोल्फिया आहे.