जगात पहिल्यांदा नियोजनाचा स्वीकार १९२८ साली सोव्हिएत रशियाने केला. 


१९२९ च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात नियोजन संकल्पनेचा विचार करण्यात आला. 


१९३४ साली एम. विश्वेश्वरय्या यांनी ‘Planned Economy for India’ या ग्रंथात सर्वप्रथम नियोजनाची संकल्पना मांडली.


भारतीय
भांडवलदारांची संघटना ‘Federation of Indian Chambers of Commerce
Industries (FICCI) ने भारतात नियोजनाची आवश्यकता आहे असे सांगितले.१९३८ च्या काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती स्थापन करण्यात आली. 


१९४४ मध्ये मुंबईतील ८ उद्योगपतींनी भांडवलाच्या जोरावर Bombay Plan तयार केला. यास टाटा-बिर्ला योजना असेही म्हणतात.


१९४४ मध्ये
श्रीमान नारायण अग्रवाल यांनी गांधीजींच्या आर्थिक विचारावर आधारित गांधी
योजना तयार केली.  १९४५ मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी जनता योजना मांडली.
१९५० मध्ये लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सर्वोदय योजना आणली.

योजना सर्वाधिक खर्च टक्केवारी तुटीचा भरणा एकूण आराखडा प्रत्यक्ष खर्च 
१ ली  कृषी व जलसिंचन ४५ २२३ २०६९ १९६०
२ ली वाहतूक व दळणवळण २८ ९४५ ४८०० ४६७३
३ ली वाहतूक व दळणवळण २४.६ ११३३ ७५०० ८,५७७
तीन वार्षिक उद्योग व खाणी  २२.८ —  १५,७७९
४ थी वाहतूक व दळणवळण  १९.५ २०६० १५,९०१ ३९,४२६
५ वी उद्योग व खाणी  २२.८ ५८३० ३८,८५३ १,९००
६ वी ऊर्जा निर्मिती  २८.१ १५,६८४ ९७,५०० २,१८,७३०
७ वी  ऊर्जा निर्मिती ३०.४५ ३४,६६९ १,८०,००० ५,२७,०१२
८ वी ऊर्जा निर्मिती व जल २५.४८ २०,००० ४,३४,१००
९ वी शेती १९.४ ८,७५,००० ९,४१,०४१
१० वी ऊर्जा २६.४७ १९,६८,८१६ — 
११ वी सामाजिक सेवा  ३०.२४ ३६,४४,७१८ — 

योजना व नियोजन मंडळाचे अध्यक्ष

योजना  नियोजन मंडळाचे अध्यक्ष आकृतीबंध  नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष 
१ ली योजना  जवाहरलाल नेहरु हेरॉल्ड डोमर गुलझारीलाल नंदा
२ ली योजना  जवाहरलाल नेहरु पी.सी.महालनोबिस व्ही.टी.कृष्णम्माचारी
३ ली योजना जवाहरलाल नेहरु पी.सी.महालनोबिस मसुदा –अशोक मेहता
तीन वार्षिक  जवाहरलाल नेहरु पी.सी.महालनोबिस प्रा. लाकडवाला
४ थी योजना  इंदिरा गांधी गाडगीळ तंत्र प्रा. लाकडवाला
५ वी योजना  इंदिरा गांधी धनंजयराव गाडगीळ नारायणदत्त तिवारी
६ वी योजना  मोरारजी देसाई सी सुब्रह्मण्यम (रद्द) मनमोहन सिंग
७ वी योजना  इंदिरा गांधी डी. बी.धर आर.के.हेगडे
८ वी योजना  राजीव गांधी प्रा.रॅगनर चंद्रशेखर
९ वी योजना  व्ही. पी.सिंग अशोक रुद्र व ऍलन मोहन धारिया
१० वी योजना  एच.डी.देवगौडा सी.एन.वकील पी.व्ही.नरसिंहराव
११ वी योजना  अटलबिहारी वाजपेयी व ब्रह्मानंद राव प्रणव मुखर्जीपंचवार्षिक योजना
०१ एप्रिल १९५१ पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली.  ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. 


७ वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील १९६६-६९ च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात
.


पंचवार्षिक योजना तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ‘केंद्रीय नियोजन मंडळ’ आणि ‘राष्ट्रीय विकास परिषद’ दोन संस्था कार्य करतात.


केंद्रीय नियोजन मंडळ
स्थापना : १५ मार्च १९५०
पहिली बैठक : २८ मार्च १९५०
स्वरूप : असांवैधानिक, सल्लागार मंडळ
अध्यक्ष : पंतप्रधान (पदसिद्ध अध्यक्ष)


नियोजन मंडळाची कार्ये:
देशातील संसाधने, भांडवल, भौतिक साधन सामग्री यांचा विचार करून त्यांचा वापर करता येईल अशी योजना आखणे. 
केंद्र व राज्यांना सल्ला देणे
योजनेस राष्ट्रीय विकास परिषदेकडून मान्यता प्रा[त करून घेणे


राष्ट्रीय विकास परिषद
स्थापना : ६ ऑगस्ट १९५२, पंचवार्षिक योजना
उद्देश : निर्मिती प्रक्रियेत घटक राज्यांच्या सहभागासाठी
स्वरूप : असंवैधानिक
अध्यक्ष : पंतप्रधान
सदस्य : सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्री, घटकराज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, नियोजन मंडळाचे सर्व सदस्य


कार्य:
नियोजन मंडळाने तयार केलेल्या अंतिम आराखड्यास मान्यता देणे
नियोजन अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे सांगणे


वर्षातून दोन बैठक घेणे